Monday, 2 May 2022

 जुहू समुद्र किनारी फिरायला आलेल्या पर्यटकांनी घेतली

शासनाच्या कामांची माहिती.

· जुहू येथील प्रदर्शनास मिळाला उत्तम प्रतिसाद

मुंबई दि.१; महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार अशी आज सुट्टी आल्याने जुहू परिसरातील समुद्र किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली होती. बच्चे कंपनी समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होते तर इथेआलेल्या जाणकार आणि सजग पर्यटकांनी शासनाने केलेल्या दोन वर्षातील महत्त्वाच्या कामगिरीची माहिती जाणून घेतली.

             राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे जुहू येथे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे. आज या प्रदर्शनाचा पहिला दिवस होता. पर्यटकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे प्रदर्शन येत्या पाच तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

            नारळपाणी विकणारे विक्रेते, कामगार दिनानिमित्ताने नाशिक वरून आलेली कामगार वर्गाची सहल, आयटी क्षेत्रात काम करणारा युवावर्ग, शिक्षिका, गृहीणी, नातवांना सोबत घेऊन आलेल्या आजीबाई अशा विविध क्षेत्रातील आणि विविध वयोगटातील पर्यटकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

            शासनातर्फे होत असलेल्या कामांची माहिती इथे आल्यामुळे कळली अशी प्रतिक्रिया युवकांच्या एका गृपने व्यक्त केली . समृद्धी महामार्ग तयार होत आला असल्याचे या प्रदर्शनातून कळले तसेच कोविड काळात झालेल्या कामांच्या माहितीने आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रीयाही इथे आलेल्या एका जोडप्याने व्यक्त केली. समाज माध्यमांवर या प्रदर्शना विषयीची पोस्ट टाकून आपल्या मैत्रिणींना हे प्रदर्शन पाहण्यासाठी आग्रह करेन असे खाररोड येथून आलेल्या युवतीने मत व्यक्त केले.

            दोन वर्ष प्रगतीची महाविकास आघाडीची या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन जनतेच्या पसंतीस उतरत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे.

           काय आहे प्रदर्शनात

        कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविधलोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणारे हे सचित्र प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे.

            महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे      

            शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.

00000


 


 




मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महा-उत्सव २०२२ चे उद्घाटन.

मुंबई दि.१ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांच्या कलागुणदर्शनाचा रंगारंग महोत्सव महा-उत्सव २०२२ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

बांद्रा-कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे महा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार, आमदार लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित महा-उत्सव कार्यक्रम हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यापासून ते आपल्या शिपाई पर्यंतच्या सर्व कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.

            शासनाच्या दर्शनिका विभाग, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी कोरोना योध्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमाचे एमएसआरडीए, सिडको आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस, आय ए एस आसोसिएशन आणि भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या रंगारंग कार्यक्रमात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि राज्य शासकीय कर्मचारी व शासनाच्या विविध विभातील कलाकारांनी आप आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.

0000000



 

 *अल्कोहोलची सवय* नष्ट करण्यासाठी आमच्या कडून *विशेष प्रयत्न* केले जात आहेत..

पिणाऱ्याच्या ३ पेग पैकी २ पेग *आम्ही पितो,* आणि त्याला *कमी पिण्यास भाग पाडतो.*

काही दिवसांनी *आम्ही दिसलो,* की तो *कोल्ड ड्रिंक* ऑर्डर करतो.

*अशा पद्धतीने त्याची दारु सुटते..*

🤦🏻‍♂🤦🏻‍♂

*कृपया संपर्क साधा..*

😂🤣🤓😝😆😛🤣😂

Sunday, 1 May 2022





 

 महाराष्ट्रातील खनिजाची चांद्रवारी का हुकली?  

(भवतालच्या गोष्टी) 

पुण्यातील पाषाण येथील खाणीमध्ये सापडणारे एक आकर्षक खनिज, हिरव्या रंगाचे अपोफोलाईट. ते जगभरच्या नॅचरल हिस्टरी म्यूझियममध्ये पोहोचले. अमेरिकेतील प्रसिद्ध भूवैज्ञानिक व चांद्रवीर डॉ. हॅरिसन श्मिट यांना ते इतके आवडले की त्यांनी, ते पुढच्या चांद्रमोहिमेत पाठवणार असे ठरवले होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही; का?

हे भन्नाट खनिज व त्याच्या हुकलेल्या चांद्रवारीबद्दल.. 

आपल्या भवतालातील महत्वपूर्ण, रंजक व रोमांचित गोष्टी, खास भवताल वेबसाईटच्या bhavatal.com वाचकांसाठी, आजच्या महाराष्ट्र दिनापासून: भवतालच्या गोष्टी 

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक- 

https://www.bhavatal.com/Maharashtra-mineral-for-moon      

-

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com



 

Featured post

Lakshvedhi