Tuesday, 31 May 2022

 कोरोनातील दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना

पी.एम. केअर प्रमाणपत्राचे वाटप

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 17 बालकांचा समावेश

            मुंबई, दि. 30 : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना "पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन" या योजनेंतर्गत मिळणारे सर्व लाभ देण्यासाठी सोमवार दि. 30 रोजी केंद्र सरकारच्या वतीने देशभर ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्हा सहभागी झाला. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 17 बालकांना प्रत्येकी 10 लाख रु. डिपॉझीट केलेले त्यांच्या नावाचे पासबुक, PM JAY हेल्थ कार्ड, पंतप्रधानाचे मुलांना पत्र आणि मुलाचे पी. एम. केअर प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले.


            जिल्हाधिकारी कार्यालय, बांद्रा, मुंबई उपनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीसह बालकल्याण समिती व बालन्यायमंडळाचे सदस्य माणिक शिंदे, सिमा अदाते, जयश्री लोंढे, अनाथ बालकांसह त्यांचा सांभाळ करणारे नातेवाईक उपस्थित होते. जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या प्रमुख श्रीमती देसाई आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. नागरगोजे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.


000



 

Monday, 30 May 2022

 कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास

रोजगार संधी आणि उत्पन्नात वाढ

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्य

                                                         - मुख्यमंत्री

• चालू वित्तीय वर्षासाठी बँकांचा राज्यासाठी २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा

• गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५.३७ टक्क्यांची वाढ

• यात प्राधान्य क्षेत्रासाठी ५ लाख २२ हजार ०६८ कोटी आणि इतर क्षेत्रासाठीच्या २१ लाख १० हजार ९३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश

• पीक कर्जावरील २ टक्क्यांचा व्याज परतावा केंद्राने पूर्ववत सुरु ठेवावा- बँकर समितीच्या बैठकीत ठराव

            मुंबई, दि. 30 : पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

            त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी देण्याची सूचनाही यावेळी केली. केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी द्यावयाचा २ टक्क्यांचा व्याज परतावा पूर्ववत सुरु ठेवावा असा ठरावही आजच्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

२६ लाख ३३ हजार कोटी रुपयांच्या पत आराखड्यास मंजूरी

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत राज्याच्या २०२२-२३ च्या २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी ५ लाख २२ हजार ०६८ कोटी रुपयांच्या तर इतर क्षेत्रासाठीच्या २१ लाख १० हजार ९३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ४५.३७ टक्क्यांची वाढ आहे. 

कृषी क्षेत्रासाठी १ लाख २६ हजार ०५८ कोटी रुपये

            प्राधान्य क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये कृषी क्षेत्रासाठी १ लाख २६ हजार ०५८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्जासाठीच्या ६४ हजार कोटी रुपयांसह मुदत कर्जाच्या ६२ हजार ०५८ कोटी रुपयांचा समावेश आहे. इतर प्राधान्य क्षेत्रासाठी ३ लाख ९६ हजार ०१० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.

            सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विभागीय संचालक अजय मिचायरी, नागपूरच्या विभागीय संचालक श्रीमती संगिता लालवाणी यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी

            शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल तर कृषी प्रक्रिया उद्योग तसेच कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा, तसेच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला बचतगटांना अधिक कर्ज द्यावे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार वाढून विकासाला चालना मिळेल.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा महाराष्ट्राला लाभ मिळावा

            प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेला तसेच वाटप करण्यात आलेला निधी कमी आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी बँकर्स समितीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी महाराष्ट्रातून या निधीसाठी येणाऱ्या अर्जावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याच्या तसेच काही अडचणी असल्यास बँकांनी स्थानिक प्रशासनासमवेत सहकार्यातून मार्ग काढण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. असे अर्ज नाकारण्यापूर्वी संबंधितांबरोबर संवाद साधण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वाणिज्यिक बँकांनी सक्षमतेने पतपुरवठा करावा - उपमुख्यमंत्री

            सहकारी बँका छोट्या शेतकऱ्यांना अधिक कर्जपुरवठा करतात, व्यापारी बँका मात्र मोठ्या शेतकऱ्यांनाच कर्ज देतात असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये सहकारी बँका अशक्त आहेत तिथे वाणिज्यिक बँकांनी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण क्षमतेने पूर्ण करावे.


            आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासी शेतकरी बांधवाला पिक कर्ज देतांना बँका सहकार्य करत नाहीत. त्यांना दिलेल्या वनहक्क जमिनीच्या पट्ट्याच्या सातबारावरील नाव पाहून बँकांनी आदिवासी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

कृषी अन्न प्रक्रिया उद्योगांना वित्तपुरवठा करावा - श्री. भुसे

 



 गावाचा अलिखित इतिहास सांगणाऱ्या टापूंची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी २०)

कवठीची बारी... चार गावांच्या शिवेवर खोल दरीत असलेले हे ठिकाण. तिथे कवठीची खूप झाडे-जाळी होती. हे चोरांचे लपण्याचे ठिकाण. येथे लूटालूट पूर्वी खूप होत असे. दरीत कवठाच्या झाडाखालच्या समाधीखाली सात कढ्या धन आहे असा समज आहे. धनाच्या आशेने तिथे खोदण्याचा प्रयत्न करणारी माणसं एकतर आंधळी होतात किंवा जमिनीमध्ये गाडली जातात, असा पूर्वापार समज आहे. या ठिकाणी एकाला लागून अशी कवठीची बारा मोठी, उंच झाडांची जाळी होती. म्हणून हा भाग कवठीची बारी!

