सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 2 July 2022
Sapthah ayojan
राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान "स्वराज्य महोत्सव"
मुंबई, दि. 1 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
"स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तर अशा विविध स्तरावर "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे जनसहभागातून आयोजन करण्यात येणार आहे.
"स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यक्रम
समुह राष्ट्रगान, आयकॉनिक सांस्कृतिक कार्यक्रम, कॉफीटेबल बुक प्रकाशन, 60 मान्यवरांच्या लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन,गिरगाव चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई.इ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन
हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, रस्ते संग्रहालय, 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभेचे आयोजन, एनसीसी/एनएस एस सायक्लोथॉन/ मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, विविध निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धा आयोजन, प्रदर्शने, हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठ स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तालुकास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन
वृक्षारोपण मोहीम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, वारसा स्थळ / पुरातत्व दत्तक योजना, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाम लोगो, स्वच्छता मोहीम, संविधान स्तंभ उभारणी
ग्रामस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन
विशेष ग्रामसभा, हर घर तिरंगा, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, अर्थसाक्षरता विषयक शिबीर, शेतकरी मेळावे, पर्यावरण संर्वधन शपथ, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन "स्वराज्य महोत्सवांतर्गत करण्यात आले आहे.
००००
आपदा के दिनों में संपर्क, संवाद रखकर क्षति होने से बचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने राज्य की यंत्रणा को दिये निर्देश
मुंबई, दि. 1 : राज्य की सभी यंत्रणा एक-दूसरे के साथ योग्य समन्वय रखकर किसी भी हालत में आपदा की स्थिति में जीवितहानी नहीं हो सके, इस ओर ध्यान दे। साथ ही अधिकारी भी प्रत्यक्ष रूप से फिल्ड पर रहकर काम करें जिससे की यंत्रना के सभी लोग भी सतर्क रहेंगे, यह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में एवं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति में मंत्रालय के समिति सभागृह में राज्य की आपदा व्यवस्थापन का जायज़ा बैठक हुई, इस बैठक में मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे।
मुख्यमंत्री श्री.शिंदे ने कहा कि आपदा में समन्वय बहुत जरूरी होता है। एनडीआरएफ ने उसी तरह सेना ने भी पिछले साल बाढ़ की स्थिति में अच्छा काम किया है। उसी तरह किसी भी हालत में संपर्क और संवाद का अभाव न रह सके, इस ओर ध्यान दें। जिलाधिकारी व पालिका कार्यालयों की वॉर रुम यंत्रणा सज्ज रहकर लोगों की शिकायतों को तत्काल निपटान करें। पिछले साल भूसक्खलन की घटनाएँ हुई थी। विशेषत: जहां पर हमेशा भूसक्खलन होता है, उस थल के व्यक्तिरिक्त नए स्थान पर यह घटनाएँ हुई। इसलिए इस साल अधिक दक्ष रहने की जरूरत है, यह कहते हुये मुख्यमंत्री ने कहा कि खतरनाक इमारतों के निवासियों को भी भारी बारिश के समय अस्थायी निवारा में स्थलांतरित करते हुये वहाँ पर उनके रहने-खाने की व्यवस्था करने की ज़िम्मेदारी पालिका लें। मैं और उपमुख्यमंत्री 24 घंटे हम सभी के लिए उपलब्ध रहेंगे और उसी तरह हम तक भी उसी तेजी से अंतिम छोर तक की घटनाएं और अंतिम छोर तक सरकार की योजनाएँ पहुंचनी चाहिए। एक दिन में 275 मि.मी. बारिश होने पर महानगरपालिका ने और रेलवे ने सफाई, पानी जमा न हो, इसके लिए व्यवस्था की, जिसकी वजह से कहीं पर भी मुंबई के लोगों को परेशानी नहीं और यातायात भी सुचारु रूप से रहा, इस पर मुख्यमंत्री ने इस बैठक में समाधान व्यक्त किया।
