Saturday, 30 April 2022


 

 आपल्या ग्रुप मध्ये कोणी खगोलशास्त्राचा गाढा अभ्यासक आहे का ?

सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय का फक्त महाराष्ट्रा भोवती फिरतोय ते विचारायचं होतं 

🤷‍♂️

    🌎🌎🌎

        *४५℃*🤣🤣🤣

खिलाडी

 


लेकुरे उदंड झाली

 


Friday, 29 April 2022

 महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत महाराष्ट्र दिनाचा हा समारंभ आयोजित करण्यात आला असून आज या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव भरत गावडे यांनी ध्वजारोहण केले

            आज झालेल्या रंगीत तालमीत अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) एस. जयकुमार, राजशिष्टाचार विभागाचे संबंधित अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते

            रंगीत तालमीत झालेल्या संचलनात संचलन प्रमुख अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, संचलन उप प्रमुख सायबर क्राईम चे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, ध्वजाधिकारी सशस्त्र पोलीस वरळी चे राखीव पोलीस निरीक्षक रमेश लोखंडे, जीप नियंत्रक मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक निंबाळकर यांच्यासह राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस निशाण टोळी, राज्य राखीव पोलीस बल निशाण टोळी, मुंबई अग्निशमन दल ध्वज, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, ब्रास बॅण्ड पथक, पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई अश्वदल पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक) तसेच मुंबई अग्निशमन दल वाहने- आर्टिक्युलेटेड वॉटर वाहन (AWT), मोबाईल वॉटर ट्रान्स्पोर्टेशन वाहन (MWT), हाय राईझ फायर फायटिंग वाहन (HFFV) या पथकांनी सहभाग घेऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली...

00000




 


 नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे काळाची गरज

- छगन भुजबळ.

            मुंबई, दि.२९ :- कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

            येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत. त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

         इंधन बचत जनजागृतीपर वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण       

      हिंदी वादविवाद स्पर्धेत अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्लाच्या शेख अरफा अब्दुल रेहमान, खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली, कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूलच्या आयेशा शेख, मोनू वाल्मिकी यांना गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडूप या विद्यालयातील स्वाहा कांबळी, स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आला. विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहूच्या प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आला. इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर ट्रॉफी प्राप्त केली. महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्लीतील प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांना गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहिणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ व दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज हे प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच इंधन बचतीची शपथही देण्यात आली.


0000




 



Featured post

Lakshvedhi