Saturday, 3 September 2022

Good think

 

*There is a great difference between worry and concern*
*A worried person only sees a problem*
*But concern person solves problem*
            🌹🌹🌹🌹🌹
         *Good Morning*
*Have a healthy and wealthy Friday*

 पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळा.

            पुणे, दि. 2 : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम 2 अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम 2 अंतर्गत प्राप्त 90 ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ई-बसच्या वापरामुळे प्रवाशांना आरामदायी वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बसेसचे नागरिकांकडून स्वागत होईल. पुणे उद्योग आणि विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक शहर आणि एक महानगर म्हणून पुण्याचा विस्तार होत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे आवश्यक आहे. यासाठी पीएमपीएमएलची बससेवा महत्वाची ठरणार आहे                   प्रदूषण विरहीत वाहतूकीसाठी ई-बससेवा महत्वाची

            सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहीत होण्यासाठी ही बससेवा महत्वाची आहे. पीएमआरडीए क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक उपयुक्त ठरली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड सोबत महानगरात समाविष्ट झालेली गावे आणि इतरही ग्रामीण भागातील गावांमध्ये पीएमपीएमएलची बससेवा पोहोचली आहे.

            महानगरातील वाहतूक कोंडी सध्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुविधाजनक करणे हा त्यावरचा प्रभावी उपाय ठरू शकेल. त्यासाठी येत्या काळात ई-बससेवेचा विस्तार करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध प्रकल्पांना शासन गती देत असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

                   हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर-केंद्रिय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे

            ई-बस सेवा सुरू करण्यासाठी पीएमपीएमएलचे अभिनंदन करून केंद्रिय मंत्री डॉ.पांडे म्हणाले, फेम 2 अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उद्देश हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यामुळे विकसीत देश म्हणून ओळख होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सुविधा महत्वाची आहे. पुणे शहराने ई-मोबीलीटीच्या दिशेने सर्वात पहिले पाऊल उचलले ही गौरवास्पद बाब आहे.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचामृत’ संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनाबाबत उपाययोजनांवर भर दिला आहे. देशातील अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. हे उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान आहे.

            ऑटो उद्योगातही यादृष्टीने सुधारणा करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. देशात कोरोना नंतरच्या काळात या क्षेत्रात 75 हजार कोटींची नवी गुंतवणुक झाली आहे. इलेक्ट्रीक बॅटरीच्या क्षेत्रात चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवू

                                          -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या ॲपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल. ई-बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल.

            पीएमपीएमएल देशातील अग्रणी प्रकारची अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी सेवा म्हणून नावारुपास येणार आहे. ही बससेवा पुणेकरांच्या पसंतीस पडली आहे. या बसेसनी 2 कोटी किलोमीटर वाहतूकीचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्र सरकारने फेम 2 अंतर्गत ई-बसेससाठी मोठी सबसिडी दिल्याने लोकांवर अतिरिक्त बोजा पडला नाही. येत्या काळात अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही देशातील पहिली बससेवा ठरेल.

            राज्यातील पूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यायी इंधनाच्या सहाय्याने चालविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलने सर्व चार्जिंग स्टेशन सौर ऊर्जेवर रुपांतरीत करावे आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्रयांनी केले.

            मान्यवरांच्या हस्ते पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सुनिल कांबळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत करण्यात आलेल्या पुणे स्टेशन बस डेपो येथे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षालय इमारतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

            श्री.मिश्रा यांनी पीएमपीएमएल सेवेची माहिती दिली. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात क्षेत्रात पीएमपीएलच्या माध्यमातून 2000 बसेस चालविण्यात येतात. फेम 2 अंतर्गत नव्या 150 ई-बसेस प्राप्त होणार असून त्यापैकी ९० बसेसचे लोकार्पण होत आहे. ही प्रदूषणमुक्त आणि आरामदायी सेवा आहे. देशात ई-बसेसचा सर्वाधिक उपयोग करणारी पीएमपीएल ही देशातील अग्रगण्य संस्था आहे, असे त्यांनी सांगितले.

000


 


 



 






Friday, 2 September 2022

काय करणार, नाही ईलाज

 


फिफा फूटबॉल

 राज्यात फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार

                                                                                                         -क्रीडा मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबईदि. 2 : राज्यात 17 वर्षाखालील  फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य  आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री श्री.महाजन बोलत होते.

            मंत्री श्री.महाजन म्हणाले, 17 वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2022 या स्पर्धेत भारतचीनजपानमोरोक्कोनायजेरियाटांझानियाकॅनडामेक्सिकोयुनायटेड स्टेट्सब्राझीलचिलीकोलंबियान्यूझीलंडफ्रान्सजर्मनी आणि स्पेन हे 16 देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण पाच सामने राज्यात होणार आहेत. नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर हे सामने होणार आहेत.

            स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित अधिकारी यांना मंत्री श्री.महाजन यांनी प्रत्येक विभागाच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याने देशातील अतिमहत्त्वाचे लोक हे सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थास्टेडियमवाहतूकनिवाससुशोभीकरणअग्निशमन व्यवस्था व रस्त्याची दुरुस्तीवैद्यकीय व्यवस्थास्पर्धा प्रसिद्धी, विविध समित्यांचे गठन आदी विषयांचा आढावा मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी घेतला.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, स्पर्धा केवळ सहभागी खेळाडूंनाच फायद्याची नाही तर संबंधित यजमान राष्ट्रांसाठीही खूप मोलाची ठरणार आहे. या महिला विश्वचषकाने तळागाळातील अधिक तरुण मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच महिला फुटबॉलचे व्यावसायिक मूल्य वाढवले ​​आहे. नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेतील ठाणे व रायगड जिल्ह्यातील, शालेय विद्यार्थ्यांना हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल, असे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी आयोजन समितीला दिल्या.

            भारत 2022 च्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) अशाप्रकारे आगामी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन घेतला आहे, जेणेकरून देशाला अभिमान आणि गौरव मिळेल.  पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा विकासाचा एक केंद्रबिंदू असतानादेशातील महिला फुटबॉलचा लँडस्केप बदलण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

        अशाप्रकारे सकारात्मक वारसा मागे ठेवण्यासाठी विविध उद्दिष्टे ठेवली गेली आहेत.  फुटबॉल नेतृत्व आणि निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणेअधिक मुलींना भारतात फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे, लहानपणापासून समान खेळाची संकल्पना सामान्य करून सर्व समावेशक सहभागासाठी प्रयत्न करणे, भारतातील महिलांसाठी फुटबॉलचा दर्जा सुधारण्याची संधी निर्माण करणे, महिलांच्या खेळाचे व्यावसायिक मूल्य सुधारणे, प्रत्येक उद्दिष्टाची काळजी घेऊन स्थानिक आयोजन समितीने सर्व आघाड्यांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.

            या आढावा बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नवीन येणारे आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, फिफाचे प्रतिनिधी रोमा खानक्रीडा विभाग, नवी मुंबई पोलीसमहानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000



 

 


अभिवादन

 आयएनएस विक्रांतचे जलावतरण हेछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांनी नौदलासहभारतीय सेनेला दिल्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 2 : संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठीमहाराष्ट्रासाठी अभिमानाचागौरवाचा क्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

            मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशालीआत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मनापासून शुभेच्छा आणि मानाचा मुजरा असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

            उपमुख्यमंत्री संदेशात म्हणतात, 'आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावीहा संकल्प केला होता. हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे.

            सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव यानिमित्ताने झाला!'

000

 

 

महावाणिज्य दूत

 अद्भुत अनुभूती!" गणरायांच्या दर्शनानंतरनीमहवणीज्य व्यक्त केली प्रतिक्रिया

विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन.

            मुंबई, दि. 2 : विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून "अद्भुत अनुभूती" आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या गणपतीजवळ श्री.लोढा यांनी महावाणिज्य दूतांचे स्वागत करून त्यांना भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातील वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. या उत्सवाची जगात सर्वत्र ओळख होऊन त्याचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने महावाणिज्य दूतांना गणरायांचे दर्शन घडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि हा जगभरातील सर्वात मोठा उत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदी उपस्थित होते.

            कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी राज्यात हा सण पुन्हा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत देशाबाहेरही मोठे आकर्षण असल्याने मंत्री श्री.लोढा यांच्या संकल्पनेतून विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक परंपरेची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत आज पहिल्या टप्प्यात दहा देशांचे महावाणिज्य दूत सहभागी झाले होते.

            यामध्ये इस्रायलचे कोब्बी शोशानी, स्वित्झर्लंडचे मार्टिन मायेर, अर्जेंटिनाचे गिलरमो दिवोटो, बेलारूसचे अँटोन पोस्कोव, बांगलादेशचे चिरंजीब सरकार, ऑस्ट्रेलियाचे पिटर ट्रुस्वेल, पोलंडचे दामियन इरझ्यक, श्रीलंकाचे वलसान वेथोडी आणि इंडोनेशियाच्या महावाणिज्य दूतांचा तर ब्रिटनच्या डेप्युटी हेड ऑफ मिशन कॅथरीन बार्न्स यांचा समावेश होता. त्यांनी आज माटुंगा येथील सुवर्ण गणेश अशी ओळख असलेल्या जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा तसेच गिरगावच्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले. सर्व गणेश मंडळांच्यावतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांना या उत्सवाबाबत माहिती देण्यात आली.

            व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी प्रथम गुरूनानक खालसा महाविद्यालय येथे आयोजित समारंभात महावाणिज्य दूतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली. महावाणिज्य दूतांनी आपल्या देशात या उत्सवाचा प्रसार करावा जेणेकरून हा उत्सव जगभर पोहोचून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक महाराष्ट्रातील येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Featured post

Lakshvedhi