Wednesday, 31 August 2022

पाहणी

 तोरणा’ बंगल्यात पोलिसांसाठी असलेल्या सुविधांची

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करा.

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

            ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. डावखर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.

            ‘वर्षा’ आणि ‘तोरणा’ या शासकीय निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवले असून या पोलीस - अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास कक्ष, दुमजली बेड (बंक बेड), वातानुकूलित यंत्रे, ध्यानधारणेसाठी कक्ष अशा सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे निर्देश देतानाच हे काम रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

००००






 

गणेश पूजन

 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पूजा

            मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.

            यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

            आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्र्यां






नी सांगितले.

गणराय प्रतिष्ठापना

 महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायाचे उत्साहात आगमन.

            नवी दिल्ली, दि. 31 : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग व येथील महाराष्ट्र सदन निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व परिक्षेत्रात दिसून आले.

              महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.

                  महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

               दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास 30 मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम

                   दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितीक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.  


000000

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पूजा.

            मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.

            यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

            आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

.......

गणेश मंडळ पुरस्कार

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

स्पर्धेसाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

 

            मुंबईदि. 31 : गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            श्री. मुनगंटीवार म्हणालेसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यापूर्वी 30 ऑगस्ट 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु वाढता प्रतिसाद आणि मुदतवाढीची मागणी विचारात घेऊन सदर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता 2 सप्टेंबर करण्यात येत आहे.

            राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाखद्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

            या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक २ सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईलअशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

००००


 

सुखदायक


 

थेट भेट राजदूत

 लक्झेम्बर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

            मुंबई, दि. 30 : लक्झेम्बर्गच्या भारतातील राजदूत श्रीमती पेगी फ्रँझेन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

            लक्झेम्बर्ग आणि भारतातील संबंध व सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

            यावेळी लक्झेम्बर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्स‍िस बिलिमोरिया तसेच कॉन्सिलर स्टीव्ह हॉशे उपस्थित होते.

००००

Ambassador of Luxembourg meeets Maharashtra Governor.

            Peggy Frantzen, Ambassador of the Grand Duchy of Luxembourg met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Tuesday (30 Aug).

            Opportunities for cooperation and collaboration between India and Luxembourg were discussed during the meeting.

            Honorary Consul of the Grand Duchy of Luxembourg in Mumbai Perses Bilimoria and Counsellor Steve Hoscheit were present.



Featured post

Lakshvedhi