Saturday, 7 May 2022

 











 हल्ली बायकांवर कामाचा खूपच लोड येतो.....!😬😬😬

जसे जिल्हाधिकारी यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी

आणि सहायक जिल्हाधिकारी असतात,

कार्यकारी, अधीक्षक व मुख्य अभियंत्यांना उप व सहा. अभियंते असतात

तसं मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहायक पत्नी असायला हवी...!

यावर आपले काय मत आहे ?

चर्चा व्हावी ...

😜😜😜😉😉😉

 शुभ मध्यान्नवेळ मित्रांनो 🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️

घरघर

 *घर खरचं कोणामुळे फुटते.....*


बहूतेकवेळा याचे खापर 

स्त्रियांच्या माथी मारले जाते. कोणाचेही घर स्त्रीमुळे फुटत नाही तर 

ते स्वार्थामुळे फुटत असते, मग तो कुटुंबातील स्त्री , पुरूष कोणातही निर्माण होऊ शकते. 


मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते, मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्रिया अति उत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते.

माणसाला दूरून धूर दिसतो ,आग दिसत नाही .

 स्त्रिने कितीही प्रयत्न केला आणि घरातील पुरूष निःस्वार्थी असला तर तिला घर कधीच फोडता येत नाही. 


कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण 

दशरथ निःस्वार्थी होते, त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही, 

वडिलांच्या आज्ञेनुसार काहीच चुक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण 

भरतानेही त्यांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरूष निःस्वार्थी होते. 


कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही, उलट तिलाच घरात एकत्र रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.

पुरूष निःस्वार्थी असेल तर

जगातील कोणत्याही स्त्रिला घर फोडता येत नाही. पण जर पुरूष स्वार्थी बनला तर

कोणत्याच स्त्रिला घर एकत्रित ठेवता येत नाही. 


धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता, या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत केला, पण त्यांनाच काय भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरी सुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही.


 पूरूषाच्या मनात स्वार्थ तयार झाला तर देवाला सुध्दा घर वाचवता येत नाही, यात

स्त्रीयांना दोष देऊ नका.


एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय

हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानचा क्षण असतो आणि 

आईवडील हयात असताना घरातील वाटणीचा दिवस

हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .

त्यांना काय द्यायचे हे आपल्या हातात असते.


आपल्या स्वार्थासाठी

उगीचच घरातील स्त्रीला बदनाम करू नका. 

घर कधीच स्त्रीयांमुळे फुटत नाही, ते स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे स्त्रीमुळे टिकून असते, ज्या घरातील पुरूष खंबीर व निस्वार्थी असेल तर त्याचे घर कधीही फुटू शकत नाही. 🙏


 Iपीली साड़ी गले में कृष्ण भगवान की कंठमाला.. आज के युग की यशोदा मां 🙏

 शायद आप लोग इन्हें नहीं जानते लेकिन बहुत शीघ्र ही पूरा भारतवर्ष इन्हे जान जाएगा... धर्म के प्रति इनकी भक्ति वह त्याग के आगे हमारी सभी पूजा अर्चना छोटी रह जाती हैं...

  मथुरा में श्री बांके बिहारी मंदिर के बाहर पिछले 30 वर्षों से मंदिर में आने वाले श्रद्धालुओं के जूते चप्पलों की रखवाली करने वाली इन माता का नाम यशोदा है.. मात्र 20 वर्ष की आयु में इनके पति की मृत्यु हो गई थी, आज माताजी 50 साल की हो चुकी हैं इस दौरान माताजी ने श्रद्धालुओं के जूते चप्पलों की रखवाली करके 51 लाख 10 हजार 25 रुपए 50 पैसे इकट्ठा करके 40 लाख रुपए की रकम से एक गौशाला मंदिर धर्मशाला का निर्माण कर डाला... 

                            धर्म क्या है यह इन यशोदा मां से जानिए.. आप लोगों ने पैसों के पीछे भागने वाली फिल्मी सितारों नेताओं खेल सेलिब्रिटी को शेयर करके बहुत फेमस किया आइए सब मिलकर यशोदा मां को भी प्रसिद्ध करते हैं और इन्हें इनका सम्मान दिलाते हैं


🙏🙏 *जय श्री राधे*🙏🙏

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू.

            मुंबई, दि. 6 : - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ तसेच वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२२ पर्यंत मागविण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती व अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त यांनी दिली आहे.

०००



 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2029 अंतर्गत2500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेला रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्य घटनेनुसार सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात आली आहे.

            दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येतील. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                       

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 10 मे, 2022 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 10 मे, 2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत.

            अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 11 मे, 2022 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 11 मे, 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 7 वर्षांचा असेल रोख्यांचा कालावधी हा दि. 11 मे 2022 पासून सुरु होईल. दि. 11 मे, 2029 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कुपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या प्रतिवर्षी दिनांक 11 नोव्हेबर आणि 11 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 6 मे 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००




 जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठीव्यापक प्रयत्न आवश्यक

- धनंजय मुंडे

· कायद्याचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी लवकरच कृती आरखडा

· जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या कार्यशाळेत धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन.

            मुंबई, दि. 6 : जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

            जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते.

            देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात, त्यात कायदा आपले काम करतोच परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत, यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा, या दृष्टीने एक कृती आरखडा तयार करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

            समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून, विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे विभागाचे सचिव सुमंत भांगे यावेळी म्हणाले.

            कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्री. शाम मानव तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. औपचारिक उद्धाटन प्रसंगी सचिव सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष शाम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.

००००



 



Featured post

Lakshvedhi