Tuesday, 31 May 2022

 केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा


राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद

पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे

            मुंबई, दि. 31 : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

            विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सह्याद्री अतिथीगृहातून दूरदश्यप्रणालीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

            यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.

            यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

            केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक

            प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५ लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

            याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहोचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

व्याज परतावा सुरू करा

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

            केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

            याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझादी का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

            मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

००००



 


वृत्त क्र. 1613


विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य 

 👆👆_क्या आप जानतेे हैं कि जिस दिन प्रदोष होता है उसदिन *महाकालेश्वर मंदिर उज्जैन* के मन्दिर की परिक्रमा पक्षियों द्वारा की जाती है ? यह परिक्रमा एक निर्धारित तरीके से की जाती है, जिसमें परिक्रमा करने वाले पक्षियों का झुण्ड तीन सीधी और चौथी उल्टी परिक्रमा करते हैं । इस अचम्भित करने वाले दृश्य को आप इस वीडियो में प्रत्यक्ष देख सकते हैं । 

               🙏🙏


सावधान पर्यटक

 गोवा फिरायला जानाऱ्या आपल्या सर्व बांधवांना हा व्हिडिओ दाखवा 👏👏


 












 जन्माला आल्यावर आपल्या हाताच्या मुठी बंद असतात.. त्या बंद असतात हेच खरं छान असतं😊😊..


जसजसे मोठे होत जातो तश्या या हातात काहीबाही येत राहते..लहान असताना चॉकलेट, बिस्किटे नंतर छोटी मोठी खेळणी..

आपण अजून मोठे होतो..

हात अजूनच पसरतो..

आता हातात खेळण्या ऐवजी मोबाईल आलेला असतो, त्याचं अप्रुप काही दिवसांनी संपते..तारुण्यात कधीतरी सुंदर ,आवडणाऱ्या मुलीचा हात हातात येतो अन आपण मोहरून जातो..😊

मग लग्न होतं, मुलं होतात..

आता त्याच हातांवर भली मोठी जबाबदारी येऊन पडते..

आई वडिलांची दुखणी, बायकोच्या ईच्छा आकांक्षा, मुलांची शिक्षणे. व्यवसायातील जबाबदारी हे सगळं आपल्या हातावर येऊन पडतं...

तारुण्यात आपल्याला जोश असतो, काहीही काम हातावर घेतलं ते तडीस नेलं अशी हाताची पॉवर असते..

नंतर नंतर मात्र हे हात थकायला लागतात.. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊन..

अन एक दिवस आपण बोलतो..

बस झालं आता... हात टेकले..

राजदीप

मन वेंनधलेले

 एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणलं. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. आलोच दहा मिनिटांत... श्रीखंडपुरी घेऊन आलो” इतकं बोलून निघून जातो. भिकाऱ्याचं समोर असलेलं जेवण आपोआपच मंदावतं. बाईकस्वार गेलाय त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसतो. भाजीभाकरी बाजूला ठेवून वाट बघू लागतो. दहा मिनिटे, पंधरा मिनिटे.... तासभर झाला तरी तो बाईकस्वार काही येत नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पक्वान्नाच्या आशेने क्षुब्ध होतो..मगाचची शांत अवस्था संपते, डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून समोरची भाजीभाकरी खाऊ लागतो. पण आता त्याची चव आवडेनाशी होते. भाजी बेचव तर भाकरी कडक वाटते....मनुष्य काही येत नाही, श्रीखंडपुरी मिळत नाही...

आपलंही असंच होतं बरेचदा...आपल्या हाती काहीतरी असतं. त्यापेक्षा भव्यदिव्य काही मिळावं अशी आशा असते (आशा, महत्वाकांक्षा नक्की असायला हवीच) पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रुप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही तेव्हा त्याक्षणी आपल्याकडे जे हाती आहे तेही नकोसं वाटू लागतं. त्याचीही किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विझला तर जे याक्षणी आपल्या नशिबी आहे त्या वर्तमानाचा आनंद घ्यावा....

 एकदा एका माकडाला 🐵अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे 🦁कान ओढले. 


सिंहाने उठून रागाने😡 गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ?

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?


माकड : मी कान ओढले, महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे😒; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.


सिंहाने हसून विचारले 🤠: माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिले तर नाही ना ?🙈


माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.😆😅


या कथेचे सार.....,

एकटा राहून जंगलाचा राजा ही कंटाळतो.😂यावरून स्पष्ट होत की मैत्री ही हवीच..!!


म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा,🤝 त्यांचे कान ओढत रहा..!😃, म्हणजे चेष्टा मस्करी करीत रहा.😜 मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय..😍.


वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाणघेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो..🥳.  कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा,मजा करीत रहा.


😎.संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.👨‍👩‍👦‍👦               

 विश्वास ठेवा की,तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू शकूत..


मैत्री-श्रीमंत किंवा गरीब नसते ,मैत्री शिकलेली  वा अडाणी  असावी असे काही नसते. कारण- मैत्री ही  केवळ मैत्रीच असते


👬👩‍❤️‍👩 ☺️.🙏🙏🤝🤝🙏🙏

Featured post

Lakshvedhi