सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 31 July 2022
पितृ भाषा
🙏👍🚩*.....संस्कृती...*🚩👍🙏
पोटा-पाण्यासाठी ते 'स्वित्झर्लंडला' गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांची "मातृभाषा" तिथलीच असणार हे उघड आहे.
*पण त्यांच्या स्वीस पत्नीने मात्र आग्रह धरला की आपल्या मुलांना त्यांची "'पितृ-भाषा'"ही यायला हवी. त्यासाठी या जोडप्याने 'मुंबईत' येऊन आपल्या मुलांना काही महिन्यांसाठी मराठी शाळेत घातलंय. यानिमित्ताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतला "'पितृभाषा'" हा वेगळाच पैलू समोर आला आहे.*
*पालकांचा, मुलांचा, शिक्षकांचा, व्यवस्थापनाचा आणि एकूण मराठी समाजाचाच मराठी भाषेकडे, 'महाराष्ट्राच्या' "'मातृभाषे'"तल्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मराठीची गळचेपी करणारा आहे.*
*असे असताना एक परदेशी जोडपे आपल्या दोन्ही मुलांना तीन-चार महिन्यां-साठी 'मुंबई'तल्याच एका मराठमोळ्या शाळेत घालते. त्यामागे आपल्या मुलांना मराठीतून शिकता आले पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे हा एकमेव हेतू असतो.*
*हे सगळं नवल वाटावं असंच आहे.*
*मूळचे 'मुंबई'चे "अमोल आखवे" आणि स्वीस नागरिक असलेली त्यांची पत्नी "कोरिना शार्कप्लाट्झ आखवे" सध्या 'मुंबई'त "अमोल" यांच्या मूळ घरी रहायला आलेत, तेही आपल्या आठ नि दहा वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन. 'स्वित्झ फ्रँक्स'मध्ये मिळणाऱ्या भरभक्कम पगारावर चार महिन्यांसाठी पाणी सोडून हे दोघेही 'मुंबई'त एक ध्येय घेऊन आले आहेत. "मार्क" आणि "यान" हे त्यांचे दोन्ही मुलगे सध्या '"दहिसर'"च्या "शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी"च्या मराठी माध्यमाच्या शाळेत अनुक्रमे 'तिसरीत' आणि 'पहिलीत' शिकत आहेत. मुलांना काही काळापुरतं मराठी शाळेत घालायचं ही कल्पना "कोरिना"ची.*
"अमोल" सांगतात, *‘आपली मुले स्वित्झर्लण्डमध्येच राहणार आहेत, तिथेच वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आईची संस्कृती, तिची भाषा मुलांना समजणारच आहे पण मुलांच्या वडिलांची मुळे असलेली भारतीय संस्कृती, मराठी भाषा मुलांना कळावी, मातृभाषे सोबतच पितृभाषाही त्यांना यावी, हा "कोरिना"चा विचार मला महत्त्वाचा वाटला आणि मग इथे येण्याचा आम्ही निर्णय घेतला. परदेशी वंशाच्या आपल्या पत्नीबद्दल सांगताना "अमोल" यांच्या बोलण्यातून अभिमान ओसंडत होता.*
गेली १६-१७ वर्षे परदेशात राहिल्यामुळे तिथले नागरिकत्व सहज मिळत असतानाही आपले मराठमोळे पण जपण्यासाठी "अमोल" यांनी परदेशी नागरिकत्व नाकारले.
*मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधणाऱ्या मराठमोळ्या पालकांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे असताना, 'स्वित्झर्लण्ड' सारख्या '"जर्मन भाषिक'" बहुसंख्य असलेल्या देशात राहूनही "अमोल" मात्र मुलांच्या जन्मापासून त्यांच्याशी मराठीतूनच संवाद साधतात. त्यांची मुले त्यांना डॅडी किंवा पप्पा न संबोधता, 'बाबा' म्हणतात आणि "कोरिना" यांना ममा किंवा इथे मुंबईत आल्यावर 'आई' म्हणूनच हाक मारतात.*
हे सगळं चित्र पाहताना खरोखर अवाक होतो आपण.
