Monday, 8 August 2022

In veseel rule


 

हर घर तिरंगा.

 हरघर तिरंगा

        नवी दिल्ली, दि.7- दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.

            येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सकाळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मुख्य सचिव श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मातरम्’ , ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. या घोषणांनी महाराष्ट्र सदन निनादले. 


            दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून राज्यात साजरे केले जाणारे सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथेही सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते. ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली स्थित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषीक मान्यवरांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचार-प्रसार महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवरुन प्रसृत करण्यात येणार आहे.


00000



 

 Relationship is a silent gift of nature....

More older more Stronger, More care more respect, Less words more Understanding.. Less meeting more Feelings.

        Good morning 🌹

सुप्रभात

 


लाच प्रतिबंध

 IF ANY CENTRAL GOVT / BANK / INSURANCE OR CENTRAL GOVT. UNDERTAKING EMPLOYEE DEMANDS BRIBE,

PLEASE COMPLAIN TO CBI ANTI CORRUPTION BRANCH MUMBAI ON MOBILE NO. 8433700000 THROUGH CALL / SMS / WHATSAPP OR EMAIL TO sp1acmum@cbi.gov.in.

Sunday, 7 August 2022

?


 

मैत्री दीन नव्हे

 क्षीरेणाSSत्मगतोदकाय हि गुणा दत्ताः पुरा तेSSखिलाः

क्षीरे तापमवेक्ष्य तेन पयसा ह्यात्मा कृशानौ हुतः |

गन्तुं पावकमुन्मनस्तदभवद्द्ष्ट्वा तु मित्राSSपदं 

युक्तं तेन जलेन शाम्यति सतां मैत्री पुनस्त्वीदृशी ||

                   भर्तृहरि (नीति शतक )


दुधात पाणी मिसळल्यानंतर दूध आपले सारे गुण पाण्याला बहाल करते. आगीने तप्त होऊन आपल्याबरोबर उकळत असलेल्या पाण्याची आग शांत करण्यासाठी दूध उतू जाऊन आग विझवायला धावतं. 

 सज्जन आणि महान व्यक्तींची मैत्री अशीच लाभदायक असते...


जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

Featured post

Lakshvedhi