.युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
●●●
मुंबई - पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतु आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.
मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित 'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' - नेक्स्टजेन च्या २५ परिणामकारक कथा' या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (दि. ४) राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.
प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती राम भोगले, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिकसचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, तसेच पुस्तकामध्ये नमूद केलेले नव्या पिढीतील युवा उद्योजक उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अश्या अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पुढे त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ ५ ट्रिलियन डॉलर इतकीच नाही १० ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यातील दुसऱ्या पिढीतील व्यवसाय - उद्योगातील युवा उद्योजकांना शोधून पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखक दत्ता जोशी यांचे अभिनंदन केले.
कौटुंबिक व्यवसायातील नव्या पिढीतील उद्योजकांच्या २५ परिणामकारक कथा असलेल्या दत्ता जोशी यांच्या पुस्तकाचे साहित्यमूल्य फार मोठे आहे. स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईल त्यावर्षी किमान २५००० युवा उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या जातील असा विश्वास मराठवाडा विभागाचे सीआयआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी प्रकाशित झालेल्या या पुस्तकांत अथांग व अभेद्य जैन (जैन इरिगेशन, जळगाव), अमित घैसास (यशप्रभा ग्रुप, पुणे), निखिल व अभिजित (अभिजित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, नायगाव, वसई), परीक्षित प्रभुदेसाई (पितांबरी उद्योगसमूह, ठाणे), मिहीर वैद्य ( श्री गणेश प्रेस अँड कोट्स, औरंगाबाद), स्वराली सावे (एनिकार फार्मास्युटिकल्स, बोईसर), कौस्तुभ फडतरे (कवित्सु रोबोट्रॉनिक्स, सातारा), अंकित काळे (काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, औरंगाबाद), कुशल ठक्कर (महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, लातूर), रवी जैन (रवी मसाले, औरंगाबाद), अनुप व अतुल कोगटा (दाल परिवार, जळगाव), अनिकेत व निमिष पाटील (वेगा केमिकल्स, जळगाव), श्रुती अहिरे (आनंद अॅग्रो, नाशिक), अनुराग मोराणकर (एलमेक इंजिनियर्स, धुळे), अभिजित गव्हाणे (मेधावी सिमेंट प्रॉडक्ट्स, नांदेड), चेतन व दीपक पाटील (कृष्णा पेक्टिन्स, जळगाव), मल्हार मुतालिक (पॉझिटीव्ह मिटरिंग पंप्स, नाशिक), सिद्धार्थ कुलकर्णी (हरमन चहावाला, सांगली), क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे (वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स, मुंबई), आदित्य कुलकर्णी (निर्मिती ग्रुप, नाशिक), केतकी कोकीळ (संजय ग्रुप, औरंगाबाद), मयांक व वेदांती शर्मा (मयांक अॅक्वाकल्चर, सूरत), पियुष देसले (पियुष लाईफस्पेसेस, धुळे), सुमीत धूत व कपिल राठी (तुलसी पेन्ट्स प्रा. लि., नांदेड) आणि सौरभ व गौरव भोगले आणि मिहिर सौंदलगेकर (एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद) या नेक्स्टजेन उद्यमींचा समावेश आहे. हे सर्व 25 उद्योग परस्परांपासून भिन्न असून या निमित्ताने 25 वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा गाभा समजून घेण्याची संधी या पुस्तकातून वाचकांना मिळत आहे.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत एआयटीजी ग्रुपचे चेअरमन श्री. रामचंद्र भोगले यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक श्री. प्रसाद कोकीळ यांनी केले. सर्व उद्योजकांच्या वतीने व्यासपीठावर श्री. कोस्तुभ फडतरे यांची उपस्थिती होती. त्यांचे स्वागत जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष (मीडिया) श्री. अनिल जोशी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. गंधार जोशी यांनी केले तर आभार श्री. दत्ता जोशी यांनी मानले. कार्यक्रमास पुस्तकात लेखन केलेल्या सर्व उद्योगांचे दोन्ही पिढ्यांतील उद्यमी उपस्थित होते.
--
Datta Joshi
the CATALYST
B - 5, Manomay Residency,
Beside Bajaj Hospital, Behind Biz Square,
Beed Bypass, Aurangabad. 431010
9422 25 25 50 / 9225 30 90 10
--
Datta Joshi
the CATALYST
B - 5, Manomay Residency,
Beside Bajaj Hospital, Behind Biz Square,