Sunday, 5 June 2022

हास्य तरंग

 


खेळ खेळ भारत

 🧎‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏀 *खेळू द्या मुलांना, तो त्यांचा अधिकार आहे !* रवि,५ जून, ११ वाजता

(Physical exercise -short and long term benefits)

🔴 *'डॉक्टर...., एक विचारू?'* या बालरोग तज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा) यांच्या *शिक्षक पालक प्रशिक्षण अभियान* या खास कार्यक्रमात दर रवि स.११ ते १२ 

🔴 For live parenting programme and interaction, visit ....

http://www.tinyurl.com/MAHAIAP4PARENTS

🔴 दर रविवारी सकाळी ११ वा. आपल्याला हा महत्वाचा कार्यक्रम चुकवायचा नसेल, reminder पाहिजे असेल तर *MAHAIAP YouTube* चॅनेलचे सदस्य व्हा (subscribe करा, Like करा)!

तसेच MAHAIAP Facebook account ला सुद्धा जॉईन व्हा.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

 *खेळू द्या मुलांना, तो त्यांचा अधिकार आहे !* रवि,५ जून, ११ वाजता

🔴 *वक्ते, मार्गदर्शक व संवादक*

▪️प्रा. लक्ष्मण चलमले, 

     रिलायन्स फौंडेशन स्कुल, लोधिवली. पनवेल.

     (मुलांची शारिरीक साक्षरता व फिट इंडिया, हिट इंडिया चळवळीचे कार्यकर्ते.)

▪️प्रा. श्रीमती अनुराधा दांडेकर,

     M.Sc. B. Ed.,

     शरीरशास्त्र तज्ञ. लोधीवली.

▪️श्री. रमेश खाेत. 

      B.P.Ed.; M.P. Ed.

     व्हॉली बॉल कोच, महाड . रायगड

▪️डॉ शुभदा खिरवडकर,

      बालरोग तज्ञा , नागपूर

▪️डॉ अभिनय दरवडे, 

     बालरोग तज्ञ, धुळे.


▪️For many such videos on parenting in past, visit

https://tinyurl.com/mahaiaplive

▪️Every Sunday at 11 AM for live parenting programme and interaction, visit ....

http://www.tinyurl.com/MAHAIAP4PARENTS


🔴 *कृपया हा मेसेज आणि लिंक (दर रविवारी) आपल्या संपर्कातील पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांना फॉरवर्ड करावी. लिंक प्रत्येकवेळेस सारखीच आहे, सेव्ह करावी.🙏🏻*


🔴 *संयोजक, निमंत्रक व प्रकल्प समिती सदस्य* 

डॉ. हेमंत गंगोलिया, अध्यक्ष

डॉ. अमोल पवार, सचिव, 

बालरोग तज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा)

डॉ. समीर दलवाई, मार्गदर्शक, मुंबई

डॉ. शेखर दाभाडकर, महाड

डॉ. जयंत पांढरीकर, अमरावती

डॉ. सुचित तांबोळी, अहमदनगर

डॉ. सतीश अग्रवाल, अमरावती

डॉ.सदाचार उजळंबकर, नाशिक

डॉ. शुभदा खिरवडकर, नागपूर

डॉ. अभिनय दरवडे, धुळे

डॉ. संदीप कवडे, पुणे

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

आनंदाचे डोही आनंद तरंग


 *एका भारतीय संगीतकाराने इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा.*

*आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणं ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा.....*


*सोनेरी गाणं - 1*


*ऋषीतुल्य जेष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित माचीवरला बुधा* या चित्रपटाच्या वेळी *जेष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ* यांना स्वतःलाही माहीत नव्हत की या चित्रपटातलं एक *संस्मरणीय , विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं.* याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच *हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.*


झालं असं की , या चित्रपटाचे *दिग्दर्शक - विजय दत्त आणि पटकथा , संवाद लेखक - प्रताप गंगावणे* एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक , या चित्रपटात *केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली.* कोणतंही वाद्य नको , कोणताही आवाज नको , फक्त पक्षांचेच आवाज असतील असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाण करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू , कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू पण वाद्याशिवाय , आवाजाशिवाय , केवऴ पक्षांच्याच आवाजत गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे , केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी ( विजयदत्तजींनी ) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे , प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.


पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय तुम्ही बनवू शकाल का .. असा प्रश्न समोरून येताच , धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.


मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास , अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी *दिग्दर्शक विजयदत्तजींना* सोबत घेऊन दोन तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे , आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं , पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार ... त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा , अर्नाळा , त्र्यंबकेश्वर , सातारा  सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले आवाज , ऐकू येतील ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ते ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक *गोरखनाथ धुमाळ* यांना घेऊन जंगला जंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं. तब्बल 

१९००० कि.मी. चा प्रवास करत , सहा महिने , रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता , पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची , नेमके आवाज हेरायचे , त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं... सोपी गोष्ट नव्हतीच मुळी , अजिबातच ... पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.

दोन आठवडे लोटले...  अन् एका जादूई क्षणी बुलबुल , सुतार , खंड्या , कावळा , चिमणी , करकोचे , बदक , कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं.

जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही , कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत , कोणाही व्यक्तीचा आवाज नाही ... आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज , पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते , माझ्या नाशिकचे , थोर , जेष्ठ संगीतकार - 

पं. धनंजयजी धुमाळ ( सर )


  - मोहिनी घारापुरे - देशमुख 

पत्रकार, नागपूर

संकलन : शरद मगदूम

*अबकड कल्चरल ग्रुप, सांगली*

🪀 *94226 22626*

 भांड्यांची कल्ही डोक्याला!


हे वाचा.

