Tuesday, 19 April 2022

 रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे माणगाव रायगड




 *मोदी सरकारचे ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान - वैद्यकीय सल्ला पूर्णपणे मोफत*

 केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सल्ला योजना सुरू केली आहे.

 वृद्ध लोक, विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी ओपीडीसाठी रुग्णालयात धाव घेत नाहीत. डोकेदुखी, शारीरिक दुखणे यासारख्या किरकोळ आजारांवर ते घरीच उपचार घेतात आणि दवाखान्यात जायला तयार नसतात.

 तुम्ही आता खालील लिंकद्वारे Google Chrome वर सल्ला आणि उपचारांमध्ये प्रवेश करू शकता. टीप:

 *1*. रुग्ण नोंदणी निवडा.

 *2*. तुमचा मोबाईल नंबर टाइप करा. नोंदणीसाठी मोबाईलवर OTP टाइप करा.

 *3*. रुग्णाचे तपशील आणि जिल्हा प्रविष्ट करा. आता तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाइन संपर्क साधाल. त्यानंतर, व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या कोणत्याही समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. डॉक्टर ऑनलाइन औषध लिहून देतील. मेडिकल फार्मसीच्या दुकानात दाखवून तुम्ही औषध घेऊ शकता.

 *ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.*                                

 तुम्ही ही सेवा रविवारसह दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत वापरू शकता.

 कृपया हे तुमच्या संपर्क यादीतील ज्येष्ठ नागरिकांना पाठवा.

 ही केंद्र सरकारची वेबसाइट आहे:

 *https://www.eSanjeevaniopd.in*

  https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd


 ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक विलक्षण पाऊल आहे....

 कृपया लाभ घ्या आणि ते सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवा

 🙏🙏🇮🇳🙏🏻🙏🏻

 कृपया संदेश पसरवा म्हणजे सर्वजण भारतातील लाभ घेऊ शकतील..

 आपली 

सौ दर्शना भगवान भोईर 

पनवेल महापालिका 

नगरसेविका 

  👏🙏👍

 गिरगाव चौपाटीवरील "दर्शक गॅलरी"चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा

          मुंबई, दि. 17 : गिरगांव चौपाटीवरील "दर्शक गॅलरी"चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले.

          याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते.

          यावेळी माध्यम प्रतिनिधीसोबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्रालयातून राजभवनाकडे जात असतांना इथे या कोपऱ्यात स्वच्छता पाहायला मिळत नव्हती. या परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले. त्यातूनच इथे खूप चांगला स्पॉट तयार झाला आहे. मुंबईकर किंवा बाहेरचे पर्यटक गिरगाव चौपाटी बघायला येतात. त्यांना इथे या गॅलरीत आल्यावर नक्कीच खूप आनंद मिळेल. भरतीच्यावेळी आपण समुद्रात उभे आहोत असा आनंद देणारा हा स्पॉट आहे. चैत्यभूमी भागातही अशीच सुंदर दर्शक गॅलरी उभी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून अनेक चांगली कामे मुंबईत सुरु आहेत,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विहंगम दृश्याचा अनुभव

          स्वराज्यभूमी लगत गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग व कवीवर्य भा.रा. तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी समुद्रात वाहुन नेणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौ.मि. आकाराचा ‘व्हिविंग डेक’ - दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणावरून अरबी समुद्राचे, गिरगांव चौपाटीचे व क्विन्स नेकलेस अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. हा डेक समुद्राच्या लाटांची ऊंची, दाब आदी सर्व बाबींचा तांत्रिक दृष्टीकोनातून अभ्यास करुन त्याअनुरुप उभारण्यात आला आहे.

     

0 0 0


 



 

 लोकराज्य’चा मार्च-एप्रिलचा संयुक्त अंक प्रकाशित

            मुंबई,दि.18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या मार्च-एप्रिल महिन्याचा ‘तिचा हक्क तिचा गौरव’ या महिला विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. महिला विशेष, अर्थसंकल्प 2022-23 ची ओळख व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.


            राज्य शासन महिलांसाठी राबवत असलेल्या योजना, महिलांच्या यशकथा हे या अंकाचे आकर्षण आहे. त्याचबरोबर पंचसूत्रीवर आधारीत असलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण तरतूदींची माहितीही अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. 14 एप्रिल ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त अंकात विशेष विभाग समाविष्ट करण्यात आला असून भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहीमेची माहिती देणारा 'शासन संवाद' हा लेख या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.


