Friday, 9 September 2022

शत्रू नाशाय:


 *श्री बगलामुखीदेवी मंदिर.*संकलन - सुधीर लिमये पेण 

दशमहाविद्यांमध्ये श्री बगलामुखी ही एक महाविद्या आहे. श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे.

देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजाअर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांनी युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती.

शत्रूनाशिनी देवी बगलामुखी. मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूनाश हवन करवून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्यानेे मनोवांच्छित फलप्राप्ती होते.

१. श्री बगलामुखीदेवीची उत्पत्ती.

एकदा दानवाने ब्रह्मदेवाचा ग्रंथ चोरून पाताळात लपवून ठेवला. ‘त्याला पाण्यामध्ये मनुष्य किंवा देवता मारू शकणार नाही’, असे वरदान होते. अशा वेळी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची उपासना केली. यातून श्री बगलामुखीदेवी अवतरली. देवीने बगळ्याचे रूप धारण करून त्या दानवाचा वध केला आणि ब्रह्मदेवाला त्यांचा ग्रंथ परत केला.

सत्ययुगात एकदा सृष्टीत भयंकर वादळ आले. या वादळाला शांत करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने तपश्‍चर्या करून श्री बगलामुखी देवीला प्रसन्न करून घेतले होते. लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने शत्रूनाशिनी श्री बगलामुखीदेवीचे पूजन केले आणि त्याला विजय प्राप्त झाला.’

२. सत्वर प्रसन्न होऊन भक्तांची संकटे दूर करणारी श्री बगलामुखीदेवी आणि तिची उपासना यांची वैशिष्ट्ये.

अ. शिव आणि श्री महाकालीदेवी यांच्या खालोखाल ही देवी लवकर प्रसन्न होते, असे म्हणतात. साधना करून लगेच काही प्राप्त करण्यासाठी या देवीचे स्तवन प्रामुख्याने करतात.

आ. बगलामुखी-ब्रह्मास्त्र मंत्रजप अतिशय मारक स्वरूपात म्हणतात. मंत्रजप करतांना म्हणणार्‍याची झोप उडेलच; पण ऐकणार्‍यालाही विलक्षण शक्तीत वावरत असल्याची जाणीव होते. विशेषतः या चैतन्यात त्याचीही झोप उडालेली असते.’ डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

इ. बगलामुखी- ब्रह्मास्त्र मंत्रजपाने शत्रूचा संहार होतो.

ई. हा मंत्रजप विन्मुख होत नाही; म्हणजे जे साध्य करण्यासाठी साधना करतात, ते साध्य झाल्याखेरीज रहात नाही; म्हणूनच याला ‘ब्रह्मास्त्र मंत्र’ असे संबोधतात. याचा गैरवापर कुणीही करू नये; म्हणून धर्मशास्त्राने ही देवी अन् तिची साधना यांविषयीची माहिती गुप्त ठेवली आहे.’- श्री. प्रेमप्रकाश सिंह, बीरमित्रापूर, ओडिशा.

उ. ‘श्री बगलामुखीदेवीचा रंग सुवर्णासारखा पिवळा आहे. त्यामुळे देवीला ‘पितांबरी’ असेही म्हणतात. देवीचे वस्त्र, प्रसाद आणि आसन यांपासून प्रत्येक गोष्ट पिवळीच असते. देवीला पिवळा रंग प्रिय आहे; म्हणून देवीच्या पूजनामध्ये पिवळ्या रंगाच्या साहित्याचा उपयोेग होतो. देवीची उपासना करतांना साधकाने पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे.

ऊ. श्री बगलामुखीदेवीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीचा समावेश आहे.

ए. देवीचे अनेक स्वरूप आहेत. या महाविद्यादेवीची उपासना रात्रीच्या वेळी केल्याने विशेष सिद्धी प्राप्त होते.

ऐ. देवीचे भैरव महाकाल आहे. देवी बगलामुखी भक्तांचे भय दूर करून शत्रू आणि अनिष्ट शक्ती यांचा नाश करते.

स्रोत: आंतरजाल, सनातन (हिंदु ) धर्म

एकावर एक फ्री

 सर्वच झाडे ऑक्सिजन देतात

परंतु

मोहाची, काजूची, जांभळाची,

माडाची, ताडाची झाडे त्यातही

स्वतःचं वेगळेपण ठेवतात, ही झाडे

ऑक्सिजन तर देतातच..

सोबत 

इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील

करून घेतात...!!!

🤣🤣🤣🤣🤣

आदी वंदू तुज मोरया

 


घरकाम करणारी सासू पाहिजे

 


दोन घडीचा डाव

 ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत - चतुर्दशी !


जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत - चतुर्दशी  !

            

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा...


थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगुन घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडु मोदक खाऊन घेऊया...


इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा...


मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद...


जातील निघुन सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला...


बाप्पा सारखं नाचत यायचे 

आणि लळा लावुन जायचे

दहा  दिवसांचे पाहूणे आपण 

असे समजून जगायचे...


किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख...


पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............

            

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

ये जीवन है





 

इतिहास

 स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड मोबाईल ॲपचेयेत्या सोमवारी लोकार्पण.

            मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाटय मंदिर येथे येत्या सोमवार, दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.

            लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या ‘अज्ञात पैलू’ तसेच मराठी, हिंदी, उर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित ‘यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

            या कार्यक्रमाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.

००००


 



Featured post

Lakshvedhi