सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 3 November 2022
शिंग्रुबा मंदिर*
*शिंग्रुबा मंदिर*
खंडाळा घाट, मुंबई-पुणे रोड.
संकलन - सुधीर लिमये पेण
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा!
धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते.
परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिका-यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर घाटात शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत
समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांची
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
दिल्ली, दि. 2 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन केले होते. या कार्यदलाच्या शिफारशीच्या आधारावर विविध क्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी चार उपसमित्या नेमण्यात आल्या होत्या. या उपसमित्यांचा अहवाल केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या कडे सुपूर्द केला.
आज दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन उपसमित्यांचा अहवाल सुपूर्द केला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या समित्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केले आहे.
या उपसमित्यांमध्ये चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमाची रचना आणि दुहेरी अथवा संयुक्त पदवी कार्यक्रम, उच्च शैक्षणिक लिंक योजना (Higher Education Links Scheme ) समूह (क्लस्टर) केंद्रांमध्ये रूपांतर करणे, उच्च शैक्षणिक संस्था (Higher Education institution) मधील शिक्षकांच्या कार्यप्रदर्शनाबाबत मूल्यमापनासाठी मापदंडांची शिफारस यासह एकूण धोरण ठरविणे. अशा या चार उपसमित्यांचा अहवाल आज केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे सोपविण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी दिली.
००००
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रासंदर्भातील अंतिम प्रस्ताव
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रासंदर्भातील अंतिम प्रस्ताव
30 नोव्हेंबरपूर्वी केंद्र शासनास पाठवावा
- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार.
मुंबई, दि. 2 : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यासाठी विविध राज्यांकडून प्रस्ताव मागितले होते. महाराष्ट्राकडून वन विभागामार्फत यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी केंद्र शासनास पाठविण्यात यावा, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रासंदर्भातील अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यासंदर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाटाचे जागतिक स्तरावर महत्व आहे. पश्चिम घाट महाराष्ट्रापासून दक्षिणेकडील केरळपर्यंत पसरला आहे. सह्याद्रीच्या रांगांसह मोठ्या प्रमाणात वनराईने नटलेला हा प्रदेश आहे. जवळपास 6 राज्यांशी संबंधित असणाऱ्या पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात महाराष्ट्रातील किती गावे येतात, किंवा किती गावे वगळ्यात यावी याबाबत पुन्हा एकदा अभ्यास करुन प्रस्ताव तयार करण्यात यावा.
राज्य शासनाकडून यापूर्वी 2018 आणि 2021 साली गावे वगळण्याबाबत व समाविष्ठ करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्याला अद्याप केंद्र शासनाकडून मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संबंधित आमदार आणि तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून याबाबत लेखी मते मागविण्यात यावी. तसेच आता तयार करण्यात येणारा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र तसेच वन विभागातील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी योवळी सांगितले.
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात कोणतेही खाणकाम प्रकल्प, धरण प्रकल्प आणि वीज निमिर्ती प्रकल्पांना परवानगी देतानाच निकषाचा अभ्यास करणे याला प्राधान्य देण्यात यावे. तसेच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा स्थानिक पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, परिसंस्था तसेच नैसर्गिक स्त्रोतांवर होणारा परिणाम याचा अभ्यास होणे गरजेचे आहे असे मंत्री श्री. केसरकर यावेळी म्हणाले.
डॉ. के. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत 10 मार्च 2014 रोजी प्रारुप अधिसूचना भारतीय राजपत्रात जारी करण्यात आली. या अधिसूचनेतील क्षेत्राची भौतिक पडताळणी करून क्षेत्र निश्चितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून राज्यांना देण्यात आले होते. पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत महाराष्ट्राचा अंतिम प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावात प्रामुख्याने कुठलेही क्षेत्र/गाव, प्रारुप अधिसूचनेतून वगळ्याकरिता प्रस्तावित करताना तेथील जैवविविधता, वन्यजीव, वन्यजीव भ्रमण मार्ग, वने व पर्यावरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे तसेच कोणत्याही परिस्थितीत त्यांचा ऱ्हास होणार नाही या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील वगळण्यासाठी प्रस्तावित गावांबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.