            राज्य महिला आयोग, 'माविम', विविध पुरस्कार विजेत्या महिला, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आढावा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचा परिचय आदी विषयांसोबतच ‘मंत्रिमंडळात ठरले’, ‘महत्त्वाच्या घडामोडी’ या नेहमीच्या सदरांचाही अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


0000

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ एप्रिलपासून उदगीरमध्ये

मायबोलीच्या सोहळ्यात साहित्यिक आणि रसिकांनी सहभागी व्हावे.

- स्वागताध्यक्ष संजय बनसोडे.

            मुंबई, दि. १८ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे, ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, जिल्हा लातूर येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मायबोलीच्या या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

            अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान लातूर जिल्ह्याला प्रथमच लाभला आहे. “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयोजित या साहित्य संमेलनात मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करतील. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांसाठी असणार आहे.

            छत्रपती शाहू महाराज सभागृहात दि. २२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. या दरम्यान डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटक ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार असून यावेळी प्रमुख पाहुणे दामोदर मावजो, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, पंडित हृदयनाथ मंगेशकर हे उपस्थित राहणार आहेत.

            दि. २४ रोजी दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत होणाऱ्या समारोप समारंभास राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, पालकमंत्री अमित देशमुख, खासदार सुधाकर श्रृंगारे उपस्थित राहणार आहेत.

            ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार असून साहित्य विषयक परिसंवाद, चर्चासत्रे यांत नामवंतांना बघण्याची, ऐकण्याची संधी लातूरकर रसिकांना मिळणार आहे. संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या विविध साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या प्रमाणावर घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

             दि. २० एप्रिल रोजी येथील भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत सायं. ६.०० ते १०.३० या वेळेत प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय-अतुल गोगावले आणि संचातर्फे ‘संगीत रजनी’ चे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच दि. २१ एप्रिल रोजी सायं. ७ ते १०.३० वा. च्या दरम्यान ‘चला हवा होऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातील कलाकार कला सादर करणार आहेत.  

 राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान.

            मुंबई, दि. 18 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना 'महाराष्ट्र बलस्तंभ' पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, गुंतवणूक, अग्नी सुरक्षा, कला, आदि क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. 

            बलस्तंभ पुरस्कार समितीचे मार्गदर्शक माधव भंडारी, संयोजक मनप्रीत सिंह, सहआयोजक डॉ.सुकन्या अय्यर व इतर मान्यवर उपस्थित होते.   

            राज्यपालांच्या हस्ते डॉ मेघा शर्मा, गौरव गंभीर, भूषण शाह, निशांत मेहता, अनिल घनवट, डॉ सुधीर मेहता, मनन शाह, आशिष शहा, फाल्गुन दोषी, मयांक गांधी, भरत दाभोळकर व विद्येश तोतरे यांना महाराष्ट्र बलस्तंभ पुरस्कार देण्यात आले.  

००००

 जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष प्रदर्शन

मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे


सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

            मुंबई दि. 18 : जागतिक वारसा दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी आमदार संजय दौंड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह संबधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे छायाचित्र आणि चित्र प्रदर्शन 22 एप्रिलपर्यंत मंत्रालय प्रांगणात असणार आहे. जवळपास 350 छायाचित्र या प्रदर्शनात असून यामध्ये प्रामुख्याने राज्यातील गड आणि किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात आल्यानंतरचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर चित्रकार प्रसाद पवार यांनी साकारलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांची काही दुर्मिळ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

जागतिक वारसा दिनी सर्व संग्रहालयात पर्यटकांना विनामूल्य प्रवेश

            पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या चंद्रकांत मांढरे चित्रसंग्रहालय कोल्हापूर, नागपूर, सिंदखेडराजा, औरंगाबाद, सांगली, सातारा, औंध, नाशिक, रत्नागिरी, पैठण, तेर व माहूर या शासकीय संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या प्राचीन कलाकृतींचे महत्त्व जनतेला समजावून सांगणे, संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या वास्तुंची, प्राचीन कलाकृतींची माहिती व महत्त्व पर्यटकांना, संग्रहालय प्रेमींना, शालेय विद्यार्थी यांना माहिती जागतिक वारसा दिनानिमित्ताने दिली जाईल. या दिनानिमित्त सर्व संग्रहालये पर्यटकांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहेत. संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयांद्वारा हेरीटेज वॉक, व्याख्याने, स्पर्धा असेही कार्यक्रम घेतले जातील.

००००



 

Featured post

Lakshvedhi