Wednesday, 31 August 2022

G 20

 जी - 20 परिषदेतील कार्यक्रमबैठका

पुणेमुंबईऔरंगाबादमध्ये होणार

सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे

मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 30 : जी - 20 देशांच्या प्रतिनिधींची पुढील वर्षी मुंबईपुणे आणि औरंगाबाद येथे परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रम यांचे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावेअशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे केल्या.

            या परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

            बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमयेप्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरपर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायरनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीउच्च आणि तंत्रशिक्षण सचिव विकास चंद्र रस्तोगीआदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादवउद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

            मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले कीजी - 20 परिषदेदरम्यान होणार्या विविध बैठका कार्यक्रमांना येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचेऔद्योगिक गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या संधीचे आणि पर्यटन स्थळांची माहिती सादरीकरण करण्यासाठी नियोजन केले जावे. यासाठी उद्योगसांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने साहित्य निर्मिती करावी. त्याचे विविध भाषेत भाषांतर करुन घ्यावे.

            परिषदेतील कार्यक्रमबैठका मुंबईपुणे आणि औरंगाबाद येथे होणार आहेत. या शहरांचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी विशेष प्रयत्न करावे. तसेच यासाठी पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने संबंधित ठिकाणी सर्व नियोजन करावेअशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या.

            या परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी ऐतिहासिकसांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात. त्यामुळे अशा स्थळांचा विकाससौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावेअशा सूचना त्यांनी दिल्या.

******



 

प्रथम तुला वंदितो


Share by. मंजू पांत .

व्यवसाय संधी

इज ऑफ डुईंग बिजनेस’  च्या माध्यमातूनव्यवस्था निर्माण करणार

                    - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 30 : मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            बॅालिवूड चित्रपट सृष्टीतील नामांकित 67 वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अमृता फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, रसिकप्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व मनोरंजनाची राजधानी म्हणून ओळखली जाते, याचा अभिमान आहे. जगभरात हिन्दी चित्रपटसृष्टीचा नावलौकीक आहे. मात्र, आता मराठी, तेलगु, तमिळ अशा देशांतल्या विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीदेखील मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करीत आहेत. मनोरंजन क्षेत्र बदलत्या नव्या युगातून पुढे जात आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारे देखील हे क्षेत्र आहे. ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असून नवीन सरकार सर्वसामान्यांबरोबर चित्रपटसृष्टीचे देखील आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            दादासाहेब फाळके यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विषद करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर प्राप्ती होते. या क्षेत्राला चांगल्या सुविधा देण्यासाठी आगामी काळात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. मुंबईत असलेली चित्रनगरी येत्या काळात अधिक प्रगती करेल. देशात जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यापासून चित्रनगरीच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मोठ्या प्रमाणात जीएसटी प्राप्त झाला. आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रनगरीच्या व्यवसायात मोठी वाढ होईल. चित्रपट निर्मितीसाठी अनेकवेळा परदेशात जावे लागते, अशा चित्रपटांची निर्मिती देशात आणि महाराष्ट्रात होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी बॅालिवूड चित्रपट जगतात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई यांना ‘फिल्मफेअर’चा जीवनगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

०००००




घरे घ्या घरे पोलीस

 बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना

केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर

अवघ्या पाच दिवसात शासन निर्णय जारी

 

            मुंबईदि. ३० : बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.

            बी. डी. डी. चाळींमध्ये दि.१ जानेवारी २०११ पर्यंत वास्तव्यास असणाऱ्यांना बी. डी. डी. चाळींच्या पुनर्विकासांतर्गत ५०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या पुनर्विकसित गाळ्याचे वितरण मालकी तत्त्वावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            सेवेत कार्यरतसेवानिवृत्त व दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कायदेशीर वारस या बी. डी. डी. चाळीत वास्तव्यास असल्याने त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची होती.

            नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये दि. २५ ऑगस्ट रोजी अंतिम आठवडा प्रस्तावावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या घरांच्या किंमतीची घोषणा केली होती. पोलीसांकडून किंवा त्यांच्या वारसांकडून पुनर्विकसीत गाळ्याच्या बांधकाम खर्चाची रक्कम आकारण्यात येईलअसे सांगून फक्त १५ लाख रुपयांमध्ये हे घर देण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

            वरळीनायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पोलीस सेवानिवासस्थानाच्या बदल्यात कायमस्वरुपी देण्यात येणाऱ्या पुनर्विकसित सदनिकेसाठी आकारण्यात येणाऱ्या बांधकाम खर्चामुळे म्हाडास होणारा तोटा पुनर्विकासानंतर प्राप्त होणाऱ्या शासनाच्या हिश्यामधील म्हणजे शासन व म्हाडा ७०:३० टक्के नफ्यातून वर्ग करण्यात येईलअसेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

००००



वृत्त क्र. 2450

 

मनोरंजन क्षेत्रात इज ऑफ डुईंग बिजनेस’ 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर

अवघ्या पाच दिवसात शासन निर्णय जारी.