००००
विकासाचा कल्पवृक्ष’ ऑडियो बुकची संकल्पना
विकासाचा कल्पवृक्ष’ ऑडियो बुकची संकल्पना महत्वपूर्ण, उपयुक्त
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयी पुस्तकाच्या ‘स्टोरी टेल’ आवृत्तीचे प्रकाशन
मुंबई, दि. २ :- ‘स्टोरी टेलचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे ऑडियो बुक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यत पोहचवेल. त्यादृष्टीने ही ऑडियो बुकची संकल्पना निश्चितच महत्वाची आणि उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
'विकासाचा कल्पवृक्ष' या पुस्तकाच्या स्टोरीटेलने तयार केलेल्या ऑडियो बुक आवृत्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी वने तथा सांस्कृतिक कार्ये, मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्टोरी टेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रशांत मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्व असते, त्यांच्याच कार्याबाबत पुस्तक प्रकाशित होत असतात. मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्य कर्तृत्व पहात आलो आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून काम कऱण्याची पद्धतीही जवळून अनुभवली आहे. वनमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले आहे. कोट्यवधी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्यही पेलले आहे. आता तर त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य मंत्रीपदही आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता वन आणि मन याविषयी काम करण्याची जबाबदारी आहे. त्यांची विधिमंडळ सभागृहातील भाषणे, विषय मांडण्याची हातोटी सर्वांनाच माहित आहे. ते मांडणी करताना अनेक दाखले, आकडेवारी देतात. मंत्रिमंडळ बैठकीतही ते परखडपणे बोलतात. राज्याच्या, लोकांच्या हिताच्या योजना, चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत, यासाठी त्यांची तळमळ असते. या ऑडियो बुकच्या माध्यमातून त्यांची ही तळमळ, त्यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राकडे सांस्कृतिक समृद्धी आहे. ती अशा ऑडियो बुकच्या माध्यमातून जगभर पोहचविता येईल. ऑडियो बुकचे हे माध्यम शक्तीशाली आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपला महाराष्ट्र धनसंपन्न होईलच. पण तो गुणसंपन्नही होईल. यासाठी या ऑडियो बुक संकल्पनेचा वापर करता येईल.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या कार्याविषयीचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे पुस्तक किरण कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्याच्या ऑडियो बुकसाठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.
खरी संपत्ती🌹*
*🌹खरी संपत्ती🌹*
*शरीर ओके तर ठिकाणावर डोके,*
*एक लक्षात असु द्या...*
*आपल्या वडिलांचे*
*नांव व संपत्ती,*
*आपल्याला मिळू शकते,*
*पण आरोग्य,शरीर,*
*आपले आपल्यालाच कमवावे लागते,*
*ते वारसाहक्काने मिळत नाही.*
*आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता,*
*पण...*
*इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,*
*तोचं खरा श्रीमंत...*
*असचं म्हटलं जाईल...*
*प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप आहे,*
*पण खाता येत नाहीये,*
*हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,*
*म्हणून शरीर,आरोग्य हे जपा..!!*
*पण त्याचबरोबर..*
*चांगली माणसं ही जपा...*
*कारण...*
*जसे उत्तम शरीराशिवाय,*
*आनंद नाही,*
*तसेच चांगले नातेवाईक,*
*जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,*
*जीवन नाही...*
*जगताना स्वतःच्या बोलण्यात,*
*इतका सरळपणा...*
*व तिखटपणा ठेवा...*
*की,वाईट लोकांना त्याचा ठसका,*
*आणि चांगल्या लोकांना त्याची,*
*चवच लागली पाहिजे...!*
*प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात,*
*"प्रेम, काळजी आणि आदर"..*
*पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते...*
*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*..
*पाण्यापेक्षा* *तहान* *किती आहे याला जास्त किंमत असते*
*मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते*
*या जगात नाते तर सर्वच जोडतात*..
*पण नात्यापेक्षा* *विश्वासाला* *जास्त किंमत असते*
*मोठ्यामोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं.*
*आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो*
*शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,,,,,*
*साथ देवुन "विश्र्वास " निर्माण करा,,*
*एकमेकांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं....*
*भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही...*
🏮🪔🏮🪔
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...