Saturday, 23 April 2022

 


 








 

वांगी कलर ओळखा


 

 राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल

-उपमुख्यमंत्री अजित पवार

·       पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

 

            पुणेदि.23: पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालकअधिकारीकर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

            बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या 'राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रउद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटीलपुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहितेउपाध्यक्ष साहेबराव टकलेमानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

            श्री.पवार म्हणालेमहाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून सहकार चळवळ टिकविण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.

ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हा

            स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहीलअशी ग्वाही त्यांनी दिली.

सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करा

            देशपातळीवर होत असलेल्या सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी पोकळी भरण्याची क्षमता नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. या संधीचा फायदा घेतांना बँकेच्या कामकाजासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. सहकारी सोसायट्यांचे नाबार्ड आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.

 

आबासाहेब शिंदे यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यामुळे महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली असा उल्लेख करून नव्या पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेऊन सहकार क्षेत्रात काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेच्या युगात प्रशिक्षण महत्त्वाचे - सहकारमंत्री

            सहकारमंत्री श्री. पाटील म्हणालेसहकाराला 110 वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य नागरी सहकारी बँकांनी केले. नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे चांगले काम होत आहे. संगणकीय प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर प्रशिक्षण महत्त्वाचे झाले आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयीदेखील प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            राज्याचा सहकार विभाग नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करेलअशी ग्वाही त्यांनी दिली. सहकार क्षेत्रात महिला आणि युवकांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी श्री. शिंदे यांच्या मनोगताचे वाचन करण्यात आलेतर श्री. अनास्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात ॲड. मोहिते यांनी असोसिएशनच्या उपक्रमांची आणि प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

             याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्र. दि. तथा आबासाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सहकारी बँकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदा लोणकर आणि पुष्पलता जाधव यांना कै. मीराताई देशपांडे उत्कृष्ट महिला संचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या प्रशिक्षणात सर्वाधिक सहभाग घेणाऱ्या आणि उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठीच्या पुरस्कारांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरी बँकांचे पदाधिकारीसदस्य उपस्थित होते.

 ,*वास्तू पुरुषास*

*साष्टांग नमस्कार विनंती विशेष,*

             झालं असं की, एकजण घरी आले होते ते बोलता बोलता म्हणाले *वास्तू प्रसन्न आहे हं तुमची*' आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली 

तुझी *शांत* करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या की तुला विसरूनच जातो रे आम्ही मग उरत ते फक्त *घर*' तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !!! 

अगदी अपराधी वाटलं मग काय तुझ्याशी *पत्र संवाद* करण्याचं ठरवलं म्हणून आज हे *पत्र* !


 तुझ्या विषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही

घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो तर 4 दिवस मजेत जातात पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते

आजारपणात डॉक्टर म्हणतात आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा पण तुझ्या कुशीत परतल्या शिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं


तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे अंगणातील छोटीशी *रांगोळी* स्वागत करते , दारावरच *तोरण* हसतमुखाने सामोरं येतं , तर *उंबरा* म्हणतो थांब *लिंबलोण* उतरू दे ---

 बैठकीत *विश्वास* मिळतो तर माजघरात *आपुलकी* ! स्वैपाकघरातील *प्रेम* तर दुधाच्या मायेनं ऊतू जात !

 तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील *भीती* पळवून लावते , खरंच *वास्तुदेवते* या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी, *खिडकी* म्हणते *दूरवर बघायला शिक*, *दार* म्हणत येणाऱ्याच *खुल्या मनाने स्वागत* कर, *भिंती* म्हणतात मलाही कान आहेत *परनिंदा* करू नकोस, *छत* म्हणत माझ्यासारखा *उंचीवर* येऊन विचार कर, *जमीन* म्हणते कितीही मोठा झालास तरी *पाय* माझ्यावरच असू देत तर बाहेरच *कौलारू छप्पर* सांगत *स्नेहाच्या पंखा खाली* सगळ्यांना असं काही *शाकारून* घे की बाहेर शोभा दिसेल आणि ऊन, वारा लागणार नाही !

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही *आश्रयदाता* आहेस त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या *अन्न साखळीला* हातभार लावतोस इतकं *मोठं मन* आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे 

तुझ्या वाटणी साठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात याचं खरंच *वाईट* वाटतं

एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही पण तरीही शेवटी *घर देता का कोणी घर*' ही *नटसम्राटाची* घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाही *ते घर नसतं बांधकाम असतं रे विटा माती*


*वास्तू देवते* पूर्वी आई आजी सांगायची *शुभ बोलावं* नेहमी आपल्या बोलण्याला *वास्तूपुरूष* नेहमी *तथास्तु* म्हणत असतो

मग आज इतकंच म्हणतो की 

"तुला *वस्तू* समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या *वास्तूत* वर्षातून काही क्षण तरी सगळी *भावंड मित्रमैत्रिणी आप्तेष्ट* एकत्र वास्तव्यास येऊ दे"

आणि या माझ्या मागण्याला तू *तथास्तु* असच म्हण हा माझा आग्रह आहे


🌹🌹🌹🌹 *तथास्तु*🌹🌹🌹🌹.

पुरस्कार

 


Featured post

Lakshvedhi