            मुंबई, दि. ३० : बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.

            बी. डी. डी. चाळींमध्ये दि.१ जानेवारी २०११ पर्यंत वास्तव्यास असणाऱ्यांना बी. डी. डी. चाळींच्या पुनर्विकासांतर्गत ५०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या पुनर्विकसित गाळ्याचे वितरण मालकी तत्त्वावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त व दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कायदेशीर वारस या बी. डी. डी. चाळीत वास्तव्यास असल्याने त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची होती.

            नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये दि. २५ ऑगस्ट रोजी अंतिम आठवडा प्रस्तावावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या घरांच्या किंमतीची घोषणा केली होती. पोलीसांकडून किंवा त्यांच्या वारसांकडून पुनर्विकसीत गाळ्याच्या बांधकाम खर्चाची रक्कम आकारण्यात येईल, असे सांगून फक्त १५ लाख रुपयांमध्ये हे घर देण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

            वरळी, नायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पोलीस सेवानिवासस्थानाच्या बदल्यात कायमस्वरुपी देण्यात येणाऱ्या पुनर्विकसित सदनिकेसाठी आकारण्यात येणाऱ्या बांधकाम खर्चामुळे म्हाडास होणारा तोटा पुनर्विकासानंतर प्राप्त होणाऱ्या शासनाच्या हिश्यामधील म्हणजे शासन व म्हाडा ७०:३० टक्के नफ्यातून वर्ग करण्यात येईल, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

००००







नवरा जोमात , बाकी कोमात


 

Tuesday, 30 August 2022

उठा उठा हो गजनाना

 


खेल खेला

 व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा

- गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 29 : मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा या दिवशी जन्म झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचे देशातील हॉकी खेळासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला होता आणि हॉकीमध्ये तीन वेळा देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. क्रीडा दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती हे द्रोणाचार्य, मेजर ध्यानचंद आणि अर्जुन पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करतात. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्त्व आहे. सरकारने ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कार देवून गौरविले आहे.

राष्ट्रकुल आणि खेलो इंडिया स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेत मोठी वाढ

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा या राज्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता देत असलेल्या बक्षिस रक्कमेच्या तुलनेत राज्य देत असलेली रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडुंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडुंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेच्या पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंना पूर्वीपेक्षा तिप्पट रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभिर्याने बघतात.

अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा

            स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो” जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो असे त्यांनी सांगितले.

            खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्त्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चर्च गेट येथील हॉकी मैदानात अभिवादन आणि हॉकी सामन्यास सुरूवात

            तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी चर्च गेट येथील हॉकी मैदानात सकाळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हाँकी सामना खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देवून सामना सुरू केला.

            या कार्यक्रमास शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सचिव रणजित सिंह देओल तसेच पुरस्कार प्राप्त खेळाडू एम. एम. सोमय्या, कमलेश मेहता, प्रदीप गंधे, जय कवळी डॉन बास्को शाळेच मुख्याध्यापक फादर क्रीस्पियानो आदींची उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थींनींनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक उपसंचालक स्नेहल साळुंके, सूत्रसंचालन प्रियंका बुवा यांनी तर आभार मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार

            एम. एम. सोमय्या हॉकी ऑलिंपिक सुवर्णपदक प्राप्त खेळाडू, कमलेश मेहता टेबल-टेनिस अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रदिप गंध बॅडमिंटन ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू, जय कवळी बाक्सिंग बाक्सिंग ऑलिंपिक स्पर्धा, हिमाजी परब अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लखांब, शिवाजी पाटील फुटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, वर्षा उपाध्ये रिदमिक जिमनॅस्टीक्स शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक, प्रशांत मोरे कॅरम जागतिक विजेतेपद प्राप्त खेळाडू, अब्दुल हमिद खान - बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, नताशा जोशी - नेमबाजी डेफ ऑलिंपिक्स सहभाग, रिचा रवी बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू, वैभवी इंगळे - तलवारबाजी जागतिक कॅडेट स्पर्धा, सौम्या परुलकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा सानिया कुंभार रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, मिहिका बांदिवडेकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, वैभवी बापट रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, सृष्टी पटेल रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, जान्हवी वर्तक रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, निश्का काळे रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा. या खेळाडूंचा सत्कार यावेळी क्रीडा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

000000

Featured post

Lakshvedhi