*‘इट्स नेव्हर टू मच व्हेन इट्स युअर ओन मदरटंग’ असं सांगताना "कोरिना" यांचा आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या नवऱ्याची मातृभाषा आपल्या मुलांना यावी यासाठी त्यांच्या मनात असलेली ओढ त्यांच्या बोलण्यातून सहज व्यक्त होते. तुम्ही राहत असलेला देश कोणताही असो, राज्य कोणतेही असो...*
*तुमची मातृभाषा, मूळ भाषा आपल्याला यायलाच हवी या मतावर "कोरिना" ठाम आहेत. "मार्क" माझ्या पोटात असल्यापासून "अमोल" त्याच्याशी मराठीतच बोलतो, "यान"चेही तसेच झाले आहे. त्यामुळे आमच्या मुलांना मराठी खूप छान समजते. आम्ही सध्या 'मुंबई'त आलो आहोत, त्यामुळे आमची मुले त्यांच्या 'बाबां'च्या भाषेशीच नव्हे तर इथल्या संस्कृतीशी, इथल्या जगण्याशी स्वतःला जोडून घेऊ शकणार आहेत, याचा मला फार आनंद आहे.*
*असे सांगताना "कोरिना" यांच्या डोळ्यात अभिमानाची चमक दिसते. 'मुंबई'तले त्यांचे शेजारी-पाजारी, नातेवाईक आपल्या मुलांना 'इंग्रजी' माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही 'इंग्रजी' वा 'पाश्चिमात्य संस्कृती' रुजवण्याचा अट्टहास धरत आहेत, याची खंत "अमोल" आणि "कोरिना" व्यक्त करतात.*
*"मार्क" आणि "यान" दोघेही मुले अगदी सहज मराठी बोलतात. दोघांनाही 'स्वित्झर्लण्ड'मध्ये राहूनही 'भारता'चे 'राष्ट्रगीत' पूर्ण तोंडपाठ आहे. मराठीतले स्वर कोणते, व्यंजने कोणती हे तिसरीतल्या "मार्क"ला सहज सांगता येते. मराठमोळ्या घरात दिवे-लागणीच्या वेळेला ‘चल बेटा, गॉडची प्रेअर म्हण’ किंवा ‘जेवताना इट बेटा, इट...’*
*असं इंग्रजाळलेले मराठी संवाद ऐकले की मराठी घरात मराठी भाषा कशी 'व्हेंटिलेटरवर' आहे, याचे दुख होते. या उलट "अमोल" यांच्या 'स्वित्झ' कुटुंबात वावरताना कुठेही परकेपणाचा लवलेशही नसतो. ‘शाळा आहे, लवकर आवर, अजून आंघोळ व्हायची आहे’, इतक्या सहज-सुंदर मराठीत "अमोल" आपल्या मुलांना धारेवर धरतात.*
*इथे आल्यावर सुरुवातीला "मार्क"ला 'स्वित्झर्लण्ड'च्या शाळेची फार आठवण आली. तो अक्षरशः रडायचा. तिथल्या मित्रांशी व्हीडिओ कॉलवर गप्पा मारायचा आणि तिथे परत जायचे म्हणून हट्ट करायचा पण आता दोन्ही मुलांना आपली 'मुंबई'ची शाळा आवडली आहे. एकही दिवस दोघांनीही सुटी घेतली नाही, ११ वाजले की शाळेचे वेध दोघांना आपोआप लागतात, असे "कोरिना" सांगतात.*
*"अमोल" - "कोरिना" यांच्या निर्णयाबद्दल "शैलेंद्र विद्यालयातल्या" "यान"च्या वर्गशिक्षिका "अनिता राऊत" फारच कौतुकाने सांगतात. त्या म्हणतात, असे पालक मिळणे फार कठीण आहे. त्यांनी केवळ मुलांना इथल्या शाळेत घातले नाही, तर ते स्वतःही या शाळेचा एक भाग झाले आहेत. "यान" खूप लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आहे. त्याचे पालक पहिल्यापासून त्यांच्याशी मराठीत बोलतात, हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला समजते. मुळात, या मुलांना शिकण्याची इच्छा आहे. तो वर्गात माझ्याशी मराठीतच बोलतो, काही शब्द उच्चारता येत नसतील तर प्रयत्न करतो, खुणांनी सांगतो, हे फारच कौतुकास्पद आहे.*
*"शैलेंद्र विद्यालया"चे प्राचार्य "सुदाम कुंभार" म्हणतात, पूर्वी 'मराठी' माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लोक रांगा लावत असत. आता त्याच रांगा 'इंग्रजी' माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लागतात. आपल्याकडे अशी परिस्थिती असताना "आखवे" कुटुंबीय हा आपल्यासाठी आदर्श ठरू शकतो. 'मुंबई'तल्या काही मोजक्या 'मराठी' शाळांमधून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी "शैलेंद्र विद्यालयाची" निवड केली, हा आमचा बहुमान आहे. आमच्या शाळेतून या मुलांना आम्ही केवळ मराठीतून शिक्षणच देणार नाही, तर आम्ही त्यांना मराठी 'संस्कृती' , मराठीपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचे शिक्षकही खूप मेहनत घेत आहेत.*