*कलही केलेली भांडी🍵*

डायबिटिस वर लेख

*कथिलाचे पाणी*

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकारक आहे.

ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते.ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.

’ हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती.तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती.

पितळ्याच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती.त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.

Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कल्हईच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट ही मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.

Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.

(म्हणजे आमच्या पूर्वजांना हे पूर्वी पासूनच माहीत होते. त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा कमवला नाही, म्हणून काय ते अडाणी होते का?)

अरविंद जोशी BSc.

९४२१९४८८९४

Saturday, 4 June 2022



 हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा"  

- राज्यपाल भगतसिंह कोश्यार.

            मुंबई, दि.4: हिंदी भाषिक लोक केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठी शिवाय हिंदी भाषा देखील उत्तम बोलतात. अनेकदा महाराष्ट्र व गुजरात मधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचा गुण आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केली.   

            उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे 'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावर एका चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

            एखादी भाषा केवळ लिहून - वाचून येत नाही. तर भाषा ऐकून, व्यवहारात आणून व बोलून चांगली आत्मसात होते असे सांगताना उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊँनी व इतर भाषा बोलल्या पाहिजे, मुलांना शिकविल्या पाहिजे, आपापसात आपल्या भाषेत बोलले पाहिजे तसेच आपल्या भाषेत लघुपट, माहितीपट, व सिनेमांची निर्मिती केली पाहिजे. भाषा प्रसारासाठी मिशन मोडवरच काम केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   

            आपण कुमाऊं प्रदेशात जातो त्यावेळी लोकांशी कुमाऊँनी भाषेतच बोलतो असे सांगताना कुमाऊँनी - गढ़वाली भाषांमध्ये विपुल साहित्य आहे, एकापेक्षा एक सरस वाक्प्रचार व म्हणी आहेत; हिंदी सिनेमामुळे जसा हिंदी भाषेचा प्रचार प्रसार झाला तसा कुमाऊँनी - गढवाली या भाषांचा प्रसार त्या भाषेतील लोकगीतांमधून होतो, असे राज्यपालांनी सांगितले. 

            महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण सर्व विद्यापीठांना दीक्षांत समारोहाचे संचालन इंग्रजीतून न करता मराठी भाषेतून करण्याचा आग्रह धरला व आज सर्व विद्यापीठे आवर्जून मराठी भाषेतून सूत्रसंचलन व भाषणे करतात असे राज्यपालांनी सांगितले. 

            छत्तीसगह, झारखंड या नव्याने निर्माण झालेल्या राज्यांना देखील स्वतःची भाषा आहे, परंतु उत्तराखंडला स्वतःची सामायिक भाषा नाही. उत्तराखंड येथे गढवाली - कुमाऊँनी यांसह 14 बोलीभाषा आहेत. या दृष्टीने राज्याची एक प्रातिनिधिक सामायिक भाषा विकसित झाली पाहिजे, असे मत साहित्यिक डॉ. राजेश्वर उनियाल यांनी मांडले. 

            भाषा राजाश्रयानेच वाढते त्यामुळे शासनाने उत्तराखंडच्या भाषांना प्रोत्साहन द्यावे व त्यादृष्टीने समितीचे गठन करावे असे मत ज्येष्ठ साहित्यिक व भाषाविद डॉ. बिहारीलाल जलंधरी यांनी व्यक्त केले. उत्तराखंड राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील अनेक शब्द मिळते जुळते आहेत. त्यामुळे सर्व भाषांना संगठीत करून उत्तराखंडी भाषा बनवावी, अशी अपेक्षा डॉ. आशा रावत यांनी व्यक्त केली. 

            गढवाली - कुमाऊंनी या भाषा हिंदीपेक्षा अधिक जुन्या आहेत असे सांगून मूळ भाषांचे अस्तित्व टिकावे अशी अपेक्षा नीलांबर पांडे यांनी व्यक्त केली.     

            चर्चासत्राला ज्येष्ठ पत्रकार गणेश पाठक, मुख्य आयोजक चामू सिंह राणा व सूत्रसंचालक संजय बलोदी 'प्रखर' प्रामुख्याने उपस्थित होते. 

            राज्यपालांच्या हस्ते डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी लिहिलेल्या 'उत्तराखंड की जनश्रुतियां' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


000


 



 पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीकरणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

            मुंबई, दि. 4- वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 'माझी वसुंधरा अभियान 2.0' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान रविवार 5 जून 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

            मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

            वातावरणात होत असलेले बदल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या दाराशी आले आहेत. हे सत्य स्वीकारून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरण रक्षणासाठी भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर शासन काम करीत असून यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणाच्या सुधारणेसाठी संभाव्य कृती बिंदू ओळखावे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. वातावरणीय बदलांचे गांभीर्य लक्षात घेता यावर उपाययोजना करण्याची हीच योग्य वेळ असल्याने शासनस्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

 आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा;

कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र

            मुंबई दि. 4 : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

            डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत. 

            डॉ. व्यास यांनी नमूद केले आहे की, राज्यातील चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. एक जूनच्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. ही बाब तत्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान 980 चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी साठ टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड 19 पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील तर त्यावर नजर ठेवली जावी.

            राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे श्री. व्यास यांनी नमूद केले आहे.

            नजिकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.

            ताप आणि सारीने आजारी असणारे रुग्णांवर लक्ष ठेवून रहावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांनी चाचणी करुन घेण्यास सांगावे.सहव्याधी असणारे ज्येष्ठ नागरिकांना एस एम एस चा( सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सैनिटायझेशन) वापर करण्यास सांगावे. कोविड अनुकूल वर्तन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात यावे. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

            बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

000



Featured post

Lakshvedhi