Saturday, 1 October 2022

पुनर्विकास

 पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. ३० : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागतीलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबईतील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो २०२२ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर नारडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकरनारडेको महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूणवालनारडेको महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.

मुंबईकरांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणार

            मुंबईतील वाहतूकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही वाढवायचा आहे. महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासार्हता आणली असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नैना – तिसरी मुंबई म्हणून ओळख

            मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावायासाठी मेट्रोट्रॉन्सहार्बर लिंककोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी  पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेबांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकगुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नारेडकोला आश्वस्त केले.

            या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नारेडको यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच ओपन एकर्स या मासिकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

सुदिन





 

सुप्रभत


 

नवरात्र


Timbadiyafamily



 

गरबा

 

Roshni timbadiya 

दिलखुलास

 ‘दिलखुलासकार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑनएआयआरया ॲपवर सोमवार  दि. 3 ऑक्टोबर आणि मंगळवार दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

            बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या सनील शेट्टी यांनी प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीचा प्रवास  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मुलाखतीतून जाणून घेतला आहे.


स्वच्छता मॉनिटर्स’

 पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार स्वच्छता मॉनिटर्समहात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

 

            मुंबईदि. 30- महात्मा गांधी जयंती आणि मिशन स्वच्छ भारतचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावेअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

            विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावीया उद्देशाने विद्यार्थ्यांनाच स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येईल. 2 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हीडिओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय करून देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लेटस् चेंज’ हा 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हीडिओ संदेशाद्वारे देखील कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

             या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांना स्वच्छता मॉनिटर’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होईल. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्वच्छता मॉनिटर’ यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


Featured post

Lakshvedhi