Tuesday, 5 July 2022

 


अजित पवार - राज्यपाल भेट

            मुंबई, दि. 5 : विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

0000

Ajit Pawar met Governor

            Mumbai Dated 1 : The newly elected Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Assembly Ajit Pawar met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने

विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव

               मुंबई, दि. ४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.

            महाराष्ट्र विधानमंडळाचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार व भरतशेट गोगावले यांनी नियम २३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करणारा हा प्रस्ताव होता. विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मतविभागणी घेण्यात आली, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाल्याने त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. या प्रस्तावाच्या बाजूने १६४ तर प्रस्तावाच्या विरोधात ९९ सदस्यांनी मतदान केले, तर ३ सदस्य तटस्थ राहिले.

००००००

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर.

            मुंबई, दि. 4 :- महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची आज विधानसभेत घोषणा केली. सदस्य सर्वश्री आशिष शेलार, योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे, संजय शिरसाट यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

०००००


 


 

धोधो पाऊस

 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.

            मुंबई, दि. 4 : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

            उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

            मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र - गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज दि. 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

०००



 



मतदार यादी

 ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता

मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा.

            मुंबई, दि. 4 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.

            श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. राज्यभरातील विविध 14 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

            ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वत: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह स्वत:च नोंदविल्या. केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदविणाऱ्यांची संख्या 2 हजार 770 इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला. त्यासाठी जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनमध्ये इन्स्टॉल केले. आता आगामी निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल, असेही श्री. कुरुंदकर यांनी सांगितले. 

-0-0-0-



 

 विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन संस्थगित.

            मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन दिनांक 3 जुलै 2022 रोजी सुरू झाले होते.

            आज सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी संस्थगित करण्यात आले, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केली.

००००

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड.

            मुंबई, दि. 4 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

*****

मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन.

          मुंबई दि. 4: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी भर पावसात हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले.

          यावेळी आमदार दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड, अब्दुल सत्तार, अन्य आमदार तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले.

...



 शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय

 

            मुंबईदि. 4 : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने  केला  असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय  घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर  अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी

           मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेरायगड पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी  देण्यात  येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.  केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय  घेण्यात येणार  आहे.

            आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृद्धी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून राज्याच्या विकासाला चालना मिळेल. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देणार आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

           राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्व धर्मियांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

             मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.

*****


 

सुप्रभात

 *🌹Good morning🌹*


*लब्ज ही ऐसी चीज हैं जिसकी वजह से इंसान या तो दिल में उतर जाता है या दिल से उतर जाता है।*


     *🌷शुभ दिन🌷*

Featured post

Lakshvedhi