Saturday, 30 July 2022

 लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

          मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या जुलै-2022 या महिन्याच्या अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ, कृषी विभागाच्या विविध योजना, महिला शेतक-यांच्या यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

            राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले आहे. या अंकामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांचा परिचय, कृषी विभागाच्या विविध योजना, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील महाराष्ट्राची कामगिरी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, शेळीपालन, वनहक्क कायदा, राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या महिला लाभार्थींच्या यशकथांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


०००००



Friday, 29 July 2022

 राज्यपालांच्या उपस्थितीत अंधेरीतील चौकाचा नामकरण सोहळा संपन्न.

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी - गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  

            मुंबई दि. 29 : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

            आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.

            भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

००००

Governor Koshyari attends Andheri Chowk naming ceremony

Praises contribution of Rajasthani – Gujarati communities in making Mumbai financial capital.

            Mumbai Dated 29 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Inauguration and Naming Ceremony of Chowk after Late Smt Shantidevi Champalalji Kothari at J P Road, Andheri Mumbai on Friday (29 July).

            Member of Parliament Navneet Rana, MLAs Ravi Rana, Amit Satam, Nilesh Rane, Bharati Lavekar and Pankaj Bhoyar, Choreographer Remo D’Souza and Trustee Rakesh Kothari were prominent among those present.

            Speaking on the occasion the Governor hailed the contribution of Rajasthani - Marwari and Gujarati communities in making Mumbai the financial capital of India. The Governor said the Rajasthani Marwari community is living in various parts of the country and also in countries like Nepal, Mauritius and others. He said wherever members of the community go, they not only do business, but also do acts of philanthropy by creating schools, hospitals etc.

00000

 आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे विधिवत पूजन करून साजरी



 आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे विधिवत पूजन करून साजरी



आंख मारे ए


 

सूचना

 Important information - TRAI does not provide any NOC for installing mobile towers. If a fraudster brings a fake letter to you, inform the concerned service provider and the local police.

 ✨🌺✨✨🌺✨


*हसणे फार सुंदर आहे !* 

*दुसऱ्याला हसवणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..* 

*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.* 

 

*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...* 

*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.* 

 

*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....* 



✨🌺✨ *शुभ दिवस*✨🌺✨

Featured post

Lakshvedhi