Thursday, 28 July 2022

भवताल

 पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग १

(भवतालाच्या गोष्टी ५१)

मुंबईमध्ये दर पावसाळ्यात दाणादाण उडते. हे सारे का? कशामुळे? या गोष्टींचा मागोवा घेताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते. ती म्हणजे- हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याला कोणतेही एक सरळ उत्तर नाही. इथला भूगोल, पाऊस आणि माणसाने घातलेला घोळ या सर्वांचाच हा परिपाक आहे. विशेष म्हणजे पावणेदोनशे वर्षांपूर्वी पाणथळ जागा बुजवून मुंबईचा विस्तार करताना काही ठिकाणे पावसाळ्यात भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणार हे वास्तव स्वीकारलेले होते. पण आपली जीवनशैली बदलली आणि आपण या शहराकडून जास्त अपेक्षा करायला लागतो... पण मुळातच मर्यादा असल्यामुळे हे शहर आपल्या अपेक्षा पूर्ण कसे करणार?


या सर्व गुंगागुंतीची प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी सांगितलेली गोष्ट, भाग १.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Mumbai-Chitale-Part1

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५१ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


रस्ते विकास

 Continue    विशेष भर

            पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर दिल्यास दळणवळणाच्या अंतर्गत सुविधा विकसित होणार आहेत, त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुरबे-पालघर रस्त्यामुळे पालघरजवळील दापोलीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल आणि ३५ कि.मी. चे अंतर कमी होईल. विश्वभारती फाटा- भिनार-वडपा मार्गाचे काम देखील मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

शीळफाटा-भिवंडी रस्त्याच्या मोबदल्याचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश.

            शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनापोटी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा विषय प्रलंबित असून तो तातडीने मार्गी लावावा. सर्व्हिस रोड- राजनोली ते दुर्गाडी मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबरोबरच तेथील विस्थापितांसाठी ठाण्याच्या धर्तीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

नियमबाह्य गतिरोधक काढून नियमांची अंमलबजावणी करा- मुख्यमंत्रीरस्ते विकास 

            बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक करण्यात आले असून हे नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना गतिरोधकांसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


०००००

रस्ते प्रकल्प

 मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्पांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना.

            मुंबई, दि. 28 :- मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जनतेला तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांचेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

रस्ते प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार

            वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉरमुळे भिवंडी-कल्याण- डोंबिवली-उल्हासनगर या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून त्याबरोबरच त्या भागाच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बांधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग हे प्रकल्प जलदगतीने करण्यात येणार असून या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार

            चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूकीचे विभाजन होऊन ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून त्यांनी हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष 

दीपपूजा

 *🪔 कशी साजरी करावी दीप अमावस्या🪔*


*आषाढ अमावस्या म्हणजेच "दिव्यांची अमावस्या".*

*काय करावे....*

*🪔 घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.*

*🪔 पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.*

*🪔 आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते.*

*🪔 आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी.*

*🪔 गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.*

*🪔 आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.*

*🪔 दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.*

*🪔 या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात.*

*🪔 त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.*

*🪔 पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.*

*🪔 ती प्रार्थना अशी 🪔 *

*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

*अर्थ:*

_‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस._

*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.*

*🪔 त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.*

*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.*

_तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले._

_मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा *दीप अमावास्येसाठी* सांगितली आहे._

॥ॐ श्री दत्त नारायण नमः शिवाय॥

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

भूमीहीन करता जागा

 ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींनाजागा देण्याबाबत निर्णय.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरीताच मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. 500 चौ. फूट कृषी जमीन खरेदी करतांना तुकडे बंदी कायद्यातील अट लागू होणार नाही अशी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. लाभार्थींना 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात येईल. गायरान जागा लाभार्थींना भाडेपट्टयाने देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.  


ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे सादर करून 90 दिवसाच्या आत मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.

चॉईस तुमचा आहे.

 आषाढ अमावस्या निमित्त काही विचार,


दिव्याची अमावस्या कि गटारी अमावस्या 

*चॉईस तुमचा आहे ।*

पुरणाचे दिंड कि गाढवावरून धिंड

*चॉईस तुमचा आहे ।*

दिवे उजळायचे कि दिवे पाजळायचे

*चॉईस तुमचा आहे ।*

प्रकाशात न्हायचं कि गटारात लोळायचं

*चॉईस तुमचा आहे ।*

दीपज्योती नमोस्तुते कि चिअर्सची गीते

*चॉईस तुमचा आहे ।*

संस्कारांचं दिवाळं कि मदिरापानाचं सोहळं

*चॉईस तुमचा आहे ।*

धुऊन-पुसून दिव्यांचे पूजन,

की पिऊन आतड्यांची साफ-सफाई.

*चॉईस तुमचा आहे ।*

दिव्यांची आरास कि बाटली आणि गिलास

*चॉईस तुमचा आहे ।*

अंधाराला जिंकायचं कि टाईट्ट होऊन झिंगायचं

*चॉईस तुमचा आहे ।*

या लिखाणाला डिलीट मारायचं कि पुढं धाडायचं

*चॉईस तुमचा आहे*

🙏

दीप अमावस्येला 

*गटारी अमावस्या* असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करू नये.

गटारी स्पेशल


 

Featured post

Lakshvedhi