🌞*सुप्रभात 🌞*
*सुखी माणसाचा सदरा कुठेच विकत मिळत नाही, तो आपला आपल्यालाच शिवावा लागतो ,*
*...आपल्या "स्वभावाच्या" मापाने आणि ;. "भावनांच्या" धाग्यांनी.*
🌹 🙏 *शुभ सकाळ 🙏🌹
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
व्यापार उद्योगाला पूरक धोरण राबवणारे सरकार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
जीएसटी , प्लास्टिक बंदी व एपीएमसी कायदा हे व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार*
राज्यातील व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राला पूरक असे आमचे सरकार असून राज्यातील व्यापार उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे आणि त्यांना चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल तसेच जीएसटी , प्लास्टिक बंदी व एपीएमसी कायदा हे व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची घोषणा महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर ची माहिती दिली तसेच जीएसटी तरतुदी संबंधित अडचणी बाजार समिती कायदा प्लास्टिक बंदी यामुळे व्यापार उद्योगात होत असलेल्या अडचणींची माहिती थोडक्यात दिली. अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करावे एपीएमसी कायद्यात बदल करण्यात यावा रद्द करण्यात यावा व प्लास्टिक बंदी स्थगिती द्यावी जोपर्यंत प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्लास्टिक बंदीचा मिळण्याला स्थगिती देण्याची मागणी अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे अमेरिकेमध्ये आयोजित बिजनेस कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.
महाराष्ट्र चेंबर तर्फे 2 ते 11 डिसेंबर 22 दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो च्या माहितीपत्रकाचे अनावरण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र चेंबरने राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरने कृषी पूरक उद्योग यांच्या विकासासाठी काम करावे. राज्यातील कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल. राज्यामध्ये वाढ गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल एग्रीकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापारी महापरिषद छत्रपती संभाजीनगर सागर लॉन, जालना रोड येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी,उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल मालानी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे विजय जयस्वाल, घनश्याम गोयल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया यांनी बाजार समिती कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली तसेच जीएसटी विषयी उमेश शर्मा यांनी माहिती दिली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आभार प्रदर्शन महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी केले.
महाराष्ट्र व्यापारी महापरिषदेला मोठ्या संख्येने राज्यातून व्यापारी उपस्थित होते.
* चौकट*
१)अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार.
2)प्लास्टिक बंदी च्या कायद्याचे अवलोकन करून त्याबाबत योग्य त्या दुरुस्ती करण्यात येईल.
3)महाराष्ट्र चेंबर तर्फे आयोजित या परिषदेमध्ये जीएसटी कर रद्द करणे प्लास्टिक बंदी ला स्थगिती देणे या तीन महत्त्वाच्या विषयां सह अन्य विषयावर महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्या समवेत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
फोटो कॅप्शन
1) महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,आमदार अब्दुल सत्तार, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जयस्वाल, प्रफुल्ल मालानी आदि.
2) महाराष्ट्र चेंबर तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी महापरिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी उपाध्यक्ष तनसुख झांबड व्यापारी महासंघाचे विजय जयस्वाल, प्रफुल्ल मालानी आदि मान्यवर.
Thanks and Regards,
Lalit Gandhi | President
Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA
Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001,
मुंबई, दि.30: राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 12 पथक तैनात आहेत.
नांदेड-1, गडचिरोली-1 असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती.
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. एकूण 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 112 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर 223 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त हा अहवाल आहे
00000
पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थानांच्या इमारतीचे लोकार्पण
कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल. अशी ग्वाही आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दादा भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीसांच्या प्रश्नांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील आहे. पोलीसांच्या घरांच्या बाबतीत मुंबईत बैठक घेण्यात आली आहे. येत्या काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येईल. मुंबई पोलिसांसाठी 50 हजार घरांची गरज आहे. मात्र सध्या 19 हजार घरे उपलब्ध आहेत. सद्यस्थितीतील घरांच्या डागडुजी व देखभालीची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासन काम करत आहे.
सध्याचे सरकार हे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांचे सरकार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे काम शंभर टक्के झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन युद्ध पातळीवर काम करत आहे. लवकरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सरकारचा संकल्प लोकहिताचे कामे करण्याचा आहे. लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार दादा भुसे म्हणाले की, मालेगाव येथील पोलिसांसाठीचे 54 कोटी 49 लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले आहे. उर्वरित अधिकारी -कर्मचारी यांच्यासाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीत. तसेच पोलीस शिपाई भरती करावी.
यावेळी 5 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना प्रातिनिधीक स्वरूपात निवासस्थानाच्या किल्ल्या देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्याकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी मालेगाव पोलिसांच्या ताफ्यातील