*मुलांना 'मुंबई'तल्या शाळेचा सर्वांंगीण अनुभव घेता यावा, यासाठी "अमोल" यांनी केवळ तीन महिन्यांसाठी शाळेचा गणवेशही घेतला आहे. तीन महिन्यांसाठी गणवेश का घेता, असा प्रश्न कुणी तरी विचारल्यावर मुलांना मुंबईतल्या शाळेची आयुष्यभर आठवण देणारी ती एकच खूण मी 'स्वित्झर्लण्ड'ला सोबत नेऊ शकतो, असे उत्तर "अमोल" यांनी दिले.*
*पालकत्व म्हणजे काय तर मुलांना जन्माला घालणे, त्यांना जेवू-खाऊ घालणे, गडगंज पैसा कमावून वर्षाकाठी एक-दोन वेळा फिरायला नेणे, मॉलमध्ये नेऊन महागडे शॉपिंग करणे आणि मग चांगल्या शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठय़ा ब्रॅण्डेड शाळांमध्ये खोऱ्याने फी भरून अभ्यास आणि स्पर्धेचे ओझे मुलांवर टाकणे...*
*दुर्दैवाने काही अपवाद वगळता हेच चित्र आपल्या आजुबाजूला आजकाल दिसते. असे असताना "अमोल" यांचे उदाहरण कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, यात वाद नाही.*
*'माध्यान्हभोजन'*
*"मार्क" आणि "यान" या दोघांनाही घरच्या डब्यापेक्षा जास्त शाळेत येणारे माध्यान्ह भोजन जास्त आवडले आहे. शाळेत येणारी खिचडी, पुलाव ही दोन्ही मुले चवी-चवीने खातात. सगळ्या मुलांबरोबर बसून हाताने व्यवस्थित न सांडवता ही मुले जे येईल ते नीट जेवतात, असे शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले. म्हणजेच, केवळ मराठ-मोळ्या शिक्षणातून नव्हे तर, खाद्य संस्कृतीतूनही मराठीपण या मुलांच्या अंगात भिनेल, असे म्हणायला हरकत नाही...*
साभार 🙏🏻🙏🏻 ✍️ *"स्पृहा गानू"*
आपण सगळ्यांनी विचार करावा.
पुरा है विश्वास,पार्थ पे
*BANK और WIFE* की विश्वसनियता इतनी गिर गई है कि लोग *गर्लफ्रैंड* के पास ही धन जमा करना ज्यादा सेफ समझते हैं . . . 😂🤣
_पार्थ चटर्जी 😎🤣
*# west bengal scam*
Saturday, 30 July 2022
येथे कर माझे जुळती
🌿ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर🌿🙏🏻
आपल्यापैकी बर्याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल. परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*
*अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा.*
डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)
भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.
श्री नायर यांनी *"कलाम इफेक्ट"* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.
१. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.
ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.
म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.
त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही. राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सिलही घेतली नाही.
२. २००२ मध्ये, डॉ. कलाम यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी, *रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला.*
राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही नेहमीची प्रथा होती.
*डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना विचारले की त्यांनी आधीच चांगले आहार घेतलेल्या लोकांना पार्टी का आयोजित केली पाहिजे ?* आणि त्यासाठी किती खर्च येईल हे शोधण्यास सांगितले.
श्री. नायर यांनी सांगितले की यासाठी सुमारे रुपये बावीस लाख रू.खर्च येईल.
डॉ. कलाम यांनी त्याला काही निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटच्या रूपात दान करण्यास सांगितले.अनाथ आश्रमांची निवड राष्ट्रपती भवनमधील एका टिमवर सोडली गेली होती आणि त्यात डॉ.कलाम यांची कोणतीही भूमिका नव्हती.निवड झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आणि त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. ते म्हणाले की आपण त्याच्या वैयक्तिक बचतीतून काही रक्कम देत आहोत आणि ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये.
श्री नायर यांना इतका धक्का बसला की तो म्हणाला, "सर, मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. लोकांना माहित असावे की येथे असा मनुष्य आहे ज्याने फक्त सरकारचे पैसेच दान केले नाहीत तर तो स्वत: चे पैसेही देत आहे."
