Thursday, 2 June 2022

 


            मुंबई, दि. 1 : सिमेंट बांध जलसमृद्धी सिमेंट बांध कार्यक्रमाअंतर्गत नवीन एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

            प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिंचन निर्मितीसह पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे, नाला/ओढा/छोटी नदी यामधील पाणी अडवून मृद व जलसंधारण करणे, जलधरात पाण्याचे पुनर्भरण करुन भूजलपातळी वाढविणे, पिकांना संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करुन पिकांचे उत्पादन वाढविणे असा उद्देश ठरविण्यात आला आहे.

            याबरोबरच स्थळ निश्चिती करताना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये तसेच खारपाण पट्यामध्ये प्राधान्यक्रमाने सिमेंट बांधाची कामे हाती घेण्यात यावेत. सिमेंट बंधारे फक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे पुनर्भरण क्षेत्र या वर्गीकरणातील जलप्रवाहावरच घेण्यात यावेत. सिमेंट काँक्रीट नाला बांधाचे स्थळ निश्चित करताना तळउतार 2 टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बंधाऱ्याचे स्थळ निश्चित करताना 1:25000 याप्रमाणेच नकाशे वापरण्यात यावेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याकडील भूजल उपलब्धता नकाशे, उपग्रह नकाशे आधारे पुनर्भरणासाठी अनुकूल क्षेत्र/जागा निश्चित करणे शक्य आहे.सिमेंट बांधाची जास्तीत जास्त लांबी 50 मीटर असावी. पाणलोट क्षेत्र 10 चौ.कि.मी. पर्यंत असणाऱ्या क्षेत्रात सिमेंट बंधारे बांधण्यात यावेत. 10 चौ.कि.मी. पेक्षा जास्त पाणलोट क्षेत्र असलेल्या भागामध्ये संबंधित अधिक्षक अभियंता यांनी जलशास्त्रीय अभ्यासाअंती होणार नाही याची खात्री करुन सिमेंट बंधारे प्रस्तावित करण्यात येत आहेत.

            नाला तळपातळीच्या खाली पायाखोदाई कठीण खडकापर्यंत जास्तीत जास्त 1.20 मीटर नाला तळ पातळीच्या खाली घेणे आवश्यक आहे. नाला तळपातळीच्यावर क्षेत्रीय परिस्थितीनुसार जास्तीत जास्त 3 मीटर उंचीपर्यंत सिमेंट बांध बांधावेत. सिमेंट क्राँकिट नाला बांधाची सांडवा पातळी ही जमीन पातळीपेक्षा जास्त नसावी. तसेच बंधाऱ्याची लांबी ही नाला काठाशी मिळती जुळती असली पाहिजे. सिमेंट बंधाऱ्याच्या स्थळ निश्चितीकरिता सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण करुन अंदाजपत्रक तयार करावे. सर्वेक्षणअंती जेथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे किंवा इतर भूसंपादन नसलेले प्रकल्प घेणे शक्य आहे अशा ठिकाणी सिमेंट बांध कामे करु नयेत.

            ही सर्व कामे करताना गुणवत्ता, पारदर्शकता आणि सनियंत्रण ठेवण्यात यावे. सिमेंट बांध एम 15 संधानकात बांधण्यात यावेत. सिमेंट बांधाचे काम सुरु करण्यापूर्वी, काम सुरु असताना आणि काम पूर्ण झाल्यावर असे एकूण किमान 3 फोटो क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत जिओ टँगिग केलेले मोजमाप पुस्तिकेत जोडावेत. काम झाल्यानंतर सिमेंट बांधताना प्लँक वॉल वरती विभागाचे नाव, कामाचे नाव, कामाची किंमत, कार्यारंभ आदेश दिनांक, काम सुरु दिनांक, काम पूर्ण दिनांक आणि कंत्राटदाराचे नाव इत्यादी माहिती बोर्ड लावल्याप्रमाणे रेडिअम रंगाने लिहावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी किमान 5 कामांची किंवा एकाच नाला, ओढा, नदी वरील कामांची एक ई निविदा करण्यात यावी. वरिष्ठ पर्यवेक्षक अधिकारी तसेच दक्षता व गुणनियंत्रण पथकाने सिमेंट नाला बांध कामास प्राधान्याने भेट द्यावी. सिमेंट नाला बांध कामाचा दोष निवारण कालावधी 5 वर्ष राहील.

            या कामाचे काही मापदंडही ठरविण्यात आले आहेत. सिमेंट नाला बांध कामांचे अंदाजपत्रक तयार करताना प्रचलित जलसंपदा विभाग 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता को.प.बंधारे कामांचे आर्थिक मापदंड वापरावेत. मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील राज्यस्तर यंत्रणेमार्फत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल. नवीन सिमेंट बांध घेता येऊ शकणाऱ्या स्थळांची तसेच कामांची यादी उपविभाग, तालुका स्तरावर तयार करुन जिल्हा स्तरावर एकत्रित करण्यात यावी. जिल्हा जलसंधारण अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकत्रित नियोजन संबंधित प्रादेशिक जलसंधारण अधिकरारी यांना सादर करतील. कामाची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता जिल्हा जलसंधारण अधिकारी घेतील. प्रस्तावित कामांचा प्रशासकीय मान्यता प्रस्ताव प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात यावा. अंदाजपत्रक तयार करताना उपचार क्षमता नकाशे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे.


