Friday, 8 July 2022

महोत्सव

 राज्यातील चार शहरांमध्ये ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’

            नवी दिल्ली दि. 7 : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे लाभार्थी फेरीवाले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील ७५ शहरांमध्ये ‘स्वनिधी महोत्सव’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार शहरांचा यात समावेश आहे.

                 येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्वनिधी महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि अपर सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील चार शहारांमध्ये आयोजन

           स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ७५ शहरांमध्ये ९ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असून १४ जुलै रोजी नाशिक, १६ जुलै रोजी कल्‍याण डोंबिवली, २२ जुलै रोजी मुर्तिजापूर ( जि. अकोला ) आणि २४ जुलैला नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.


असा साजरा होणार महोत्सव

            या महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसह,डिजीटल आदान-प्रदान विषयक प्रशिक्षण, ऋण मेळावा, फेरीवाले-रस्त्यावरील विक्रेत्यांचा सत्कार, या विक्रेत्यांचे अनुभव कथन आणि योजनेची माहिती व महत्व विषद करणारे नुक्कड नाटक यांचा समावेश असणार आहे.

                 कोविड-१९ महामारीमध्ये देशातील फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटातून बाहेर काढून त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची देशभर सुरुवात करण्यात आली होती.

 पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत

            मुंबई, दि. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली.

            अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केलेल्या मदतीचे वाटप सांगली येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णालयात जाऊन करण्यात आले. यावेळी या वारकऱ्यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

            यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील शिवरे गावातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे आणि परतीच्या प्रवासातही वारकरी यांनी सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वारी सुरु असताना त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करावे. पंढरी व इतर वारी मार्गस्थ होण्यासाठी पुढाकार घ्यावा. पोलीस प्रशासनाने सुरक्षित वाहतूक होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अपघातग्रस्त वारकऱ्यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांचे आभारही मानले.

००००



 काळजी करू नका...लवकर बरे व्हा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

- दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद

- जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत

 

            सांगली दि. 7 (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार5 जुलै 2022 रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून काळजी करू नका...लवकर बरे व्हा... अशा शब्दांत दिलासा दिला. तसेच अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांना सर्व जखमी वारकऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यात यावी. ‍मिरज सिव्हील रुग्णालय येथील वैद्यकीय उपचारांव्यतिरीक्त अन्यत्र खाजगी ठिकाणी उपचारांची आवश्यकता असल्यास त्याचाही सर्व खर्च शासन करेल. जखमी वारकऱ्यांची मागणी असल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलविण्याबाबतही कार्यवाही करावीअसे निर्देशित केले. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी  25 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना म्हणालेमाझे बोलणे झाले आहे. त्यांना आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ‍ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मिरज सिव्हील रुग्णालय येथील जखमी वारकऱ्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी आमदार अनिल बाबरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकरवैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते.

            आमदार श्री. बाबर म्हणालेजखमी वारकऱ्यांची वैद्यकीय यंत्रणेने अत्यंत चांगली काळजी घेत उपचार केले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर होती. आज सर्वांची प्रकृती चांगली आहे. मिरज सिव्हील येथील व्यवस्थेव्यतीरिक्त अन्य व्यवस्था करावी लागल्यास त्याचाही खर्च सरकार करेल. पांडुरंगाच्या आर्शीवादाने सर्व वारकरी रूग्ण लवकरात लवकर बरे होवून घरी जातील. शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असून तोपर्यंत तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रूपये उपलब्ध करून देत असल्याचे ही आमदार श्री. बाबर यांनी यावेळी सांगितले.



नदीजोड


 

सिंचन

 पश्चिम वाहिन्या नद्यांतून वाहून जाणारे पाणी

सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नदी जोड प्रकल्पाबाबत आढावा बैठक

            मुंबई, दि. 7 : वैनगंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करावा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

            वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी नळगंगा खोऱ्यात नेण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. अमरावती आणि नागपूर विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            राज्यातील १०४ प्रकल्पापैकी दहा ते वीस टक्के प्रकल्प अपूर्ण आहेत. हे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जलसंपदा विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

            पश्चिम वाहिनी नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. ते गोदावरी नदीत वळवल्यास कोरड्या राहणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी हा प्रकल्पही अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले जावे. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            नद्यांच्या पात्रात गाळ साचला आहे, विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवून नद्यांची वहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे पूर नियंत्रणासाठी फायदा होईल. जलसंपदा, नगरविकास आणि पर्यावरण विभागाने याबाबत समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            यावेळी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सचिव विलास राजपूत आणि मुख्य अभियंता अतुल कपोले यांनीही माहिती दिली.



साम्राज्य


 

 वय फक्त एक आकडा असतो.

Energy अशी असायला हवी.

👌🏼👌🏼😅🌹👍🏼


Featured post

Lakshvedhi