Friday, 6 May 2022


 प्रदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप

एकाच ठिकाणी सर्व कामांची माहिती मिळणे ही मोलाची बाब

            मुंबई, दि. 5 : एकाच ठिकाणी शासनाने केलेल्या सर्व कामाची माहिती मिळणे ही मोलाची बाब आहे. अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला समजेल असे स्पष्ट मुद्दे पहावयास मिळाले !’, ‘प्रत्येक आणि शेवटच्या घटकासाठी शासनाने केलेले काम मोलाचे आहे.’, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या सचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ ते ५ मे २०२२ पर्यंत चित्रमय प्रदर्शन जुहू येथे भरवण्यात आले होते. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

            प्रदर्शन बघून खूप छान वाटले. महाविकास आघाडी चे सरकार महाराष्ट्रात खूप चांगले काम करत आहे.आपल्या कर्तृत्वाला सलाम. खूपच चांगले काम केले आहे, मुंबई शहर पाहून दुसऱ्या देशापेक्षा महाराष्ट्र राज्य चांगली प्रगती करत आहे. शासनाने खूप कामे केली आहेत. ती कामे आता अशा सचित्र प्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील अशा विविध प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल््य


 पॉवर बोट चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजनाचा मंत्री सुनिल केदार यांनी घेतला आढावा.

            मुंबई, दि. 5 : आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला-1, H2O पॉवर बोट जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजनाबाबत मुंबईतील स्पर्धेच्या निकष आणि स्थळ निश्चितीबाबत गरवारे क्लब हॉऊस, वानखेडे स्टेडियम येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली.

            यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त गीता चव्हाण, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी, कस्टम कमिशनर कुलदीप कुमार, ब्रिगेडियर सुमित सावंत, राजपाल सिंग यांच्यासह मेरी टाईम बोर्डाचे, पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, महानगर पालिका, तटरक्षक दल, नेव्ही याविभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. केदार म्हणाले, बाईक फॉर्म्युला-1 स्पर्धेच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला-1, H2O पॉवर बोट जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धा आहे. यामध्ये १, २, ३ व ४ सर्कीट मधील विजेते स्पर्धक हे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २० ते २४ ड्रायव्हर यामध्ये सहभागी होणार असून नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबई येथे ही स्पर्धा घेण्याचे प्रस्तावित आहे.

            आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) या स्पर्धेचे आयोजन यापूर्वी राज्यात झाले नसून आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) स्पर्धेचे आयोजन Union International Motonautique (UIM) - H२o यांच्याकडून होणार आहे. यामध्ये स्पर्धा आयोजक व राज्य शासन माध्यम राहणार आहे. स्पर्धा आयोजनासाठी संस्थेस तत्वत: मान्यता व Letter of Intent द्यावयाचे आहे. या स्पर्धा आयोजनासंदर्भात आयुक्त, क्रीडा यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे.

            ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाची व अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांची स्पर्धा मुंबई येथे होणार आहे.या स्पर्धेच्या नियोजनाबाबत आज बैठक पार पडली.

            आंध्र प्रदेश या राज्याने या स्पर्धेचे आयोजन दि. 16 ते 18 नोव्हेंबर 2018 या कालावधीत केले होते. कामाबाबतच्या नियोजनबाबतची माहिती क्रीडा संचालनालयास अवगत करण्याबाबत आंध्र प्रदेश पर्यटन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पोलीस व्यवस्था, तटरक्षक दल, पोर्ट ट्रस्ट, मनपा, कस्टम, नेव्ही या विभागाने आपल्या आस्थपनाशी निगडीत ज्या ज्या बाबी आहेत. त्याबाबत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने यावेळी आहे. 

000000




तन्मय कदम-artist

Thursday, 5 May 2022


 कोंढाणे प्रकल्पाच्या कामास सिडकोने गती द्यावी

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

            मुंबई दि ५ :कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामास शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) गती द्यावी. नजीकच्या गावातील पिण्याच्या पाण्याची पूर्तता करावी. तसेच २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.

             रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.पाटील यांनी वरील सूचना दिल्या. या बैठकीस खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, सुरेश लाड, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आदिसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, नजीकच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कोंढाणे धरण प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना १० दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा तसेच, भूभागाचे सर्वेक्षण करताना स्थानिक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने प्रकल्पाचे काम सिडकोने करावे, असे सांगितले.

            या प्रकल्पाअंतर्गत ज्यांना भू भाडे द्यावयाचे आहेत,अशांना मोबदला देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीत केली.

००००


 



Bhavtal


 कोकणातल्या झिपरीचं नेमकं काय झालं?

- बदलत्या हवामानात टिकणाऱ्या ज्वारीची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ०५)

“पयले कुडाची घर होती अन् कुड बांधायला झिपरीचं साठं(धाटे) उपेग केलं जायचं. ते दोन - तीन वरीस टिकायचं, आत्ता घरकुल योजना आल्यापासनं सगळी सिमेंटची घर बांधत्यात, तै झिपरीच्या साठचां काय उपेग?”... रामचंद्र गावित हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील माझा सहकारी. त्यानं केलेला हा सवाल.

विकासाच्या नादात आपण काय - काय हरवत चाललो आहोत, हे पाहिलं की अस्वस्थ व्हायला होतं. पिकांच्या वाणांचा तर गावोगावचा ठेवा नष्ट होत असतो. अशाच मागं पडत चाललेल्या कोकणच्या पालघर-जव्हार भागातील ‘झिपरी’ ज्वारीची ही गोष्ट!

भवताल वेबसाईटवरील ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील पाचवी गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:

https://bhavatal.com/Zipri-Jwari


भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय: bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट.

            मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.

            आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये 120 प्रशिक्षणार्थीकरिता निवासासह प्रशिक्षणार्थी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

            या प्रशिक्षण केंद्रात आदर्शगाव योजनेतील प्रशिक्षणाबरोबरच इतरही प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण केंद्र संचलित करण्यासाठी आस्थापना निर्माण करणे, निधीचा स्त्रोत निश्चित करणे, देखभालीचे धोरण ठरविणे, अल्प व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करणे तसेच प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हे अध्यक्ष असतील. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव/उपसचिव तसेच अवरसचिव या अभ्यासगटात सदस्य असतील. याशिवाय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कन्सल्टंटस संचालक, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदाचे प्राध्यापक आनंद पुसावळे, कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रफिक नाईकवाडी, सेवानिवृत्त कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी प्रतापराव चिपळूणकर, बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे देखील या समितीचे सदस्य असतील. याशिवाय, आदर्शगाव योजना-प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेचे 1 प्रतिनिधी, 1 पंचायत राज प्रतिनिधी,1 सरपंच हे या समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील तसेच मृद संधारण व पाक्षेव्यचे संचालक हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.

००००



 

 मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा शनिवारी जनता दरबार

            मुंबई, दि. 5 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 7 मे रोजी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

            मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय (ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई) येथे 7 मे रोजी सकाळी 11.30 वा. आयोजित या जनता दरबारमध्ये उपस्थित राहून जनतेने शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्या, अडचणी मांडण्याचे आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.

००००

दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विजय चोरमारे यांची मुलाखत

राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष

            मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय चोरमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 6 मे व शनिवार 7 मे, सोमवार 9 मे व मंगळवार 10 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती कार्यरत आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचं योगदान याविषयी सविस्तर माहिती डॉ. विजय चोरमारे दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

००००




Featured post

Lakshvedhi