Friday, 29 April 2022

 नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे काळाची गरज

- छगन भुजबळ.

            मुंबई, दि.२९ :- कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

            येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत. त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

         इंधन बचत जनजागृतीपर वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण       

      हिंदी वादविवाद स्पर्धेत अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्लाच्या शेख अरफा अब्दुल रेहमान, खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली, कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूलच्या आयेशा शेख, मोनू वाल्मिकी यांना गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडूप या विद्यालयातील स्वाहा कांबळी, स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आला. विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहूच्या प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आला. इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर ट्रॉफी प्राप्त केली. महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्लीतील प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांना गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहिणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ व दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज हे प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच इंधन बचतीची शपथही देण्यात आली.


0000




 



 तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छिमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ

 - मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख.

            मुंबई, दि. २९ : कोरोना प्रादूर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २०२१-२२ तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी राज्यात घोषित टाळेबंदी राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.

००००





 आज सायंकाळची आठवण

भवताल कट्टा ४३ 

विषय- 

"उष्णतेच्या लाटा, उष्माघात आणि आपण" 

उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळून निघालाय. त्यामुळे "उष्णतेच्या लाटा, उष्माघात आणि आपण" या विषयावरील 'भवताल कट्टा'

वक्ते- 

डॉ. कृष्णानंद होसाळीकर

(अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान विभाग)

डॉ. प्रकाश देव

(अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखा)

हे तज्ञ सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात शुक्रवारी सायं. ७ वाजता https://bit.ly/3vaESgs या झूम लिंकवरून किंवा भवताल फेसबुक पेजवरून https://facebook.com/bhavatal/ लाईव्ह सहभागी होता येईल.

- भवताल टीम

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 एमटीडीसी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती;

निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वण.

       मुंबई, दि. २९ :- आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी- सवलती देण्यात येणार आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

            कोविड नंतर एमटीडीसीची सर्वच पर्यटक निवासे/ रिसॉर्टमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. महामंडळाचे कर्मचारी आदरातिथ्य आणि विविध उपक्रमांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन तयार झाले असल्याने पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. महामंडळाने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असून तब्बल दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद दिला जात आहे.

            महामंडळाने सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती आहेत. तसेच पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट’चीही सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

            एमटीडीसीकडून पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती संकेतस्थळावर, फेसबूक आणि Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

            नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. नाशिक, लोणावळा (कार्ला), गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे महामंडळाची जल पर्यटन केंद्रे असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे देखील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.

            या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचेही प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

            ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे. एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले असल्याची माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.

००००



 




 


            

 




 _*उष्माघात*_


*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

*ऊष्माघात टाळा*.

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *उष्माघात टाळण्या* साठी खालील उपाययोजना करा..

शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.

ही पोस्ट फक्त पंधरा नव्हे तर हजारो लोकांना पाठवा. फक्त चांगली बातमी येईल याची अपेक्षा न करता चांगल्या बातम्या तयार करा…..!

🙏🙏🏼

अप्रतिम संदेश

 *राजाच्या चार राण्या* 

पहिली राणी इतकी सुंदर होती, कि *तो तिला प्रेमाने बघतच रहायचा*.

❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, *तिला तो सतत बरोबर ठेवायचा*

❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, *तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा* .

❕पण *चौथ्या राणीकडे तो कधीच* लक्ष द्यायचा नाही !!!

❕राजा म्हातारा झाला, *तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला* बोलावले आणि म्हणाला,

 *मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर* येशील का?"

❕राणी म्हणाली "नाही, *मी तुम्हाला इथेच सोडून* देणार आहे."

❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,

 "मी *तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन*. त्यापुढे नाही.

❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, 

"तू *तरी माझ्याबरोबर येशील का नाही* ?

❕तिसरी राणी म्हणाली, "नाही. *तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या बरोबर* जाणार आहे," 

❕आता मात्र *राजाच्या दु:खाला पारावार राहिला नाही*. तो विचार करू लागला. मी या *राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले*! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ??

*माझे जीवन व्यर्थ* *घालवले, फुकट वेळ*, *पैसा, आयुष्य खर्च केले*.

❕तेवढ्यात राजाची *चौथी राणी तेथे आली*, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? *तिच्या अंगावर दागिने नव्हते. तिला अंगभर कपडे देखील नव्हते* की

मूठभर मांस नव्हते.  

❕ती म्हणाली, *तुम्ही जाल तिकडे मी येईन*. स्वर्गात असो की नरकात .. कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी *मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचन* आहे."

❕राजा थक्क होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला की, जिला मी प्रेम सोडा, *साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही*, 

पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, *ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे*?

 राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने *मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला*.कोण होता तो राजा? *कोण होत्या त्या तीन राण्या*? कोण होती ती चौथी राणी? *इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग* का केला..?

❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण *तरीही राजासाठी एवढा त्याग का केला*?

❕तो राजा *दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच* आहोत.

🔸आपली पहिली राणी, *जी आपल्याला जागेवरच सोडते* ते म्हणजे आपले *शरीर*! ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸आपली *दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते*, ती म्हणजे आपली मुले, आप्तेष्ट, मित्र व *समाज.*

🔸आपली तिसरी राणी, *जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते* ती म्हणजे, *धन-पैसा* . आपल्या मृत्युनंतर लगेच ती दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित *चौथी राणी म्हणजे* 

पुण्य , कर्म , माणुसकी , धर्म *जे आपण सदभावनेने , निःस्वार्थीपणे, आणि विना अहंकाराने* करावे , पण ते न करता, आपण जिच्याकडे बघण्यास अजिबात वेळ देत नसतो. *तरी पण ती जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच असते*......!!!!

एक चांगला विचार

 *जय.श्री कृष्ण*

Featured post

Lakshvedhi