Monday, 29 August 2022

World आर्चरी असो

 आज *राष्ट्रीय क्रीडा दिन* या निमित्ताने महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,रायगड जिल्ह्याचे लाडके आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले आहे. सदर खेळाडू *जागतिक फिल्ड आर्चरी स्पर्धा 2022* एस्टोनिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत १३  वर्ष खलील मुले या गटात *कु. सर्वेश निवास थले* (कुर्डूस, अलिबाग) रौप्यपदक मिळून रायगड जिल्हा शिरपेचात मानाचा तुरा रौला आहे.तसेच *कु. बाळू भाऊ ढेबे* (शिरवली, माणगाव) ९ व्या स्थानी राहिला आहे. हे दोन्ही खेळाडू *बावलेकर आर्चरी अकॅडमी* मध्ये आर्चरी चे शिक्षण घेत आहे.



एक पेग only for बायकोसाठी


 

अभिवादन


 

व्यापार वृध्दी

 भारत-अमेरीका दरम्यान व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण - राजदूत तरणजित सिंह संधु


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे वॉशिंग्टन येथे शुभारंभ

स्वातंत्र्यदिन समारंभात ललित गांधी व शिष्टमंडळाला विशेष सन्मान

मुंबई ः भारत-अमेरीका दरम्यान द्विपक्षीय व्यापार वृध्दिसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चा ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन अमेरीकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधु यांनी केले.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ तर्फे भारत-अमेरीका व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करण्यात आली असुन या फोरम च्या बोधचिन्हाचे वॉशिंग्टन डीसी येथील इंडिया हाऊस येथे अनावरण करून या फोरम चा औपचारीक शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ललित गांधी, उमेश दाशरथी, भाऊसाहेब, कालवाघे, मयंक गुप्ता, नितिन इंगळे उपस्थित होते.
अमेरीकेतील भारतीय दुतावासातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभास ललित गांधी व महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विशेष अतिथि म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
ललित गांधी यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अमेरीकेतील गुंतवणुकदार व उद्योजकांनी लाभ घ्यावा असे सांगुन अमेरीकेच्या राजधानीत भारतीय दुतावासात संपन्न होत असलेल्या भव्य स्वातंत्र्य दिन समारंभात सहभागाची संधी मिळणे हा विशेष गौरवपुर्ण सन्मान असल्याचे नमुद केले.
भारतीय राजदुत तरणजित सिंह संधु यांनी भारत एक नवसामर्थ्यशाली देश म्हणुन पुढे येत असुन भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था व स्थित प्रशासन यामुळे भारतात उद्योग वाढ वेगाने होत आहे. इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम च्या माध्यमातुन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ च्या प्रयत्नांना भारतीय दुतावास व अमेरीकेतील सर्व कॉन्सुलेट जनरल कार्यालये सक्रीय सहकार्य करतील असे आश्‍वासन दिले.

फोटो कॅप्शन ः महाराष्ट्र चेंबरच्या ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना अमेरीकेतील भारतीय राजुदत तरणजित सिंह संधु सोबत ललित गांधी, उमेश दाशरथी, नितिन इंगळे, भाऊसाहेब कालवाघे, मयंक गुप्ता इ. 


पाहुणे येती घरा



 सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

            मुंबई, दि. 29 : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटन मंत्री बेदू सिंग पंथ हे देखील उपस्थित होते. तमांग यांनी राज्यपालांना सिक्कीमच्या प्रसिद्ध थांका चित्रशैलीचे पेंटिंग भेट दिले.

००००

Sikkim Chief Minister meets Maha Governor

            Chief Minister of Sikkim Prem Singh Tamang (Golay) met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Tamang was accompanied by Sikkim's Tourism Minister Bedu Singh Panth. CM Tamang presented to the Governor Sikkim's traditional Thangka painting.

0000


विकास टप्पा

 मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश.

            मुंबई, दि. 29 : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट ट्रेन) संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय 30 सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूम मधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

            प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो त्याचप्रमाणे लोकांना सुविधा मिळण्यास देखील उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

आजच्या बैठकीत रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर, पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. 

बुलेट ट्रेन : भूसंपादन, मोबदला विषयक कामांना गती द्या

            मुंबई ते अहमदाबाद असा 508.17 कि.मी. लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) असून यासाठी एक लाख 8 हजार कोटी खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 12 स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील 4 स्थानके आहेत. मुंबईतील 1 स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. यासाठी जपान सरकारने कर्ज दिले असून 50 टक्के खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर 25 टक्के वाटा महाराष्ट्र आणि 25 टक्के गुजरात सरकार उचलणार आहे. यासाठी एमएमआरडीए मधील 4.8 हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी 30 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरण या बाबी देखील पालघर तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो मार्गासाठी भूसंपादन वेगाने करा

            आजच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-3, 4,5,6,9 आणि 11 यांचा त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व), यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-4 तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-5 या मार्गांसाठी भूसंपादन व हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.  

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग

            वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी प्रकल्पाची किंमत 1096 कोटी रुपये इतकी वाढली असून या संदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी आणावा असे आदेश देतानाच त्यांनी वन विभागाशी संबंधित प्रलंबित बाबींही तातडीने निकाली काढण्याच्या सूचना वन विभागास दिल्या. या रेल्वे मार्गासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा वाटा राज्य सरकारने यापूर्वीच दिला आहे. 

            शिवडी-वरळी जोड रस्ता तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याला देखील वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एमटीएचएलचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

जलवाहिन्यांच्या कामाला गती द्यावी.

            सूर्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आली असून पुढच्या वर्षीपासून नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होईल. मात्र यासाठी वसई-विरार महानगरपालिका तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तातडीने जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा व इतर प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा

            या बैठकीत पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा दोन महिन्यात सादर करावा, जेणेकरुन या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा देता येणे शक्य होईल. जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटन विभागाशी समन्वयाने या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

पुणे-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे

            या मार्गाला निती आयोगाने देखील एप्रिल 2022 मध्ये मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. यासाठी देखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वन जमिनीचे हस्तांतरण या बाबींना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

या व्यतिरिक्त पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो तसेच विमानतळ या कामांबाबत देखील या वॉर रुम बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले.

            या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi