सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 6 July 2022
स्वराज्य साठी
स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख
• राज्यातील 358 तालुके व 351 पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये.
मुंबई, दि. 6 : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून दि. 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” साजरा होणार आहे. याअंतर्गत तालुका व ग्रामस्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी राज्यातील 358 तालुके व 351 पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
दि. 12 मार्च, 2021 पासून देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हा उपक्रम सुरु झाला असून या अंतर्गत ऑगस्ट, 2023 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
वारकरी सहाय्य
वारीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्या.
- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
· महिला भाविकांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे
· ‘पंढरीची वारी’ ॲपच्या माध्यमातून सोयीसुविधा मिळण्याला प्राधान्य द्यावे.
मुंबई, दि. 6 : कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. वारीमध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असल्याने त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे. यावर्षी सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या पंढरीची वारी ॲपमधून वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा मिळतील याला प्राधान्य देण्याच्या सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाचा आराखडा, भक्त निवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता व नगरपालिकाबाबतचे प्रश्न चर्चिले गेले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबादच्या पुरातत्व विभागाचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सोलापूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव, पंढरपूर देवस्थान समितीचे प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
‘पंढरीची वारी’ ॲपची महत्त्वपूर्ण भूमिका
पंढरीची वारी हे जिल्हा प्रशासनामार्फत वारीबाबत माहिती देणारे ॲप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड संदर्भातील नियम पाळण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्व देताना यावर्षीच्या वारीमध्ये आरोग्य दूत नेमण्यात आले आहेत. महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद अशा तीनही यंत्रणाचे नोडल अधिकारी नेमण्यात आले असल्याने वारीला येणाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होईल. वारी काळात मंदिर परिसरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे निगराणी, गर्दीचे व्यवस्थापन अचूक होण्यासाठी विशेष गणवेश असलेले अधिकारी यामुळे या काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन विधानपरिषदेच्या सभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले. वारी दरम्यान येथील स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन केंद्रावरील कचरा उचलणे, निर्माल्य वेळोवेळी उचलले जाईल याची सुद्धा काळजी घेण्यात यावी.
गर्दीचे नियोजन करा, सेवकांनी भाविकांशी संयमाने वागावे
दोन वर्षांनतर वारी होत असल्याने यावर्षी गर्दी लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांशी तेथे नियुक्त सेवकांनी सौजन्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असून याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोविडचे संकट अद्याप संपले नसून मंदिरात भाविकांची खूप गर्दी होणार नाही, आणि महिला भाविकांशी कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी आवश्यक ते सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
रुक्मिणी मंदिरात एक्झॉट पंखे तातडीने लावण्यात यावे
विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता 9 आणि 10 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिीणी मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार असल्याने तातडीने रुक्मिणी मंदिरात एक्झॉट पंखे तातडीने लावण्यात यावे. वारीसाठी मंदिर आणि परिसरात गर्दी होत असल्याने मूर्तीची काळजीही घेण्यात यावी. अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
पुरातत्व विभागाने दिलेला कालबद्ध आराखड्याची अंमलबजावणी करण्यात यावी
मंदिर आणि मंदिर परिसरात आवश्यक असणारी कामे करीत असताना या मंदिराचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पुरातत्व विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन समिती यांनी सहकार्य करत सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक असणारी सर्व कार्यवाही करावी. सध्या पावसाळा सुरु असल्याने पावसाळ्यात कोणती कामे करता येतील याचे नियोजन करावे आणि पावसाळ्यानंतर दीर्घकालीन कामांचे नियोजन करुन कामे पूर्ण करण्यात यावीत.
तातडीची मदत पोहोचवा
या वारीसाठी आलेल्या भाविकांपैकी 16 वारकऱ्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यापैकी 2 वारकऱ्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या दोन वारकऱ्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांच्या उपचारांचा खर्च जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थामार्फत करण्यावर भर द्यावा. तसेच उर्वरित सर्व वारकऱ्यांची काळजी घेत असताना या वारकऱ्यांवर मोफत उपचार करावेत, अशा सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, गॅस उपलब्ध करुन देण्याबरोबरच ठिकठिकाणी तात्पुरते शौचालय उभे करुन देण्यात यावेत. महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, वेन्डिंग मशीन उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच वारीदरम्यान ठिकठिकाणी कचरा आणि मैला उचलून नेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. याशिवाय एसटी स्थानकांच्या बाहेरदेखील तात्पुरते शौचालय उभारण्यात यावेत. नदीपात्रातील वाळूचा उपसा होत असल्याने काही ठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे तातडीने भरण्यात यावेत.
भक्त निवासचे काम तातडीने पूर्ण करा
सोलापूर येथील भक्त निवासचे तळमजला आणि बेसमेंटचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करावे. तसेच अंदाजपत्रक तयार करण्याबरोबच या संदर्भातील अहवाल विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही तातडीने करावी जेणेकरुन हे काम लवकर पूर्ण होईल, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.
००००
आरोग्य दायी विठ्ठल
"हार्टअटॅक अणि विठ्ठल"
चातुर्मासात संपूर्ण महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो.
विठ्ठलाचे दोन्ही हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.
पंढरपुरची, विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हाताचे पंजे वरील बाजूस आहेत.
नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर
उजवा तळहात लिव्हरवर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे.
शरीराच्या चुंबकिय शास्त्राचा विचार करता उजवा हात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा हात म्हणजे उत्तर ध्रुव.
पोटात गॅसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गँसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच "ward vibration therapy" चा विचार करता 'ट' अणि 'ठ'
ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्टचे संरक्षण होते.
अणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१०
मिनिटात रिलीफ मिळतो.
एके ठिकाणी आलेला अनुभव... एका स्नेही व्यक्तीची काही वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती.... एके दिवशी रात्री छातीत जबरदस्त दुखायला लागले.
पुन्हा ऍड्मिट व्हायच्या भीतीने त्यांनी कुणालाच सांगितले नाही.... त्यांच्या व्यायाम वर्गातील एका मित्राने सांगितल्यानुसार ते उठून बाल्कनीत गेले, विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिले अणि 'जय हरी विठ्ठल' म्हणायला लागले. पाच मिनिटात जोरदार गॅसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही..
अगदी असाच त्रास माझ्या आईला होत असे... एके दिवशी रात्री आम्ही गाढ झोपेत असताना तिच्या छातीत दुखायला लागले..... काही दिवसांआधीच तिच्या मैत्रिणींने, छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हण असे सांगितले होते...
आईने विचारले ही अक्षरे लक्षात कशी राहणार?
त्यावर तिची मैत्रिण म्हणाली ' फक्त विठ्ठल विठ्ठल म्हण". ही चर्चा येथे संपली. दोनच
दिवसानी आईला त्रास व्हायला लागला....
त्यावेळी आम्हा कुणालाही काही न सांगता आई शांतपणे उभी राहिली आणि नुसते 'विठ्ठल विठ्ठल' म्हणू लागली अणि थोड्यावेळाने छातीत दुखणे थांबले.
काही दिवसांनी मी आईच्या मैत्रिणीशी बोलले, तेव्हा त्या म्हणाल्या पुन्हा जर तुझ्या आईला त्रास होऊ लागला तर
लिव्हरवर मॅग्नेटचा दक्षिण ध्रुव अणि स्प्लीनवर उत्तर ध्रुव लाव... आणि तिला अपानवायु मुद्रा करायला सांग.... तोंडाने जय हरी विठ्ठल म्हणायला सांग....
फक्त तिनेच नाही, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला असा त्रास झाला तर तेच करून बघा...
महाराष्ट्रात आषाढ महिना हा भरपूर पावसाचा असतो त्यामुळे पचनशक्ति मंदावते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विठ्ठल नामाचा गजर.
आपले पूर्वज किती बुद्धिमान होते ह्याचा विचार कर - राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. सामान्यांचे सहज आरोग्य त्याच्या नावाने राखले जात असे...
कितीतरी अंतर चालून गेल्याने देहात विलक्षण चैतन्य खेळत असे, शिवाय गॅस, अपचन, ऍसिडिटी, अनिद्रा, overweight असले रोग जवळपास भटकत देखील नसत...
फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले.
स्वतः पैसा केला नाही, म्हणून ते अडाणी होते का?
साधा सोपा सर्वांना सहज जमणारा उपाय...
!!!विठ्ठल !!! विठ्ठल !!! विठ्ठल!!!
Cp
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...