Thursday, 8 December 2022

मुंबईसह राज्यात अधिकाधिक स्टार्टअप सुरू होण्यासाठी

 मुंबईसह राज्यात अधिकाधिक स्टार्टअप सुरू होण्यासाठी

 सर्वंकष धोरणाची निर्मिती करणा


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई दि.7 : नवउद्योजकांनी धोरण निर्मितीत योगदान द्यावे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सहाय्य करेल. मुंबईसह राज्यात अधिकाधिक स्टार्टअप सुरू होण्यासाठी सर्वंकष धोरणाची निर्मिती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टेक आंत्रप्रनर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) समवेत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा केली.महाराष्ट्रातील 25 पैकी 10 हून अधिक युनिकॉर्नस् या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीस टेक आंत्रप्रनर्स असोसिएशन ऑफ मुंबई चे सदस्य, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशातील अन्य शहराच्या तुलनेत मुंबईत नव उद्योजकांसाठी अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात विविध कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्य उद्योग स्नेही राज्य असून राज्यात नवीन उद्योगांकरीता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल.


            राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.येत्या दोन वर्षात बुलेट ट्रेन, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प यामुळे मुंबईचा कायापालट होणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळते महाराष्ट्र राज्य आता स्टार्ट अप्स व युनिकॉर्नची राजधानी बनत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


०००

मुंबई सौंदर्यीकरणाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाउद्या १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ

 मुंबई सौंदर्यीकरणाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाउद्या १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ


मुंबईचा कायापालट मिशन मोडवर


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. ७: मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, उद्या दि. ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या एकाचवेळी १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. जी २० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका ह्या मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडींग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


            स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृष्यस्वरूपात बदल दिसावे यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी. महत्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी, महत्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            महानगरात ज्याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी सुरू आहे त्या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी. शहरातील स्कायवॉकवर रोषणाई करावी. त्याचबरोबर स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची निरंतर स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या मुंबईत राबवाव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अंमलात आणावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नुतनीकरण (रिसर्फेसिंग), पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटींग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी देण्यात आली.

पेण अर्बन बॅंक गैरव्यवहारांमुळे ठेवीदारांचे आर्थिक नुकसान ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम करावा

 पेण अर्बन बॅंक गैरव्यवहारांमुळे ठेवीदारांचे आर्थिक नुकसानठेवीदारांच्या कष्टाचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम करावा


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. ७ – पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गरीब खातेदारांचे मोठे नुकसान झाले आहे, कोणत्याही परिस्थितीत गरीबांचे पैसे परत मिळाले पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, या जप्त मालमत्तांचा लवकरात-लवकर लिलाव करुन पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.


            पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार महेंद्र थोरवे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर यांचेसह महसूल, पोलीस, सहकार आणि सक्तवसूली संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.


            बॅंकेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली तरीही त्या परत मिळण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे या ठेवींमधून घेतलेल्या ३९ मालमत्ता गृह विभागाने जप्त केल्या आहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेल्या जागा सिडकोने खरेदी करुन ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा एक पर्याय असून त्यादृष्टीने या जागांचे सिडकोने मूल्यांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. ठेवीदारांची सुमारे ६११ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देणी असून हे सगळे गरीबांचे पैसे आहेत, ते त्यांना मिळालेच पाहिजेत, त्यासाठी जप्त मालमत्तांचा लिलाव करावा, वसूली करावी आणि हे पैसे परत करावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सिडकोने या जप्त मालमत्तांचे मूल्यांकन तातडीने करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीयसंचालक डॉ. संजय मुखर्जी यांना दूरध्वनीवरुन दिले.


            बॅंक आर्थिक गैरव्यवहारातील वसूलीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष कृती समितीने फक्त २९.१० कोटी रुपये वसूल केले आहे. या वसूलीला गती देण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी जिल्ह्यातील इतर निबंधकांचे सहकार्य घ्या, जिल्हाधिकारी, पोलीस, आणि सहकार अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करुन जप्त केलेल्या १२१ मालमत्तांचा लिलाव करुन वसूली करण्यास गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            गरीब ठेवीदारांना त्यांच्या श्रमाचा पैसा मिळालाच पाहिजे ही आपली भूमिका असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करा, प्रशासकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी आणि गरीबांचे हे पैसे परत देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले.


            सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यांच्या इतर हक्कामध्ये मालमत्तेची विक्री व हस्तांतरण करण्यात येऊ नये असा शेरा नोंदविला आहे, यामुळे मालमत्तांच्या विक्रीला अडचण येत असून हा शेरा मागे घेण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल,असे सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.