प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावांचे असे अनेक टापू असतात. त्यांच्या गोष्टी अफलातून असतात. त्यातून गावाची जडणघडण, निसर्ग-भूगोल, प्रथा-परंपरा, चालिरिती, शेती-पाणी याच्याशी संबंधित गोष्टींवर प्रकाश पडतो. अशाच एका गावातील टापूंची गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Parala-Tapu1

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही विसावी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 


पीएम केअर फॅार चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील19 बालकांना किटचे वाटप

            मुंबई, दि. 30 : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे सर्व कागदपत्रांची किट या मुलांना वितरित करण्यात आली.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे कागदपत्र वितरित करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मनिषा कायंदे तसेच दोन्ही पालक गमावलेली बालके उपस्थित होते.

            वलखमा फातमा आमिर आलम मिर्झा या बालिकेने जानेवारी २०२२ मध्ये १८ वर्ष पूर्ण केली असून या बालिकेसह मुंबई शहर जिल्ह्यातील १८ अनाथ बालके अशी एकूण १९ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाली.

        या किटमध्ये पी एम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेबाबत थोडक्यात माहिती, या योजनेचे पासबुक, जनआरोग्य कार्ड, प्रधानमंत्री यांचे या मुलांना पत्र तसेच बालकाचे पीएम केअर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

              केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन म्हणाले, मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पद्धतीने राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन ही योजना आहे,असेही राज्यमंत्री एल. मुरूगन यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी यावेळी प्रत्येक बालकांशी संवाद साधला.

            या कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई, बाल न्याय मंडळाच्या सदस्या उर्मिला जाधव, सविता रंधे, युनिसेफच्या अल्फा व्होरा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, शोभा शेलार व प्र. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सविता ठोसर उपस्थित होते.


-----


 ✍️अंतर्मनाचे चक्षू उघडणारा अप्रतिम लेख...

         *👏 मनाचा संयम 👏*

🌸एका नगरात एक विणकर राहत होता. (तो विणकर कोण ? हे नाव लेखाच्या शेवटी आहे.)

अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती.


 त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. 


🌸एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते. 

त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिक घरचा लक्ष्मीपुत्र होता. 


तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?'


🌸विणकर उत्तरला - 'अवघे दहा रुपये !'

त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला - 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे.

 याची किंमत किती ?'


🌸अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !'

त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?'


🌸प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'

तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. 


🌸तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला - 'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.'


यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. 😊

👉तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'


🌸त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. 


👉तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?'😠


🌸विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?'


😠आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला

मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा... मी ताबडतोब अदा करतो..

 ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? 


तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. 

कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. 

तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. 

शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'    


🌸त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला - "हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. 


👉तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील.


 त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. 


🌸इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे.

 कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.' 

मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. 


🌸दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !

त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔 

आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. 


पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏

'हे महात्मा मला माफ करा. 

मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. 👏

मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.'👏


पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला👋 आणि म्हणाला, 'हे बघ मुला. 

👉तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. 

पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. 

ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. 


👉एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? 


🌸तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'......


🪷 *तात्पर्य - आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत.*


 *थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या 'ग' ची बाधा ही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही*.


🪷 *आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये.*


🪷 *तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल.*


 *दृष्टांतातले विणकर म्हणजे 👉संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको.*🙏


🌸🌾🌸🌾🌸🌾🌸

 *आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे.* 

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. 

▪️ *हृदयविकारावर नियंत्रण ठेवते*

ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते

▪️ *डायबिटीस नियंत्रणात ठेवते*

शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. त्यामुळे नित्य सेवनात असावी.


▪️ *वजन ठेवते नियंत्रणात*


महिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते. जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या. १ कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी ३० मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. (गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील) हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल.


▪️ *डोळ्याच्या विकारावर गुणकारी*


डोळे कोरडे पडणे, शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतीलत तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे. दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील. दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होईल.


▪️जर तुम्हाला PCOS ची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे. PCOS मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला PCOS मुळे होणारा त्रास कमी होईल 

▪️ *बॅक्टेरियाला दूर ठेवते*

दालचिनीमधील अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमध्येसमोर आले आहे.

▪️ *डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर*

दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनी पावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण ३० मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

दालचिनीमध्ये प्रामुख्याने थाईमीन, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम, व्हिटमीन, कॅल्शियम, मँगनीज, पोटॅशिअम, निआसीन, कार्बोहायड्रेट इ. महत्त्वपूर्ण तत्त्व आढळतात. ज्यामुळे दालचिनी चवीला थोडी गोड आणि तिखट असते. पदार्थांची चव वाढवण्यासोबतच दालचिनीही कफ निगडीत रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते. त्यामुळे हिचा वापर अनेक औषधींमध्ये केला जातो.

Featured post

Lakshvedhi