Tuesday, 9 August 2022

 गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांची भेट.

सर्वसामान्यांना उभारी देणाऱ्या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे

बँकेत रुपांतर करण्यासाठी शासन मदत करणार

   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            नांदेड, दि. 8 : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असून सर्वसामान्य माणसाला उभे करणाऱ्या अशा संस्थांचे बँकेत रुपांतर व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

            याप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर - घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, यांची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन सोसायटी ही पतसंस्था न राहता तिचे बँकेत रूपांतर झाले पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पाहिली 'उंच भरारी तुमच्या सोबत गोदावरी' ही चित्रफीत

            गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयात ' घ्या उंच भरारी तुमच्यासोबत गोदावरी' ही गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी 15 मिनिटाची चित्रफित मुख्यमंत्र्यांनी पाहिली. पाच राज्यात विस्तार, 85 शाखा ही संस्थेची कौतुकास्पद कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००



 



 

 There's a difference between knowing the path and walking the path.........


Good Morning.

Monday, 8 August 2022

जय उलटा हनुमान

 *हनुमानाची उलटी मुर्ती* . . मित्रांनो, भारतात भगवान हनुमान यांची खुप आणि सर्वत्र मंदिरे आहेत पण भगवान हनुमानाचे एक खास मंदिर आहे, जो सावेर नावाच्या ठिकाणी आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानजीची उलटी मूर्ती स्थापित केलेली आहे आणि या कारणास्तव हे मंदिर मालवा प्रदेशात उलटा हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे.


येथे हनुमान मंदिरातील स्थापित मूर्तीच्या अगदी खाली पाताळ लोकाकडे जाण्याचा मार्ग आहे असे सांगितले जाते. येथील हनुमानजी स्थापित केलेल्या मूर्तीचे मुख हे जमिनीकडे आणि पाय आकाशासारखे आहेत. तसेच या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती रामायण काळातील आहे.


इंदूर शहरापासून 30 किमी अंतरावर सावेर गावात हे अद्भुत हनुमान मंदिर आहे. या प्राचीन मंदिरातील हनुमानजीची मूर्ती जगातील एकमेव उलटी मुर्ती आहे आणि ती लोकांमध्ये श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते. येथील लोकांच्या मते, जर एखादी व्यक्ती या मंदिरात बजरंगबलीच्या दर्शनासाठी 3 ते 5 मंगळवार सतत येत असेल तर त्याचे सर्व दु: ख दूर होतात. तसेच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

रामायण काळात जेव्हा भगवान श्री राम आणि रावण यांच्यात यु-द्ध सुरु होते, तेव्हा राक्षसांचा राजा रावणाने एक युक्ती करून स्वत: चे रूप बदलुन भगवान रामाच्या सै-न्यात सामील झाला. मग यानंतर, जेव्हा रात्रीच्या वेळी सर्वजण झोपल्यानंतर रावणाने श्री राम आणि लक्ष्मण यांना आपल्या सामर्थ्याने बेशुद्ध केले आणि त्यांचे अपहरण केले आणि आपल्या बरोबर त्यांना पाताळ लोकात घेऊन गेला.


जेव्हा ही गोष्ट वानर सै-न्याला कळली तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. परंतु हनुमानजी भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकामधून शोधून काढले आणि तेथे अहिरावणांचा पराभव करून त्याचा व-ध केला. मग पाताळ लोकातून भगवान राम आणि लक्ष्मण जी यांना परत आणले.


असे म्हणतात की हनुमान सावेर या ठिकाणाहून पाताळ लोक मध्ये गेले होते. त्यावेळी, हनुमान जीचे पाय आकाशाकडे, मुख जमीनीच्या दिशेने होते, त्या कारणास्तव त्यांच्या उलट्या मूर्तीचे पूजन अजूनही या ठिकाणी केले जाते.


आजही या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच काही रिसर्च नुसार ही मूर्ती रामायण काळातील आहे हे सिद्ध देखील झाले आहे.


 *रामभक्त हनुमान की जय, बजरंगबली हनुमान की जय.*

*!!🚩श्रीराम जय राम जय जय राम🚩!!*

■■■■🙏🏽🙏🏽🙏🏽


ऋण सामाजिक

 *वरसोली किनारा झाला स्वच्छ*

दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर झेंडा या कार्यक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालय, वारिसे क्लासेस माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग, फॉरेस्ट ऑफिस, महा सेना ग्रुप वरसोली ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त वर्सोली किनारा तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच प्लास्टिक मुक्ती ची शपथ घेण्यात आली. वारिसे क्लासेस चे माजी व आत्ताच्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवत वर्सोली किनारा स्वच्छ करण्यात आला.

 माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेबद्दल मुलांना मार्गदर्शन केले तसेच प्लास्टिक चा वापर कमी करण्याबद्दल देखील माहिती दिली व प्लास्टिक कचरा करणार नाही व लावलेल्या झाडांचे संगोपन नीट रित्या करण्याची शपथ देण्यात आली.

 या कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महा सेना ग्रुप नी प्लास्टिक गोळा करत जेसीबीच्या साह्याने आजूबाजूला पडलेले कचरा एका ठिकाणी करून ठेवले. गोळा झालेले प्लास्टिक पुनर्निर्मिती करीता पाठविण्यात आले व इतर कचरा गोळा करून घंटागाडी ने नेण्यात आले.

 कार्यक्रमाच्या शेवटी वारीसे सरांनी सर्वांचे आभार मानत असेच सामाजिक कार्य पुढे चालू राहावे असे आवाहन केले

ऋण सामाजिक

 


माणुसकी प्रतिष्ठान वरसोली बिच सफाई

पा न च ट

 






Featured post

Lakshvedhi