००००००



नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची

 नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी.


            मुंबई, दि. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर - हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.


            नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणाऱ्या सध्या २२ रेल्वे गाड्या असल्या तरी ५७५ किलोमिटरचे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल. या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयी करिता नागपूर- हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


००००



 

Cancer regarding

 


पेण अर्बन बैंक की वित्तीय गड़बड़ी के कारण जमाकर्ताओं को आर्थिक नुकसान

 पेण अर्बन बैंक की वित्तीय गड़बड़ी के कारण जमाकर्ताओं को आर्थिक नुकसान

जमाकर्ताओं की गाढ़ी कमाई लौटाने के लिए समयबद्ध कार्यक्रम होना चाहिए

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 : पेण अर्बन को-ऑपरेटिव बैंक में वित्तीय गड़बड़ी के कारण गरीब खाताधारकों का भारी नुकसान हुआ है, किसी भी परिस्थिति में गरीबों के पैसे वापस मिल सकें, इसके लिए सभी सरकारी एजेंसियों को एक समयबद्ध कार्यक्रम तैयार करना चाहिए। जप्त की गयी संपत्ति का नीलाम करके रुपये वसूल करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज दिये।


            पेण अर्बन को-ऑपरेटिव बैंक के जमाकर्ता और खाताधारक संघर्ष समित की माँगों के बारे में चर्चा करने के उद्देश्य से मुख्यमंत्री श्री शिंदे की अध्यक्षता में आज बैठक हुई। सह्याद्रि अतिथिगृह में आयोजित इस बैठक में बंदरगाह एवं खनन मंत्री दादाजी भुसे, विधायक महेंद्र थोरवे, राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, सहकारिता विभाग के अपर मुख्य सचिव अनूप कुमार, सहकारिता आयुक्त अनिल कवडे, रायगढ़ के जिलाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगढ़ के पुलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर सहित राजस्व, पुलिस, सहकारिता और प्रवर्तन निदेशालय के अधिकारी उपस्थित थे।


            बैंक के अध्यक्ष और निदेशक मंडल की वित्तीय गड़बड़ी के कारण जमाकर्ताओं की जमा राशि की अवधि समाप्त होने के बाद भी वापस मिलने की संभावना नहीं थी, इसलिए इस जमा राशि से ली गयी 39 संपत्तियों को गृह विभाग द्वारा जब्त कर लिया गया है। इन संपत्तियों को महाराष्ट्र जमाकर्ता हित संरक्षण अधिनियम ( महाराष्ट्र डिपॉजिटर्स प्रोटेक्शन एक्ट) के प्रावधानों के तहत जब्त किया गया है। जमाकर्ताओं के पैसे से खरीदी गयी जगहों को सिडको द्वारा खरीदने और जमाकर्ताओं के पैसे वापस करने का विकल्प मौजूद है, इस उद्देश्य से मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस अवसर पर इन जगहों का मूल्यांकन करने के निर्देश सिडको को दिये। मुख्यमंत्री ने स्पष्ट निर्देश दिये कि जमाकर्ताओं का 611 करोड़ रुपये से अधिक का बकाया है और यह सब गरीबों का पैसा है, जो उन्हें मिलना ही चाहिए, इसके लिए जब्त की गयी संपत्तियों की नीलामी कर वसूली की जाए और यह पैसा वापस किया जाए। सिडको के प्रबंध निदेशक डॉ. संजय मुखर्जी को मुख्यमंत्री श्री शिंदे ने फोन द्वारा इन जब्त संपत्तियों के मूल्यांकन की प्रक्रिया तत्काल शुरू करने का निर्देश दिया।


            बैंक वित्तीय गड़बड़ी में वसूली के लिए मुंबई उच्च न्यायालय द्वारा नियुक्त विशेष कार्रवाई समिति ने केवल 29.10 करोड़ रुपये की वसूली की है। इस वसूली में तेजी लाने के लिए विभागीय संयुक्त पंजीयक (निबंधक) जिले के अन्य पंजीयकों का सहयोग लें, जिलाधिकारी, पुलिस एवं सहकारिता अधिकारी समयबद्ध कार्यक्रम तैयार कर जब्त की गई 121 संपत्तियों की नीलामी कर वसूली के काम में तेजी लाएँ, ऐसे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस अवसर पर दिये।


            हमारी भूमिका है कि गरीब जमाकर्ताओं को उनके श्रम का पैसा मिले, उसके लिए सभी आवश्यक कार्य करें, प्रशासक अपनी जिम्मेदारी ठीक से निभाएं और गरीबों के ये पैसे लौटाने की प्रक्रिया पूरी करें, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने ऐसा आवाहन किया।


            इस अवसर पर प्रवर्तन निदेशालय के अधिकारियों ने स्पष्ट किया कि प्रवर्तन निदेशालय ने एक टिप्पणी दर्ज की है कि जब्त संपत्तियों के 7/12 दस्तावेज की संपत्ति को दूसरे किसी के हक में बेचा और स्थानांतरित नहीं किया जा सके, जिसके कारण संपत्तियों की बिक्री में अड़चन आयेगी, इसलिए इस टिप्पणी को वापस लेने के लिए पूरा सहयोग किया जायेगा।



विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर.

 विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'सिटीझनविल' पुस्तकाचे प्रकाशन.

            मुंबई दि ७ :- शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून 'ट्रान्स हार्बर' सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने साकारली जात आहे. यापुढील काळात 'इज ऑफ लिव्हिंग' महत्त्वाचे ठरणार असल्याने योग्यवेळी विकेंद्रीकरणावर भर देऊन आता तालुकास्तरीय गावांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 'सिटीझनविल' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या इंग्रजीतील पुस्तकाचा लेखक श्री.सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवाद केला आहे.


            यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमरिश पटेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान, गौर गोपाल दास, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांना काय हवे आहे याची गाथाच 'सिटीझनविल' या पुस्तकाद्वारे उलगडण्यात आली आहे. आज आपण डिजिटल क्रांतीच्या युगात आहोत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढवण्याची आवश्यकता असून या तंत्रज्ञानाचा उपयोग शहरे अधिक विकसित करण्यासाठी केला पाहिजे. 'स्पीड ऑफ डेटा' आणि 'स्पीड ऑफ ट्रॅव्हल' यामुळेच यापुढील काळात अधिक वेगाने प्रगती करता येणे शक्य होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            गतिशक्ती योजनेत विविध विभागांचा डाटा विविध स्तरावर एकत्रित करण्यात येत आहे. यामुळे अधिक चांगले नियोजन करता येणार असून हे नियोजन अधिक वेगानेही करता येईल, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.


शहरीकरणाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक


            शहरीकरणासंदर्भात श्री फडणवीस म्हणाले, जगाच्या आजपर्यंतच्या विकासात शहरीकरण व स्थलांतरे ही अटळ बाब ठरली, मात्र ज्या देशांनी याचे योग्य व्यवस्थापन केले त्यांनी प्रगती केल्याचे आपण पाहतो.


            साठ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) शहरांमधून निर्माण होतो, त्यामुळे शहरे बकाल होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शेतीला सेवा क्षेत्राशी जोडण्याची आवश्यकता आहे.


            राजकारण व समाजकारण क्षेत्रातील सर्वानीच स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. विविध विषयांचा खोलवर अभ्यास केला पाहिजे. लोकांना आपली मते मांडण्यासाठी 'आपले सरकार' हा प्लॅटफॉर्म तयार केला, याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.


            आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, शहर विकासाच्या संदर्भात 'सिटीझनविल' हे पुस्तक मार्गदर्शक आहे. शहरे आता मोठ्या प्रमाणावर बदलत असून यातील जटील समस्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोडविण्यावर भर दिला पाहिजे. समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे श्री थोरात यांनी सांगितले.


            नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आशीष चौहान म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आज सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून देशवासीयांनी या बदलांना सामोरे जाण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.


            गौर गोपाल दास म्हणाले, नवी संकल्पना आत्मसात करण्यासाठी आपण नेहमी मोकळ्या मनाने आणि विनम्रतेने सज्ज असले पाहिजे. सारग्राही वृत्ती जोपासणे आवश्यक असून व्यक्तिविकासातूनच समाज विकासाची वाटचाल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


            लेखक सत्यजित तांबे म्हणाले, 'सिटीझनविल' हे पुस्तक वाचल्यानंतर यातील संकल्पना आपल्या देशात आणि राज्यात कशा राबवता येतील याची इच्छा निर्माण झाली. शहरांचा विकास या संकल्पनेत आता अनेक पैलू समाविष्ट झाले आहेत. लोकसहभागातूनच यापुढील काळात विविध आव्हाने पेलता येणे शक्य होणार असल्याचे श्री तांबे यांनी सांगितले.


            क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले, क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारात आता चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. प्रत्येक नागरिकांने आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन श्री रहाणे यांनी केले.


            सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्कर्षा रुपवते यांनी केले.


----------0000-------



 



Featured post

Lakshvedhi