इस बैठक में मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव समेत विविध विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
खतरनाक इमारतों के निवासियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थलांतरित करें
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि मुंबई में बारिश शुरू हुई कि खतरनाक इमारततें गिरने का लगती है। प्रत्येक वॉर्ड में ऐसे खतरनाक इमारतों के निवासियों को समझ सके, ऐसी भाषा में नोटीस भेजकर इन इमारतों को खाली करना चाहिए। जो वॉर्ड ऑफिसर यह कार्यवाही नहीं करेंगे, उस संबधित अधिकारी पर कार्रवाई की जाए। साथ ही जहां पर सालो-साल भूसक्खलन के निश्चित स्थान का सर्वेक्षण हुआ है। पिछले कुछ सालों के अनुभव को देखते हुये आपदा की घटनाओं में वृद्धि हो रही। इसलिए भूसक्खलन के स्थान जो हो सकते है, उसका तत्काल सर्वेक्षण होना बहुत जरूरी है, और ऐसे स्थानों का तत्काल सर्वेक्षण करने के निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संबंधितों को दिये।
बैठक में मदद व पुनर्वसन के प्रभारी अपर मुख्य सचिव नितीन करीर ने प्रास्ताविक किया।
0000
*घरगुती 20 उपाय*
1) हाडे मजबूत व ताकदवान होण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी 1 चमचा तीळ खावी
2) नेहमी अपचन व सतत तोंडाची दुर्गंधी येत असल्यास सकाळ व सायंकाळ आंब्याचे एक पान 10 दिवस सकाळी खावे
3) मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना दररोज 15 दिवस एक पेरू खाण्यास द्यावा.
4) नियमित एक ग्लास ताक दररोज पिण्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी असते
5) पॅरालिसिस होऊ नये म्हणून पाय उत्तर दिशे कडून झोपावे
6) जुलाब थांबण्यास 5-6 मेथी दाणे कोमट पाण्यात टाकून दिवसातून 3 वेळा घ्यावे
7) नेहमी तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्यास सर्दी, खोकला व ताप येत नाही
8) चेहऱ्यावरची काळपट पणा दूर करण्यासाठी 6 मोठे चमचा दुधात अर्धा चमचा लिंबू रस टाकून चांगले चोळावे व अर्धा तासाने चेहऱ्यावर किंचित पाणी मारून कापसाच्या बोळ्याने चेहरा दाब देऊन पुसावा
9) मुळव्याध दुखणे थोडे कमी होण्यासाठी अर्धा लिंबू वर 2 लहान चमचे सैंधव मीठ टाकून चोखावे दिवसातून 3 वेळा
10) पोटावरील अतिरिक्त चरबी नष्ट करण्यासाठी दररोज सकाळी सीताफळ ची 4 पाने खावीत व त्या नंतर 4 की मी फिरण्यास जावे
11) कमी ऐकू येत असेल तर एक लहान चमचा कांदा रसात 4 थेंब मध टाकून एकत्र करावे व मध व कांदा रस मिश्रण सुती कपड्यात टाकून गळून घ्या व
एक मोठ्या चमच्यामध्ये पाणी गरम करून त्यात मिश्रण टाका व कानात 3-4 थेंब रात्री झोपतांना टाकून कापसाच्या बोळाने कान बंद करा. असे 7, 14 किंवा 21 दिवस सतत करा
12) झोप येत नसल्यास लिंबाच्या रसात चंदन किंवा सुंठ उगळावी व त्यात 2 कापूर वड्या चुरून टाकाव्यात व तयार लेप रात्री झोपतांना कपाळावर लावावा
13) तात्पुरती दाढदुखी बंद होण्यासाठी हिंग व कापूर दाढेवर दाबून ठेवावा किंवा लवंग थोडी ठेऊन दुखऱ्या दाढेवर ठेऊन दाबा
14) लहान जखम झाल्यास त्यावर हळद टाकून दाबावे व जर गांजलेले लागल्यास धनुर्वात रोधक इंजेक्शन घ्यावे
15) उंदीर चावल्यास अर्धा लहान चमचा मुळ्याच्या रसात वास येणारे खोबरे तुकड्यांचा उगाळून केलेला अर्धा चमचा रस टाकावा व तयार लेप उंदीर चावलेल्या ठिकाणी दर 3 तासांनी 2 दिवस लावावा (ओले खउट खोबरे मिळाल्यास उत्तम-मंदिरात हमखास मिळते)
16) विंचू चावल्यास - ज्या ठिकाणी विंचू चावल्यास त्याच्या वरील भागात घट्ट बांधावे. मानेवर किंवा गळ्यावर चावल्यास बांधू नये. चिंचोका दगडावर/फरशीवर घासावा व दंश झालेल्या जागी त्याचे चटके द्यावे. म्हणजे चिंचोका घासावा व लावावा - असे 15-20 वेळा करावे किंवा तुरटी गरम करून विताळायला लागताच दंशाच्या ठिकाणी लावावी म्हणजे विष शोधून तुरटी खाली पडते. आंब्याच्या सिझन मधील देठातून येणारा चीक लावा.
