Saturday, 1 October 2022

पर्यटन

 देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

- केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

           

            मुंबई, दि. 30 : देशाला विविध बोली भाषासंस्कृतीविलोभनीय निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. विदेशी पर्यटकांना देशातील या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकर्षण आहे. हे लक्षात घेवून त्यावर आधारित पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेतअसे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालय तर्फे ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. नाईक बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढाशिक्षणमंत्री दीपक केसरकरमुंबई पोर्ट ऑथोरिटीचे अध्यक्ष राजीव जलोटाछत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे प्रमुख सब्य मुखर्जीकेंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे ज्ञानप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटक देशात यावेत यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटनाची वेगळी ओळख आहे.  ही माहिती सर्वांना व्हावी, यासाठी पर्यटन पर्व सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने नाशिकमुंबई पोर्ट ट्रस्ट येथेही पर्यटन स्थळ विकासासाठी निधी दिला आहे. जी - 20 मधील काही बैठका महाराष्ट्रात  होत आहेत  या बैठकांच्या माध्यमातून  राज्याला महाराष्ट्रातील पर्यटनाच्या बलस्थानांची माहिती देता येवू शकते,  असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

          पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेराज्यात पर्यटन क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणाऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल.  सकारात्मक निर्णय घेऊन पर्यटनवाढीला चालना देण्याचा  प्रयत्न करण्यात येईल. गोवा राज्यानेही पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातही पर्यटनातून रोजगार वाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.

स्थानिक संस्कृतीची पर्यटकांना ओळख करून देणे गरजेचे

- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

            शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणालेस्थानिक संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मुंबईपुणे,नागपूर यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये पर्यटनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पर्यटन पर्व हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमातून पर्यटन वाढीस चालना मिळेल असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

          यावेळी पर्यटन महामंडळाचे प्रदर्शन, टेक्सटाईल व हॅण्डीक्राफ्टस यांचे स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000


पर्यटन

 पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करणार

-केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा

 

     मुंबईदि. 30 : पर्यटन क्षेत्रात काम करणारे भागधारक यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन विभाग व राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईलअशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.              

        येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा करताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर,  राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.

         केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणालेपर्यटन वाढीसाठी पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करेल तसेच राज्यात या क्षेत्रात येणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी धोरणे शासन अवलंबित आहे. चर्चेत सर्वांच्या अडचणी जाणून घेवून ठोस उपाययोजना करण्यात येतीलअसेही यावेळी श्री. नाईक यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर देणार : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

       मंत्री श्री.लोढा म्हणालेराज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करून पर्यटन वाढीसाठी शासनाचे धोरण नेहमीच लवचिक राहील.या क्षेत्रातील प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेवून याबात विचार करून निर्णय घेण्यात येईलअसेही पर्यटन मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

         यावेळी उपस्थित पर्यटन भागधारक ऋषभ मेहरा,अभय घाणेकरनिशा शेट्टीप्रशांत अंधाळकर,राकेश मोरे,राजेश गाडगीळराजेंद्र फडकेऋषीकेश यादव,गौरंग नायक,व्यंकटेशन दत्तात्रयन,ग्यान भूषण,चंदन भडसावळे,लोकेश सावंत,रेखा चौधरी यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबी याबाबत मते व्यक्त केली. 

पुनर्विकास

 पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. ३० : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागतीलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबईतील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो २०२२ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर नारडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकरनारडेको महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूणवालनारडेको महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.

मुंबईकरांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणार

            मुंबईतील वाहतूकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही वाढवायचा आहे. महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासार्हता आणली असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नैना – तिसरी मुंबई म्हणून ओळख

            मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावायासाठी मेट्रोट्रॉन्सहार्बर लिंककोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी  पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेबांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकगुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नारेडकोला आश्वस्त केले.

            या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नारेडको यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच ओपन एकर्स या मासिकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

सुदिन





 

सुप्रभत


 

नवरात्र


Timbadiyafamily



 

गरबा

 

Roshni timbadiya 

Featured post

Lakshvedhi