*आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो.*
*💐🙏🏻💐शुभ सकाळ 💐🙏🏻💐
*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो.*
*💐🙏🏻💐शुभ सकाळ 💐🙏🏻💐
अमृतमहोत्सवाच्याडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करणार
-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्यातील नाट्यगृहे अद्ययावत करणार
मुंबई, दि. 4 : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्यात शासकीय सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील विविध विषयांवरील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या संग्रामाची माहिती सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठवाडा सांस्कृतिक महोत्सव मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल. याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष गीत तयार करण्यात येईल.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत यावर्षी 6 महसूली ठिकाणी विभागीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव विभागीय स्तरावर न करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ महासंस्कृती महोत्सव‘ आयोजित करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
नाट्यगृहे अद्ययावत करणार
हौशी रंगभूमीला बळ देणार!
नाट्य चळवळ सुरू रहावी याकरीता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सौर उपकरण, वातानुकुलीत व्यवस्था, ध्वनी यंत्रणा, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सर्व बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी मराठी सिनेमांना प्रोत्साहनामार्फत अनुदान देण्यात येते. हे अनुदान देताना सिनेमाचे स्क्रिनिंग तीन महिन्यात पूर्ण करण्यात येऊन याबाबत निर्णय घेण्यात यावा. तसेच काही वेगळ्या सिनेमांची निर्मिती त्या वर्षात केली असल्यास त्यांचाही यामध्ये समावेश करण्यात यावा. महाराष्ट्राच्या कलाकारांना विविध घटकांना एकत्र आणता येईल, अशा कलासंकुलाची निर्मिती येणाऱ्या काळात करण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे नियोजन असल्याचे, श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या सांघिक संघाला पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र यापुढे विजेत्या संघातील प्रत्येक कलावंतास सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात यावे. नाट्य स्पर्धेचे, नाटकाचे परीक्षण करणाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार शासनामार्फत करण्यात येईल, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.
००००
लोकहितांचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठीकिनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई, दि. 3 :- ‘पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्यच आहे. पण लोकहितांचे विविध प्रकल्प तसेच स्थानिकांच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणाने तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादर करण्यात आला. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीचा हा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे पाठवण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके आदी उपस्थित होते.
पर्यावरण विभागाचे सचिव श्री. दराडे यांनी पाच जिल्ह्यांकरिताच्या आराखड्याचे सादरीकरण केले. किनारपट्टी क्षेत्राचे नियमन अधिनियमन-२०१९ नुसार हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने किनारपट्टीच्या क्षेत्राचे भरती व ओहोटी रेषेचे आलेखन केले. त्यावर पाच जिल्ह्यातून सूचना व हरकती मागवून हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. यात सागरी नियमन क्षेत्राचे चार प्रकारात वर्गीकरण आहे. त्यामध्ये परिस्थितीकी दृष्ट्या संवेदनशील, विकसित भाग, ग्रामीण भाग आणि पाण्याचा भाग यांचा समावेश आहे. यात पुर्वीच्या २०११ च्या अधिसुचनेतील भरती रेषेपासूनची १०० मीटर अंतरापर्यंतची मर्यादा आता खाडी, नद्या, नाले या क्षेत्रांकरिता ५० मीटर पर्यंत करण्यात आली आहे.
यामुळे या पर्यटन उपक्रमांनाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छिमारांना आणि पारंपरिक घरांच्या बांधकाम व दुरूस्तीची परवानगीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण परवानगी देऊ शकेल, असे प्रस्तावित आहे.
तसेच स्थानिक लोकांची जूनी घरेही नियमित केली जाऊ शकणार आहेत. किनारपट्टीच्या भागामध्ये स्थानिक नागरिकांकरिता सामुदायिक पायाभूत सुविधा उभे करणे शक्य होणार आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक अशा वाळवण, मासळी बाजार, जाळी बांधणी, होड्यांची दूरूस्ती यांनाही परवानगी दिली जाणार आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी घरगुती मुक्काम पर्यटन सुविधा देता येणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रासाठीच्या आवश्यक अशा समुद्रकिनारा शॅक (खोपटी), प्रसाधनगृहे, बैठक व्यवस्था आदी तात्पुरत्या पर्यटन सुविधांना परवानगी देणे शक्य होणार आहे.
0000
दिलखुलास’ कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याचा वृत्तांत.
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या महारोजगार मेळाव्याचा वृत्तांत प्रसारित होणार आहे. हा वृत्तांत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 5 व सोमवार दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील तरूणांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी दहा लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने यशवंराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश दिला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले आहे. या महारोजगार मेळाव्याचा वृत्तांत दिलखुलासमधून ऐकता येणार आहे.
राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 4 : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कला, साहित्य, उद्योग, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील प्रख्यात व्यक्तींच्या संकल्पनांच्या आदान-प्रदानासाठी दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी हा कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे.
मुलाखतीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “आमचे लोकाभिमुख, विकासाभिमुख’ सरकार असेल. गेल्या तीन महिन्यात जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. राज्य शासन विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. सण आणि उत्सव आता उत्साहात साजरे केले जात आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था सुधारते आहे. राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
औद्योगिक करारांची शंभर टक्के अंमलबजावणी
राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प दिले जातील, चिंता करू नका, असे आश्वासन दिले आहे. औद्योगिक सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात जे करार होतील त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, अशी माहिती देखील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.
समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. महामार्गालगत नवनगर, नोडस, नॉलेज सिटीज उभारण्यात येत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. प्रक्रिया उद्योगही सुरू होईल. शिर्डी पर्यंतचा मार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षात समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड,संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गाजवळ सुद्धा उद्योग वाढत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि सर्वच क्षेत्रात समृद्धी येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करणार
यापूर्वी राज्यात मेट्रो, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ची निर्मिती झाली. आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करतोय. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे मधील प्रवासासाठीचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल.
दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई
मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचं काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरूवात झाली आहे. सुमारे ५ हजार ५०० कोटी रूपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षात पूर्ण होतील, असे निर्देश देखील मुंबई महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुंबईच्या विकासात भर घालणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे काम प्रगतीपथावर आहे. हा २२ किमीचा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासह नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी केली जात असून शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३४० किलोमीटरची मेट्रो उभारण्यात येत असून २०२७ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यंमंत्र्यांनी दिली.
प्रवाशांच्या फायद्यासाठी आरेमध्ये कार शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
०००
पवन राठोड/ससं/