Monday, 28 November 2022

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

 महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान


            नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.


            येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय शिल्प पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


             ‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.


महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित


            कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापुरी चपला हाताने बनविण्याच्या कारागिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.


            अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडिलांकडून चपला तयार करण्याचे बारकावे शिकल्याचे अमर यांनी मनोगतात सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शनानिमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


            यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून भरतकामाचे विशेष प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे त्यांनी सांगितले.


            अभय पंडित यांना कुंभार कामासाठी वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


०००








विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे

 विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच

 प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे; जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


            याबैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून, २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून, शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे श्री. कपूर यांनी सांगितले.


            विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचे देखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्च‍ित करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठी देखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी - प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदीया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा करण्यात आली.


००००


 



अर्थसहाय्य दुर्घटना

 बल्‍लारपूर दुर्घटनेतील मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांना

मुख्‍यमंत्री निधीतून 5 लाखांचे अर्थसहाय्य


चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मान्‍य


            मुंबई, दि. 28 : बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर शासकीय खर्चाने योग्‍य उपचार करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.


            रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांच अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटुंबियांना जाहीर केले आहे.

अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक -

 अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई दि. 28 : देशाच्या, राज्याच्या विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.


           यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास संघटनेचे मुख्य सल्लागार सुभाष चांदसुरे, संघटनेचे अध्यक्ष सुरेश नलावडे, अशोक ससाणे आदी उपस्थित होते.


            मंत्री चव्हाण म्हणाले, “जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा आपला कायम प्रयत्न असला पाहिजे. आपल्या मागण्याबाबत शासनाची सहकार्याची भूमिका असेल”.


     यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संघटनेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चांदसुरे यांनी केले तर आभार अशोक ससाणे यांनी मानले. सूत्रसंचालन श्याम मिसाळ यांनी केले.

नाशिकच्या अनाथ आश्रमातील

 नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणाच्याचौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            मुंबई, दि. 28 : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

            दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


फुकटची फु


 

सप्नतल्या कल्यानो उमलू नकाच केव्हा.

: अलिबाग तालुक्यातील नागरिकांसाठी खुश खबर❤️

अलिबाग शहर अंतर्गत, हेलिकॉप्टर प्रवास सेवा सुरु करण्यासाठी मागणीचा पाठपुरावा केल्यामूळे.

आता एस टी स्टैडं गाठावे लागणार नाही.

या वर्षात (जुने बस स्टँड) एस टी स्टेंड जवळ लवकरच हेलिपॅड उभारले जाणार आहे.

ज्याच्याने अलिबाग शहरातुन बाहेर गावी जाण सोपे होणार आहे.

काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला ,

त्यात तीन हजार करोड रुपये हेलिपॅड उभारणीसाठी देणार आहेत ,

अशी घोषणा सरकारने केली आहे.

हेलिपॅड बनवायचे कार्य लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

हेलिपॅड साठी १ एकर जमीन देण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टर दर आर्ध्या तासाला उड्डाण करतील ,

ती खालील प्रमाणे-


1. अलिबाग ते मुंबई ५ फेरी

2.अलिबाग ते पुणे ३ फेरी

3.अलिबाग ते कोल्हापूर ३ फेरी

4.अलिबाग ते अहमदनगर ३ फेरी

5.अलिबाग ते नाशिक ३ फेरी 

6. अलिबाग ते धुळे ३ फेरी

7. अलिबाग ते ठाणे ५ फेरी

8. अलिबाग ते भिवंडी ५ फेरी

9. अलिबाग ते पनवेल ५ फेरी

10.अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया दिवसभर


आणि दोन हेलिकॉप्टर आरक्षित ठेवले जातील ,

ते वेळेनुसार वापरले जातील.

अलिबाग परिसरातील नागरिकांना ही खुष खबर आहे.

श्रीमानणीय पंतप्रधान महोदयांनी सांगितले की...

हेलिपॅड दोन आठवड्यात आत पूर्ण होईल.

एक ट्रायल उड्डाण झाले की नियमित त्याचा वापर सुरू होईल.


🚁🚡🚁🚁✈️🚁🚁🛰🚁🚁🛩.


*हे पहाटेच्या सुमारास मला पडलेले स्वप्न*.!!


संपूर्ण बातमी मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद !


वर्षोनूवर्ष रस्त्याचे खड्डे बुजवत नाहीत ,

चांगले सिमेंट कॉक्रीटचे रस्ते देत नाहीत ,

हेलिकॉप्टर सेवा देणार .????    

😱😂: .

Featured post

Lakshvedhi