17) ग्रामीण भागात पूर्वी असा चीक शेतकरी बाटलीत जमा करून ठेवत होते. एक बाटली घरी व एक शेतात ठेवत होते
18) घसा बसला असल्यास कोमट पाण्यात हळद टाकून घशात गळ-गळ करा
19) कुत्रा चावल्यावर कोणताही तांत्रिक उपाय किंवा घरगुती उपाय करू नका. इंजेक्शन घेणे आवश्यक असते ह्यावर आयुर्वेदिक उपाय नाहीत
20) अंमली पदार्थ जास्त सेवन केल्यास व्यक्तीची शुद्ध हरपते अश्यावेळी लिंबाचा रस 1 मोठा चमचा पाजावा 2 तासात शुद्ध न आल्यास दवाखान्यात न्यावे. दारू जास्त पिणे झाल्यामुळे जास्त बोलणे, वेडेवाकडे चालणे असल्यास 1 ग्लास आंबट ताक किंवा अर्धा ग्लास दही खावे.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*
*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक*
*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*
(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)
Friday, 1 July 2022
अल्पसंख्यांक पॉलिटे्निक
राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी
प्रवेशासाठी अर्ज करण्यास 7 जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 1 : राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता 7 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) आणि सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 हजार 155 जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 30 टक्के जागा उपलब्ध आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांना वार्षिक 7 हजार 750 रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी 8 लाख रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कालावधी 7 जुलै 2022 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly22.dte.maharashtra.gov.in तसेच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००
मदरसा योजना
मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.
मुंबई, दि.1 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2022-23 राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" सन 2022-23 राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी 31 जुलै 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ते शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 राहील याची संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
पुणे अवलिया
पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर.
आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल.
नाव महादेव काशिनाथ गोखले, जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे.
आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला.
महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या वर्षी सुरु झाला ते ९० वर्षापर्यंत सुरूच होता.
सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळाला जाऊन यायचे तेही पायी.
शीर्षासन करून फक्त दोन्ही हातावर पर्वती चढायचे तर कधी पाठमोरं चढायचे. आपल्या बायकोला पाठंगुळीवर घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर ४३ वेळा वेळा केला होता.
आता एवढा व्यायाम असेल तर खुराक पण तसाच हवा नां राव. नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एकावेळी ९० जिलेब्या पैजेवर सहज फस्त करायचे. त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी. ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदी पेढे पाठवून द्यायचे. पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाई दुकानातून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोहचवले जायचे.
या अचाट भिडूच्या स्कीलचा वापर कोणी केला नसता तर नवल.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. तेव्हा त्यांनी क्रॉसकंट्री मॅरेथोन स्पर्धेत २५७ मेडल मिळवले होते. त्यांची किर्ती ऐकून ४ ब्रिटीश अधिकारी त्यांच्याकडून ऑलिम्पिकसाठी ट्रेनिंग घ्यायचे. फावल्या वेळात त्यांना मराठी, हिंदी शिकवायचे.