*डॉ. कलाम हे मुस्लिम असूनही त्यांनी राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टी केली नव्हती.*
*Dr. डॉ. कलाम यांना "येस सर" प्रकारचे लोक आवडत नाहीत*.एकदा जेव्हा मुख्य न्यायाधीश आले आणि काही काळ डॉ. कलाम यांनी आपले मत व्यक्त केले आणि श्री. नायर यांना विचारले,"आपण सहमत आहात?" श्री नायर म्हणाले "नाही सर, मी तुमच्याशी सहमत नाही ".
सरन्यायाधीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. एखाद्या नागरी सेवकास राष्ट्रपतींशी सहमत नसणे अशक्य होते आणि तेही इतके उघडपणे.
श्री. नायर यांनी त्यांना सांगितले की राष्ट्रपती नंतर त्यांच्याशी का सहमत नाहीत असा प्रश्न विचारतील? आणि जर दिलेले कारण तर्कसंगत असेल तर ते 99% मत बदलतील.
Dr. डॉ. कलाम यांनी आपल्या नातेवाईकांना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सर्व राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी जे पैसे भरले होते त्या शहराकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक बस आयोजित केली.कोणतीही अधिकृत कार वापरली गेली नव्हती. डॉ. कलाम यांच्या सूचनेनुसार त्यांचा सर्व मुक्काम आणि जेवणाची गणना केली गेली आणि त्यांनी भरलेले बिल 2 लाखांवर आले.
या देशाच्या इतिहासात कोणीही केले नाही.
आता, *क्लायमॅक्सची वाट पाहा*, डॉ. कलाम यांचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर संपूर्ण आठवडाभर खोलीत राहिला कारण डॉ. कलाम यांनी आपला भाऊ त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा व्यक्त केली.ते गेल्यावर डॉ. कलाम यांना त्या खोलीचे भाडेदेखील द्यायचे होते.
*कल्पना करा की एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ज्या खोलीत तो राहतो त्या घरासाठी भाडे देत आहे.*
प्रामाणिकपणा हाताळण्यासाठी खूप जास्त मिळत आहे असा विचार करणार्या कर्मचार्यांनी हे कोणत्याही प्रकारे मान्य केले नाही !!!.
कलाम सर जेव्हा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडणार होते, तेव्हा प्रत्येक स्टाफ सदस्याने जाऊन त्यांना भेट दिली.
श्री. नायर त्यांच्या जवळ गेले. ते पलंगावर बसले होते. आणि डॉ कलाम यांनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले. एका अपघातामुळे ती पलंगावर असल्याचे नायर यांनी उत्तर दिले.
दुसर्या दिवशी, श्री नायर यांनी आपल्या घराभोवती बरेच पोलिस पाहिले आणि काय झाले ते विचारले. ते म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला येत होते. ते येऊन आपल्या बायकोला भेटले आणि काही वेळ गप्पा मारल्या.
श्री नायर म्हणतात की, *कोणत्याही देशाचे कोणतेही अध्यक्ष सरकारी सेवकाच्या घरी भेट देणार नाहीत आणि तेही अशा साध्या बहाण्याने*.
मला वाटलं मी तुम्हाला माहितीचा तपशील द्यावा कारण तुमच्यातील बर्याच जणांनी टेलिकास्ट पाहिली नसेल आणि त्यामुळे ते उपयोगी पडेल.
*एपीजे अब्दुल कलाम यांचा धाकटा भाऊ छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतो*
कलाम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्री. नायर जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा श्री. नायर व भाऊ यांच्याबद्दल आदर दर्शवताना त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला.
अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक केली जावी कारण मुख्य प्रवाहातील मीडिया हे दर्शविणार नाही.
*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेली मालमत्ता खालील प्रमाणे होती.*
6 अर्धी चड्डी (2 डीआरडीओ गणवेश)
4 शर्ट (2 डीआरडीओ गणवेश)
2500 पुस्तके
1 फ्लॅट (त्याने दान केलेला आहे)
1 पद्मश्री
1 पद्मभूषण
1 भारतरत्न
16 डॉक्टरेट
1 वेबसाइट
1 ट्विटर खाते
1 ईमेल आयडी
त्यांच्याकडे कोणताही टीव्ही, एसी, कार, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हते.
*त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मागील 8 वर्षांची पेन्शन देखील दान केली होती.*
🌱ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते🌱
*भारतरत्न डॉ. कलाम सर,हा देश कायम तुमचा आभारी राहील🙏🏻🌱🙏🏻
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...