Monday, 5 December 2022

महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

 महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

अभिनव अभ्यासक्रमाचा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ.

            मुंबई, दि. 4 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाउंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी "गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक" या अभिनव अभ्यासक्रमाचा नुकताच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना थेट गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे रोजगार उपलब्ध होईल.

            या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 100 महिला लाभार्थीना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा असून संस्थेमार्फत 90 दिवसांचे ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना मासिक 12 ते 15 हजार रुपये वेतनावर भारत सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे नियुक्त करण्यात येईल.

            मंत्री श्री. लोढा यांनी अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कमी कालावधीचे कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगाराची संधी देण्याबाबत सूचित केले होते, त्यानुसार नुकताच या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. मुंबई उपनगर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे, रेवती रॉय फाउंडेशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन येथे शाश्वत विकास ध्येय प्रकल्प 2022-23 अंतर्गत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री श्री. लोढा यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            शाश्वत विकास ध्येय लघु प्रकल्पाअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या कौशल्यविकास आणि रोजगारासाठी हा कार्यक्रम राबविला जातो.

            वंचित घटकांसाठी विशेषतः अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे प्रतिनिधित्व नसलेल्या क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी देणे, जेणेकरून त्यांचे सबलीकरण होईल, अल्प उत्पन्न कुटुबांचे उत्पन्न वाढवणे, जेणेकरून दारिद्र्य निर्मुलन होईल, ही या कार्यक्रमाची उद्दीष्ट्ये आहेत.


००००


 

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील

 युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील

                                    : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 4 : पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            औरंगाबाद येथील मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित 'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' - नेक्स्टजेन च्या 25 परिणामकारक कथा' या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील 25 युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.

            महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अशा अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पिढी त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ 5 ट्रिलियन डॉलर इतकीच नाही 10 ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यातील दुसऱ्या पिढीतील व्यवसाय - उद्योगातील युवा उद्योजकांना शोधून पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखक दत्ता जोशी यांचे अभिनंदन केले.

            'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' या पुस्तकामध्ये जैन इरिगेशन समूहातील 25 उद्योजकांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

            प्रकाशन सोहळ्याला सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ तसेच युवा उद्योजक उपस्थित होते.

०००


 

मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत

 मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत देत आहे.

 वन लाइनर गीता -

 तुम्ही हे सर्वांना फॉरवर्ड करून प्रसारित कराल का? प्रत्येकाने हे 4 दिवसात जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याची विनंती केली आहे. हे केवळ तुमच्या राज्यातच नाही तर संपूर्ण भारताला पाठवले पाहिजे.


 वन लाइनर गीता


 *अध्याय 1 - चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे.*

 *अध्याय २ - योग्य ज्ञान हेच ​​आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे.*

 *अध्याय 3 - निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे.*

 *अध्याय 4 - प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते.*

 *अध्याय 5 - व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या.*

 *अध्याय 6 - दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा.*

 *अध्याय 7 - तुम्ही जे शिकता ते जगा.*

 *अध्याय 8 - स्वतःला कधीही सोडू नका.*

 *अध्याय 9 - तुमच्या आशीर्वादांची कदर करा.*

 *अध्याय 10 - सर्वत्र देवत्व पहा.*

 *अध्याय 11 - सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा.*

 *अध्याय 12 - तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा.*

 *अध्याय 13 - मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा.*

 *अध्याय 14 - तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा.*

 *अध्याय 15 - देवत्वाला प्राधान्य द्या.*

 *अध्याय 16 - चांगले असणे हे स्वतःच एक बक्षीस आहे.*

 *अध्याय 17 - आनंददायी वर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे.*

 *अध्याय 18 - जाऊ द्या, देवाशी एकरूप होऊ या.*

 (या प्रत्येक तत्त्वाचे आत्मपरीक्षण)

                       

                   || ॐ तत्सत् ||

 P. S. - मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की हे जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि गीतेचे महत्त्व समजावून सांगा.


 ♥️♥️♥️♥️♥️♥️

आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे"

 आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे"

 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

            मुंबई, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महिला विद्यापीठ तसेच महिला महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.  

            एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 


            नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत कला क्षेत्रात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते परिपूर्ण नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांनी केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित न राहता देशविदेशातील संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून खऱ्या अर्थाने विश्वविद्यालय व्हावे असे राज्यपालांनी सांगितले.

पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे


            महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ केवळ पाच मुलींसह सुरु झाले व आज त्याचा ७ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. महिला विद्यापीठ लवकरच पालघर व चंद्रपूर याठिकाणी आपली उपकेंद्रे सुरु करणार असल्याची माहिती कुलगुरु उज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली.


            कार्यक्रमाला माजी मंत्री अमरीश पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, मुंबई पोस्टल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिमाद्री नानावटी, प्राचार्या डॉ राजश्री त्रिवेदी, विश्वस्त अपूर्व नानावटी तसेच महाविद्यालयाचे शुभचिंतक, माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.   

००००

आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पुर्णत्वाकड

 आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पुर्णत्वाकड

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

राज्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत


            मुंबई, दि. 4 : ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

            ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या सोबत होते. त्यांच्या समवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.l

            उभय नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केल्यानंतर या महामार्गाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा हे जिल्हे तसेच जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसर तर वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

            बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय रायमुलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बुलडाणा जिल्ह्यातून 89 किमीचा महामार्ग मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे.

            जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील 25 गावांतून 42 किलोमीटरचा महामार्ग जात आहे. आज दुपारी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            औरंगाबाद जिल्ह्यात 54 किलोमीटरचा हा महामार्ग जातो. जिल्ह्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

            दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इंटरचेंज येथे आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. या पाहणी दौऱ्याची सांगता सायंकाळी 5 वाजता शिर्डी येथे झाली. शिर्डी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.

०००                                                                                                                


 


 


 


 


 


 

सोमनाथ


 

लाइफ

: Having a place to go - is a home.

Having someone to love - is a family.

Having both - is a blessing.

*NO & YES are two shortest answers which need a long thought*

*Most of the things we miss in life are only because of saying NO too Early or YES too Late.*

*Good morning*😊

Featured post

Lakshvedhi