पुढे त्यांना साठेबिस्कीट कंपनीमध्ये नोकरी लागली. साठे बिस्कीटचे मुख्यालय होते कराचीला. तर बाबुरावांना पावसाळ्याचे ४ महिने सोडले तर कराचीला आठ महिने नोकरीसाठी राहावं लागायचं. पण तिथेही त्यांची अंगातली रग शांत बसायची नाही. कराची-पुणे हा प्रवास ते सायकलवरून करायचे. तिथूनच त्यांनी मानसरोवरला सायकलप्रवास देखील केला होता.
पुण्यात असताना त्यांना बालगंधर्वांच्या गाण्याची आवड निर्माण झाली होती. ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवायचे.(आता बास की किती काय करणार)
मग बालगंधर्वांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचा डोअरकीपर म्हणूनही नोकरी केली होती. तिथे त्यांची सगळी गाणी पाठ झाली. पुढे कराचीला आल्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसची आई म्हणजेच जद्दनबाई, बेगम आरा या त्याकाळच्या सर्वोत्तम गायिका गोखल्यांकडून गंधर्व स्टाईलचं गाण शिकण्यासाठी येत.
त्यांची किर्ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहचली. बाबुराव गोखलेंना त्यांनी बडोद्याला प्रिंटींग शिकवण्याच्या नोकरीवर ठेऊन घेतलं. पण खरा उद्देश त्यांच्या धावण्याला वाव देणे हा होता.
१९३६ साली जेव्हा बर्लिनमध्ये ऑलिम्पिक होणार होते तेव्हा बडोद्याच्या महाराजांना हिटलरचे खास निमंत्रण होते. सयाजीराव जर्मनीला आपल्या सोबत बाबुराव गोखल्यांना घेऊन गेले.
स्पर्धेदरम्यान गोखल्यांची हिटलरशी ओळख करून दिली. अनवाणी रोज ६०-७० किलोमीटर धावणाऱ्या या अवलिया धावपटूवर हिटलर फुल इम्प्रेस झाला. त्याने गोखल्यांना जर्मनीत काही दिवस ठेवून घेतले. त्यांचा पाहुणचार केला होता. हिटलरशी त्याकाळात त्यांची चांगली मैत्री झाली होती.
पुढे ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जुने शिष्य व तेव्हाचे गव्हर्नर स्वतः आले. हे बघून बडोद्याचे महाराजसुद्धा आश्चर्यचकित झाले होते.
असा हा अवलिया माणूस. तारुण्यात गंमत म्हणून घरात चित्ता, अजगर असे प्राणी पाळायचा.
टिळकांचे नातू म्हणजेच माजी विधानसभा अध्यक्ष जयंतराव टिळक हे त्यांचे खास मित्र. त्यांच्यासोबत अनेकदा शिकारीसाठी रानोमाळ भटकन्ती केली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वतःचं पेपरविक्री आणि बुक बाईंडिंगच छोटसं दुकान उघडलं आणि आयुष्यभर ते संभाळल.
जवळपास १०३ वर्ष जगले. रोज जेवणाला १५ भाकऱ्या खाल्ल्या. आणि हे त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून जाणवायचं देखील नाही.
आयुष्यात एकदाही दवाखान्याचे तोंडही बघितल नाही. त्यांच्या मृत्यू नंतर मेडिकल सर्टिफिकेट कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या लेकीला आणि जावयला पडला होता.
ही कथा वाचली तरी आपल्याला वाटेल भिडू आपल्याला थापा मारतोय. मात्र आजही पेठेत गेले तर अनेक जण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमाचे साक्षीदार सापडतील. २००१ साली त्यांना प्रसिद्ध योगगुरु बिसी अय्यंगार, जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी, संस्कृत पंडीत लक्ष्मणशास्त्री शेंडे यांच्यासोबत पुण्याचा मानाचा शारदा ज्ञानपीठ सन्मान देण्यात आला.
सुप्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्तमानपत्रात श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता त्यात या सगळ्याचा उल्लेख केला आहे...
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...