सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 9 May 2022
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नागपूर आयआयएमच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन उत्साहात
नागपूर, दि. 08 : नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.
शहरातील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत असलेल्या काळात विविध स्टार्ट-अप्सनी नवा इतिहास घडविल्याचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, विविध नवीन क्षेत्रे व्यावसायिकतेच्या परिघात येत चालली असून त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. स्टार्ट-अप्स आणि अॅपवर आधारित उद्योगांनी अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात हे नवीन उपक्रम सुरु झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीसोबतच महसूल प्राप्ती होणार असल्याने हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरु शकतो.
नागपूर आयआयएमच्या अद्ययावत आणि विविध वैशिष्ट्यांनी समाविष्ट परिसराच्या उभारणीबाबत प्रशंसोद्गार काढून राष्ट्रपती म्हणाले, येथील स्थानिक संस्कृती आणि इतिहास या वास्तुतून परिपूर्णतेने प्रतिबिंबित होत असून तिच्यातून पर्यावरणाप्रती बांधिलकीही दिसून येते. महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. अशा भूमीतील संस्थेने केवळ अध्ययन केंद्र न राहता जीवनदायी अनुभव देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करून या संस्थेच्या सेंटर फॉर एक्सलन्स, नागपूर फाउंडेशन फॉर इंटरप्रूनरशिप डेव्हलपमेंट, सॅटेलाईट कॅम्पस, रिजनल इनोव्हेशन ऑर्गनायझर या उपक्रमांचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. हे उपक्रम आत्मनिर्भर भारतासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरात आपल्या कर्तृत्वासाठी नवी क्षितिजे शोधताना आपल्या भूमीतील मुल्यांचा विसर पडू देवू नका, असे आवाहन करून नागपूर आयआयएमचा परिसर हा नव्या जगातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तरुण मनांचे योग्य पद्धतीने संगोपन करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तु शहरात निर्माण झाली असून नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असल्याचा अभिमानास्पद उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, मेडिकल तसेच लॉजिस्टिक हब म्हणूनही नागपूर विकसित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून या संस्थेचा निश्चितच नावलौकिक वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Sunday, 8 May 2022
*वृधदाश्रम
बँक ऑफ इंडियामधील माझा मित्र श्री. भरत भोगटे याच्या वैयक्तिक जीवनात खूप संकटे कोसळली. एकुलती एक मुल गी वारली. नंतर त्याची पत्नी कॅन्सरने गेली. स्वतःच्या आयुष्यात कित्येक दु:खे भोगलेला हा भरत भोगटेने आपले एकाकीपण विसरून इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी झटतो आहे. पत्नीची आणि स्वतःच्या निवृत्तीनंतरची मिळालेली सर्व पुंजी खर्चून त्यांनी समाजातील वृद्धांना सन्मानाने आणि संपन्नतेने जगण्यासाठी एक अत्यंत वेगळी संकल्पना अंमलात आणली.
*सेवानिवृत्त झाल्यावर अनेकांना मुंबईत किंवा शहरात राहण्याचा कंटाळा येतो. थोडा बदल हवा असतो. पर्यटनाला गेलो तर ते महागडे, धावपळीचे, फारसे स्वातंत्र्य नसलेले असे वाटते. बदल, निवांतपणा तर हवा असतो. नाश्ता, जेवण आणि दैनंदिन गोष्टी करायचा कंटाळा येतो किंवा झेपत नाहीत. पुढच्या पिढीला तुमच्यावर प्रेम असूनही त्यांना तुमच्यासाठी वेळ देता येत नाही. तुम्हालाही स्वतंत्रपणे, जोडीदाराबरोबर, मित्रांबरोबर ४ / ८ दिवस कुठेतरी जाऊन रहावेसे वाटते. टिपिकल हॉटेल वास्तव्य महाग आणि चाकोरीबद्ध वाटते.*
*सिंधुदुर्गामधील तिरवडे गावामध्ये भरतने ' माझे आजोळ ' हा एक रिसॉर्ट बांधला असून येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राजेशाही निवृत्त जीवनाची सोय केली आहे. याची अनोखी ओळख अशी की येथे कुणालाही, हॉटेल सारखे ४ दिवस, खाण्यापिण्याच्या उत्तम व्यवस्थेसह राहता येते. वृद्धाश्रम म्हटले म्हणजे एक निराशा, हतबलता, असहाय्यता दाटून येते. पण येथे मात्र निवृत्तीनंतर जरी कायमचे जाऊन राहायचे असेल तरी तारांकित सोयी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर खेड्यातील जीवन, शांतता, शून्य प्रदूषण, हटके बदल हवा असेल तर येथे आपण अगदी दोन दिवसांपासून कितीही दिवस, अगदी तहहयात सुद्धा स्वस्तात, उत्तम सुखसोयींसह राहू शकता. तुम्ही तिथे राहत असतांना, तुमची मुले, नातवंडे, नातेवाईकही तेथे येऊन, तुमच्या समवेत राहू शकतात.येथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, नाश्ता उपलब्ध आहे. टीव्ही, इंटरनेट, वाचनालय, वैद्यकीय सुविधा, जवळच दैनंदिन बाजार अशा गोष्टी उपलब्ध आहेत. या ‘ माझे आजोळ ‘ च्या मालकीची आमराई, फुलबाग, फळबाग, भाजीचा मळा त्याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे बागकामाची आवड असणाऱ्यांना एक छान संधी उपलब्ध आहे.*
*भरतने येथे Authentic Village Tourism आणि Old Age Resort याची उत्तम सांगड कशी घातली आहे, वृद्धाश्रम म्हणजे घरच्या माणसांनी सक्तीने लादलेले एकाकीपण, असहाय्यतेने जगण्याचे स्थान झाले आहे. पण या ‘ माझे आजोळ ‘ येथे तुम्हाला स्वत:च्या इच्छेने, उर्वरित आयुष्य आनंदाने, सन्मानाने आणि आपल्या सोयीने जगण्याची संधी मिळते.*
*चार दिवस हॉटेलसारखे किंवा अगदी आयुष्यभर मजेत राहण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम आहे !*
*• पत्ता :माझे आजोळ, आर्यानगरी, मु. पो. तिरवडे, कसाल - मालवण महामार्ग, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.*
*• संपर्क: 88984 62537, 99204 33099, 94221 36961*
*www.maazeaajol.org*
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा )
***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com
महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आता तरी जागे व्हा ।। मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40अंश से. असलेले तापमान आज *45*पार केले आहे.पुढील प्रत्येक ५ वर्षात *४५ ते ५०* नंतर *६०* अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि आहे ती झाडेही सुकतील.आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही..रडू नका लक्षात असु दया तमाम नागरिकांना जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा ३ वर्ष पोटच्या मुलासारखे संगोपन करा. पाणी वाचवण्याचा संदेशाचा प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा *मनापासून विचार करा* सर्वांनी एकत्र या चला एक होऊन झाडे लावून ती चांगल्या पद्धतीने मोठी करू , *हा मेसेज वारंवार पाठवा सुखी व्हाल.. *धन्यवाद !!*
🙏🙏🙏🙏🙏
🥦🥦
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...