0000



 अत्याधुनिक जापानी टेक्निक ,अब भारत में भी संभव ,बिना गाड़ी खड़ी किये सभी सवारी को एक साथ उतारना हुआ संभव

👉👉

🤣🤣😂🤣😂


🤣

 घागरीत खडे टाकायचे सोडून देऊन डायरेक्ट अंडे पळवायला सुरुवात केली आहे कावळ्यांनी आता ... काळ बदलला, तुम्हीही बदला....


😊

 घरी बसुन आई श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्या.


व्हिडीओ पाहील्यावर आपण स्वःता मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेत आहोत असंच वाटेल


🙏🙏🌸🌸🚩🚩

 बीड जिल्ह्यातील 1078 गावां पाणीपुरवठा योजना

वेळेत पूर्ण करा

-.                       



पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

· पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक

· नव्याने 101 गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार; सौरऊर्जेचा होणार वापर

· मोठ्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी 10 कोटींचा निधी

· परळी शहर व लगतच्या गावांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणार, 5 कोटींचा निधी प्रस्तावित

· 5 व 7.5 एच पीच्या पंपांची जागा सोलर पंप घेणार; यासाठी 50 कोटींचा निधी

            मुंबई दि. 1 :- बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून सुमारे 1367 गावांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या योजनेची कामे हाती घेण्यात आली असून, 1078 गावांतील योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातील ज्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे तत्काळ सुरू करुन निर्धारित वेळेत पूर्ण करावेत; असे निर्देश आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.

            बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधून सुरू व प्रस्तावित कामांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून ही बैठक झाली. दोनच दिवसांपूर्वी बीड येथे जलजीवन मिशन मधील कामांचा धनंजय मुंडे यांनी बीड येथे आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक सहकार्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले होते.

            बैठकीस मंत्री श्री. मुंडे यांच्यासह आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, एम जी पी चे मुख्य अभियंता यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून, ज्या गावांमध्ये अद्याप कोणत्याही योजनेतून पाणी पुरवठा नाही, अशा सुमारे 101 गावांमध्ये सौर ऊर्जेसह पाणी पुरवठा योजना नव्याने मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

            बीड जिल्ह्यातील 50-60 मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या एक्सप्रेस फिडर साठी आवश्यक असलेले 10 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी विभागाला दिले आहेत.

            परळी शहर व आजूबाजूला लागून असलेल्या गावांना एकत्रित पाणी पुरवठा करून 24 तास पाणी उपलब्ध तरुण देण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणीस 5 कोटी रुपये व अन्य आवश्यक कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजुरी साठी सादर करावा, असेही निर्देश मंत्री श्री. मुंडे यांच्या मागणीनंतर मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

            काही गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 5 एच पी व 7.5 एचपी चे पंप बसवलेले आहेत; या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे सोलार पंप जोडणी करून विजेची बचत केली जावी, असे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सुचवले होते. 5 व 7.5 एच पी च्या सोलार पंपांची मागणी दुरुस्ती करून डीपीआर करावेत व प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली. 

            बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावोगाव-घरोघर पाणी पुरवठ्यासाठी पालकमंत्री श्री. मुंडे यांनी एक मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेस आवश्यक सर्व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री श्री. मुंडे यांनी पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील तसेच विभागाचे बीड जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.

००००





 वॉर्सा - मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापारपर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत

 

            मुंबई, दि. 1 : पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.

            पोलंड - भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४०,००० भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

            शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्राशी जुने संबंध

            पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.   भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.

            बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.

०००

Polish Ambassador meets Maharashtra Governor

      "Direct flights between Warsaw - Mumbai will promote business, tourism": Ambassador Burakowski

      The Ambassador of the Republic of Poland to India Prof Adam Burakowski today said that the establishment of direct air connectivity between Warsaw and Mumbai will promote business and tourism between Poland and India.

      The Polish Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Wed (1 Jun). The Consul General of Poland in Mumbai Damian Irzyk was also present.

      The Ambassador told the Governor that the first direct flight from the Polish capital of Warsaw landed in Mumbai on 31st May. The flights by Polish airlines will operate thrice a week, he added. 

      The Ambassador told the Governor that there are 40,000 Indians living in Poland and contributing to various walks of life. He said Poland has a very strong bond with Maharashtra as Kolhapur had offered home to Polish refugees in the second world war. He said Poland will be creating a small museum in Kolhapur, he added.

0000


 


 खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022

कबड्डी संघ हरियानाकडे रवाना

क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून शुभेच्छा.

            मुंबई, दि. 1 : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने याहीवर्षी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी हॅट्ट्रीक करेन, असा विश्वास व्यक्त करून संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

             हरियाना येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पदक मिळवण्याचा संघाने निर्धार केला.

            क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे नोडल ऑफिसर आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. सोबत अन्य पदाधिकारी देखील संघासोबत आहेत.

            या वर्षीच्या स्पर्धेत ३७१ खेळाडू सहभागी झाले आहेत. २१ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होत आहेत. ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.

            मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

--------

सहभागी क्रीडा प्रकार

            राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३५६ खेळाडू आहेत. खेळाचे नाव व कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४), बॅडमिंटन (४), कुस्ती (३३), गटका (१६), थांग ता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), अॅथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरले आहेत.

Featured post

Lakshvedhi