Monday, 6 June 2022

केंद्र सरकारच्या योजना

 






मा तुझे सलाम

 महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.

फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे.

मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.

आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.


या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.


पहिला भाग :-

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत. 

याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले कि त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.

प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे 

सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्ट पासून *ड्रोन* बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.


दुसरा भाग :-

आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने *दुसरे पारितोषक* पटकावले.

त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा.

जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते.

हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.

प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता. निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा... आणि घोषणा झाली *'आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे'* त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले. 

त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ) 

"रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन" 

मध्ये त्याला सामावून घेतले आहे

भारतीय 'बलस्य मूलं विज्ञानं' चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी.

 सोडून द्यायला शिका !!

आज सकाळची गोष्ट आहे, नित्यनेमा प्रमाणे मी प्राजक्ताच्या झाडाच्या बाजूला ध्यानात बसलो. पण आज काही ध्यानात मन लागत नव्हते. 

भविष्यात सर्व कसे होणार याबद्दल काहीशी चिंता मनात घर करत होती. तो विचार कसाबसा गेला की, भूतकाळातील त्रागे, वेदनादायक क्षण आठवत होते. अश्याने डोक जड पडायला लागले. नैराश्य, विचारांचे वादळ उठायच्या आत मी डोळे उघडले. 

समोर प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायला सुरूवात झाली होती, बरीच फुले खाली पडली होती. मी ते पहातच राहिलो, झाडाला कळ्या लागल्या, कळ्यांचे फुले झाले. आणी प्राजक्ताच्या झाडाने आपली फुले कोमेजून जायच्या अगोदर सोडून द्यायला सुरूवात केली. संपुर्ण फुलांचा सडा जमिनीवर पडला होता. 


प्राजक्ताचे झाड आपल्या फुलांमध्ये अडकून राहीले नाही, कदाचीत त्याला समजले असेल की रात्री परत कळ्यांची फुले होतील आणी पुन्हा सुगंधाची बहार येईल. या विचाराने ते आजचा दिवस आनंदाने आणी भरभरून जगले असेल. 


मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. निसर्ग आपल्याला पावलोपावली बदलाची अनुभूती करून देत असतो. तो आपल्याला क्षणोक्षणी सोडून द्यायला सांगतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आपण ते स्वीकारत नाही.


माझ्या मनात उठलेल्या भविष्याच्या विचारांचे आणी भूतकाळाच्या आठवणींचे काहूर कसे शांत करायचे याचे उत्तर मला प्राजक्ताच्या झाडाने आणी फुलांनी दिले होते. किती सोप करून मला सांगितल होत. 


भूतकाळातील चांगल्या वाईट अनुभवांचे ओझे आणी भविष्याची चिंता सोडून देणंच तुमच्या आजच्या आनंदाचा मार्ग प्रशस्त करतो, या प्राजक्ताच्या झाडाने मला हे परत आठवण करून दिले. असे केल्यानेच आजचा दिवस आनंदात, समाधानात आणी भरभरून जगता येईल हेच खरे आहे. 


मृत्यू कोणत्याही क्षणी आपल्याला गाठू शकते हे तर सर्वमान्य सत्य आहे. आजचा दिवसही आपल्या हातून निसटत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असूदे, आपण सर्व राग, द्वेष, अहंकार, उद्याची चिंता, भूतकाळाचे ओझे सोडून, आजचा दिवस, आताचा क्षण भरभरून जगायला हवा, सकारात्मक रहायला हवे, कारण हा दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आपण उद्या असू की नाही कुणालाच माहित नाही.


आपल्या हाती फक्त एकच मंत्र ..... 

।। सोडून द्यायला शिका।।

🙏🙏🙏🙏🙏

 *⏰वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण, वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात, तेच खरे आपले असतात.* 😊


     *❣️शिव सकाळ❣️*

सुप्रभात


 

Sunday, 5 June 2022

 मंदिरात तुफान गर्दी होती. दर्शनासाठी एवढी लांबलचक रांग बघून एका विदेशी मुलीला कमालीचं आश्चर्य वाटलं , तोच एक पुजारी तिच्याजवळ जाऊन म्हणाला , " मॅडम , रांग खूपच लांब आहे , असं इथं उभं राहून दर्शन होणं कठीण आहे . ५०१ रुपयांचा VIP पास घ्या , लगेच दर्शन होईल ." ती विदेशी मुलगी म्हणाली ," मी ५०१ रुपये देते , देवाला सांगा, बाहेर येऊन भेट ." पुजारी म्हणाला , " मॅडम , चेष्टा करता का ? देव कधीतरी मंदिराच्या बाहेर येतो का ? " ती विदेशी मुलगी नेटाने म्हणाली , " मी ५००० रुपये देते , देवाला सांगा , मला माझ्या घरी भेटा " रागाने लाल झालेला पुजारी म्हणाला , " तुम्ही देवाला काय समजलात ? " विदेशी मुलगी नम्रपणे म्हणाली , " हेच तर मी तुम्हाला विचारू इच्छिते . तुम्ही देवाला काय समजता ? नोटा छापण्याची मशीन ?

 🌹देव दगडात असतो कि नसतो?

☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.

👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,

    " स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.

किती मूर्खपणा आहे. 

मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.

तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."

     सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔

       आणि.....

तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी 

शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,

 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "

  त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."

  ✨    स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.

     तो व्यक्ती निरूत्तर झाला. 

त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं. 

     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.

  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, 

🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.

       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.  "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."

          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत." 

त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."

 ✨🌟  

यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि

👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."

 हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

☝     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

  💐  संत तुकाराम महाराज म्हणतात.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले । 

तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।

   

☝ देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.

  ☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

Featured post

Lakshvedhi