Thursday, 1 December 2022

रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी

 रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

       मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड उद्योगासाठी रेशीम शेती पूरक ठरत आहे. रेशीम उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर रहावा यासाठी राज्यस्तरीय योजनेचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


          मंत्री श्री. पाटील यांचे शासकीय निवासस्थान, सिंहगड (ब-2), मुंबई येथे रेशीम संचालनालयाचे कामकाज आणि उपाययोजना, रिक्त पदे तसेच राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्रसिंग, आयुक्त पी.शिवशंकर, रेशीम संचालक प्रदीप चंद्रेन, संचालनालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


         मंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतीबरोबरच शेतकऱ्यांना जोड उद्योगासाठी रेशीम शेती पुरक ठरत आहे. त्यासाठी रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देणारी राज्य रेशीम योजना सिल्क समग्र 2 या योजनेच्या धर्तीवर तयार करावी. या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


          सध्या राज्यात १३ हजार ५८१ एकर तुती लागवड आहे पुढील एका वर्षात 5 हजार तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवावे त्या दृष्टीने महा रेशीम अभियान राबवावे आणि महाराष्ट्राचा रेशीम उद्योगामध्ये ब्रँड तयार करवा, असे सांगून वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांनी रेशीम संचालनालयातील कामकाजाचा आढावा घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.


          देशात रेशीम उद्योगात अग्रेसर असलेल्या राज्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करावी. या समितीने राज्यांचा अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यामुळे राज्यातील रेशीम उद्योगाला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगित

मनापासून पोटधरून

 🤣😀🤣


*गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.*


*मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा....*


*मग काय ! गाडी सुसाट !!*


🚗


*आणि -*


*अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.*


*गीतानी कर्ररररकचू्.न ब्रेक दाबला.*


*वाटलं आता जाऊन धडकतेकी काय ..!!*


*गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..*


*आणि....*


*हुश्श.....!!*

:

:

:

:

:....

*गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. अपघात होता होता गीता वाचली व अशाप्रकारे....*


*"गाढवा पुढे वाचली गीता....."*


*ही म्हण प्रसिद्ध झाली....*


    

           😃


*नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली सारी कथा आपला नवरा हरीला सांगितली....*


*तिने नवर्‍याकडे हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला पाहुणचारासाठी घरी घेऊनच या.*


*मग बिचारा हरी गाढवाकडे गेला.*


*पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना....*


     *शेवटी...*


*अडलेल्या हरीने गाढवाचे पाय धरले.....*


       *आणि*


*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी.....*


*ही म्हण तेव्हापासून प्रसिद्ध झाली.*


         😃


*शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेऊन आला....*


*उन्हातून आल्यामुळे गीताने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला....*


*गाढव पाणी गटागटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.*


*पण अचानक काय झाले कळलेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले....* 


*हरीला आणि गीताला हे कोडे आजपर्यंत सुटले....नाही.....*


..

..

*"गाढवाला गुळाची चव काय..?"* 


*ही म्हण यामुळे सगळीकडे व्हायरल झाली.....*



😜 *मंडळी हसत रहा आनंदी रहा....*


😀😀🤣🤣😀😀

क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

 क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन.

            मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी आता ऑनलाईन होणार असून यासाठी क्रीडा विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.


             क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी या प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, उपसचिव सुनिल हंजे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व कुस्ती खेळांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त राज्यातील खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, यासाठी खेळांडूची क्रीडा विषयक प्रमाणपत्रे पडताळणी करण्याचे काम क्रीडा विभागामार्फत करण्यात येते. हे पडताळणीसाठी खेळाडूंचा अर्ज, त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र, संघटनांमार्फत त्या-त्या क्रीडा स्पर्धांची विविध आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्यात येत होती. तथापि, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळविणे, तसेच संघटना सचिव यांची बनावट स्वाक्षरी व कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याद्वारे पात्र खेळाडूंच्या बाबतीत अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे क्रीडा विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

यांची 'माझी मुंबई, स्वच्छ मुंबई' या विषयावर उद्या मुलाखत

            मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची 'माझी मुंबई,स्वच्छ मुंबई' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


            ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे महत्व, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 15 वॉर्डमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, अभियानात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग,स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांचा सहभाग या विषयी सविस्तर माहिती, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000


 

शिवप्रताप दिन सोहळा

 शिवप्रताप दिन सोहळा

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव.

            सातारा दि. 30 : शिवकालीन धाडसी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भवानी मातेची मनोभावे आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल.

            राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शिवप्रताप दिनाला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले

            किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठया उत्साहात करण्यात येईल असे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

            आज सकाळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

            भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री महादेव जानकर, भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


 



 



टिप्स हेल्थ


 

फूल गुलाब का





 

Featured post

Lakshvedhi