सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 1 August 2022
अकृषिक दर
.अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती
मुंबई, दि.1 : अकृषिक कर हा जमिनीवरील मुलभूत कर असून तो राज्याचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. राज्यात सुधारित अकृषिक प्रमाणदराच्या आधारे, अकृषिक आकारणीच्या वसूलीस देण्यात आलेली स्थगिती उठविणे, तसेच या अनुषंगिक अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन राज्य शासनास योग्य शिफारस करण्याकरिता महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.
या अभ्यास समितीमध्ये महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त व संचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त आणि कोकणचे विभागीय आयुक्त हे सदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे सहसचिव (ज- 1अ) या अभ्यास समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती अकृषिक कराच्या मार्गदर्शन सूचनांबाबत फेरविचार करणे, सुधारीत अकृषिक प्रमाणदर नव्याने निश्चित करण्याबाबत विचार करणे आणि या अनुषंगिक बाबीविषयी शिफारशी करण्याचे काम करणार आहे.
००००
मुंबई, दि.1 : अकृषिक कर हा जमिनीवरील मुलभूत कर असून तो राज्याचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. राज्यात सुधारित अकृषिक प्रमाणदराच्या आधारे, अकृषिक आकारणीच्या वसूलीस देण्यात आलेली स्थगिती उठविणे, तसेच या अनुषंगिक अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन राज्य शासनास योग्य शिफारस करण्याकरिता महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.
या अभ्यास समितीमध्ये महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त व संचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त आणि कोकणचे विभागीय आयुक्त हे सदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे सहसचिव (ज- 1अ) या अभ्यास समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती अकृषिक कराच्या मार्गदर्शन सूचनांबाबत फेरविचार करणे, सुधारीत अकृषिक प्रमाणदर नव्याने निश्चित करण्याबाबत विचार करणे आणि या अनुषंगिक बाबीविषयी शिफारशी करण्याचे काम करणार आहे.
००००
All Efforts by Govt. For Industrial Development of State.
- Chief Minister Eknath Shinde
Aurangabad, 31: The role of industry is important in the development of the state and the government is making all efforts for industrial development. Chief Minister Eknath Shinde assured here today that all efforts will be made sothat this development is beneficial to the common man.
The Chief Minister was speaking at the inauguration of the State level Trade Conference organized by Maharashtra Chamber of Commerce Industries and Agriculture. The conference was organized on the topic of participation of the business sector in the development of Maharashtra. Union Minister of State for Railways Raosaheb Danve, MLA Abdul Sattar, entrepreneurs Umesh Dashrathi, Prafulla Malani, Satyanarayan Lahoti, Ghanshyam Goyal, Lalit Gandhi along with presidents of various business federations of the state, entrepreneurs were present during the event.
Stating that the government is trying to create employment in the state through international investment in industry, Chief Minister Shinde said, since real estate is a big business after agriculture, all efforts are being made by the state government in that regard to make convenient changes in the industry policy. The entrepreneurs working for the Dream India Project are patriotic in a sense. Very useful transportation facilities are being made available through railway projects and Samriddhi Highway which will take the last elements of the society towards development through industry. This includes an ambitious project in the state that will connect the state from one end to the other by a highway, and it will be greatly helpful in the industrial development of the state, Mr. Shinde said.
For the development of Aurangabad area, the government is providing infrastructure such as Samriddhi Highway, dynamic transportation system, electricity, water, land etc. Agricultural supplementary industries are also being promoted which can be helpful for development, for this the government is making various efforts to encourage supplementary businesses along with providing irrigation facilities on priority basis. Mr. Shinde also said that the government has a positive role to improve the standard of living of common citizens including farmers, labour, entrepreneurs, traders. The programme was well attended by various dignitaries from the industrial and trade sectors.
0000
खेल खेल मे
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला
राज्य शासनाकडून 30 लाखाचे पारितोषिक जाहीर
- मुख्यमंत्र्यांकडून पुरस्काराची घोषणा
औरंगाबाद दि.31, (विमाका) :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली.
कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी उल्लेखनीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकेत सरगरला 30 लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर केला. संकेतची कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
0000
उद्योग चे घरी, शासन वास करी
राज्याच्या औद्योगिक विकासासाठीशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद, दि. 31 (विमाका) : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासात व्यापार क्षेत्राचा सहभाग, या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, उद्योजक उमेश दाशराथी, प्रफुल्ल मालानी, सत्यनारायण लाहोटी, घनश्याम गोयल, ललित गांधी यांच्यासह राज्यातील विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, उद्योजक यांची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय उद्योग गुंतवणूकीच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीनंतर रियल इस्टेट हा मोठा व्यवसाय असल्याने उद्योग धोरणात त्यादृष्टीने सुलभ बदल करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. ड्रीम इंडिया या प्रोजेक्टसाठी काम करणारे उद्योजक हे एक प्रकारे देशभक्तच आहेत. समाजातील शेवटच्या घटकाला उद्योगाच्या माध्यमातून विकासाकडे घेऊन जाणारे रेल्वे प्रकल्प आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अतिशय उपयुक्त अशा दळणवळण सुविधा उपलब्ध होत आहे. यामधून राज्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत महामार्गाने जोडणारा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प समाविष्ट असून तो राज्याला औद्योगिक विकासाला मोठया प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.
औरंगाबाद परिसराच्या विकासासाठी समृद्धी महामार्गासह गतिमान दळणवळण व्यवस्था, वीज, पाणी, जमिनी आदी पायाभूत सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. विकासाला सहाय्यभूत ठरू शकणाऱ्या कृषीपूरक उद्योगांनाही चालना देण्यात येत आहेत, यासाठी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. शेतकरी, कष्टकरी, उद्योजक, व्यापारी यांसह सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमास औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...