Tuesday, 2 August 2022

दिव्यांग समन्वयक

 दिव्यांग कल्याण आयुक्तालयातराज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

       मुंबई, दि. 01 : दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा commissioner.disability@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे.

        या पदासाठी शैक्षणिक अर्हता- संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

          या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.

          अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड,



 मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. १ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :

            पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्हयामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत.

            सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. तसेच गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

 खेळाडू पुरस्कार

            खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगतपूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरिष्ठ / कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ठ तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

            वरील प्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/२८८७११०५ यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळवले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी खालील खेळांचा विचार केला जाईल

            मुष्टीयुध्द (बॉक्सींग),धनुर्विद्या (आर्चरी), मैदानी क्रीडा स्पर्धा (अॅथलेटिक्स),क्रिकेट,बॅडमिंटन, फूटबॉल, बिलियर्डस, हँडबॉल,कॅरम,हॉकी,बुध्दीबळ (चेस), ज्युदो,कबड्डी,सायकलिंग,तलवारबाजी (फेन्सिंग),कनोईंग / कयाकिंग,गोल्फ, खो खो,जिम्नॅस्टिक,भारोत्तोलन (पॉवरलिफ्टींग),अश्वारोहण (हॉर्स रायडिंग),रोईंग, लॉन टेनिस, तायक्वांदो मल्लखांब, व्हॉलीबॉल,नेमबाजी (शुटींग), वजन उचलणे (वेटलिफ्टींग) कुस्ती (रेसलिंग), स्केटिंग, वुशू, जलतरण स्विमिंग) (डायव्हिंग, वॉटरपोलो), टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, ट्रायथलॉन, रबी, मॉडर्न, पेंटॉथलॉन, आट्यापाटया, बास्केटबॉल, बेसबॉल, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डींग),स्पोर्ट क्लाइंबिंग या प्रकारच्या पुरस्कारासाठी विचचार केला जाईल.


0000000


 



निवेदन राज्यपाल

 प्रसिद्धीसाठी निवेदन :

            दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.

            महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

            गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

            परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

            महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.


 

नाग राजे

 *नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी 🐍 नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत।*

●१• नागराजा अनंत (शेष)

●२• नागराजा वासुकी 

●३• नागराजा तक्षक

●४• नागराजा कर्कोटक

●५• नागराजा ऐरावत

*ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.* 

*यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.*

*त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.*

*तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.*

*चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.*

*पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.*

*ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.*

*पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत.*

*कालांतराने वैदिक धर्माच्या लेखकांनी नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणार्या 🐍सापात करुण टाकले.*

*त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या 🐍 सापांची पंचमी म्हणून ओळखली जावू लागली आणि वास्तविक नाग वंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.*

*आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.*

 *हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत.*

*आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.*

             आपण सर्व जातीचे बहुजन समाजाचे लोक नागवंशीय आहोत. सम्राट अशोकाने हे उत्सव सुरू केलेत. जागृत व्हा!!!!!!!!. जयभीम

नाग गाव



 नागाव, अलिबाग 

मुलाचा बाप डोक्याला ताप

 


Monday, 1 August 2022

आयटीआय प्रवेश

 आयटीआय प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

            मुंबई दि. 1: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरीता 27 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे.

            मुंबई विभागाच्यावतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने श्री. दुर्गे यांनी ही माहिती दिली.

            नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (एडीट) करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी संकेतस्थळावर 1 ते 27 ऑगस्ट 2022 पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे श्री. दुर्गे यांनी सांगितले.

            मुंबई विभागातील 7 जिल्ह्यात 67 शासकीय आयटीआय असून यामध्ये 49 सर्वसाधारण आयटीआय, 3 महिलांकरिता आयटीआय, 10 आदिवासी आयटीआय, 2 अल्पसंख्याक आयटीआय, 3 आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात 39 खाजगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये 20 हजार 184 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            29 जुलै 2022 पर्यंत केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाकरीता मुंबई विभागातील एकूण 67 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील 12 हजार 394 उमेदवारांना प्रवेश वाटप करण्यात आले असून 1 ऑगस्टपर्यंत 2 हजार 157 उमेदवारांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेश 3 ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे.

            विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रवेश निवड यादी व अन्य माहितीकरीता विभागाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.

            आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या 30 टक्के जागा महिला उमेदवारांकरीता राखीव आहेत. तसेच विभागातील 2 अल्पसंख्याक आयटीआयमध्ये 70 टक्के जागा अल्पसंख्याक समूहाकरीता उपलब्ध आहेत. आदिवासी समूहाकरीता 10 संस्थांमध्ये 75 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

            विभागातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. दुर्गे यांनी केले आहे. 


o

Featured post

Lakshvedhi