सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 15 April 2022
यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज !
- महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची चिन्हे
देशातील पावसाचा प्राथमिक अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (१४ एप्रिल) जाहीर केला. त्यानुसार देशात मान्सून काळातील (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची चिन्हे आहेत.
सविस्तर माहिती "भवताल वेबसाईट"वर;
लिंक=
https://www.bhavatal.com/yanda-99-takke-pavasacha-andaj-bhavatal-updates
(भवताल : हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
भवताल अपडेट्स : खास "भवताल"च्या वाचकांसाठी
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
आज सायंकाळची आठवण
भवताल कट्टा ४२
विषय :जगभरातील वन्यजीव नोंदी:
तुम्हीसुद्धा भर घालू शकता.. पण कशी?
(निसर्गात फिरताना आपल्याला गवत, वनस्पती, फुले, कीटक, अळ्या, फुलपाखरे, बेडूक, सरडे, साप असे असंख्य जीव दिसतात. आपण त्यांचे फोटोही काढतो. हे फोटो योग्य ठिकाणी अपलोड करून तुम्ही जगभरातील महत्त्वाच्या नोंदींमध्ये भर घालू शकता. कदाचित, तुमची नोंद नव्या प्रजातीचा शोध लागण्यासाठी, संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकते. हे सारे कसे करायचे, याची मांडणी करणारा कट्टा...)
वक्ते -डॉ. हेमंत ओगले
(फुलपाखरे व चतूर यांचे प्रसिद्ध संशोधक / अभ्यासक)
श्री. स्वानंद केसरी(‘आय-नॅचरॅलिस्ट’ पोर्टलवर वन्यजीवांच्या ४७००+ नोंदी करणारा निसर्गप्रेमी)
शुक्रवार, १५ एप्रिल २०२२; सायं. ७ ते ८.३०
सहभागासाठी:
झूम लिंक-
https://bit.ly/37HvS9a
किंवा
भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह
पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal/
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे 'महावीरोत्सव' संपन्न.
राज्यपालांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान
"शंभर हातांनी कमवा, पण हजार हातांनी दान करा" : राज्यपालांची दानशूर लोकांना सूचना
मुंबई, दि. 15 - तीर्थंकर महावीरांनी सत्य, अहिंसा व अपरिग्रहाची शिकवण दिली. महावीरांच्या विचारातून प्रेरणा घेत महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक व्यक्तीने महावीरांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी असे सांगताना 'शंभर हातांनी कमवा, परंतु हजार हातांनी दान करा', असा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिला.
भगवान महावीरांच्या 2621 व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे गुरुवारी (दि. 14) महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
कर्यक्रमाला महावीरोत्सवाचे आयोजक देवेंद्र भाई, आमदार मंगलप्रभात लोढा व इतर निमंत्रित उपस्थित होते.
भारतात वेळोवेळी संत महात्म्यांनी जन्म घेऊन समाजाला दिशादर्शन केले आहे. त्यांचे उपदेश संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी असतात. तीर्थंकर महावीर हे पावित्र्य, त्याग, निष्ठा व समर्पणाचे प्रतीक होते. या शाश्वत मूल्यांमुळेच आज 2600 वर्षानंतर देखील लोक महावीरांचे स्मरण करतात. भगवान महावीर, गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांच्या विचारांमुळेच आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी समाज कार्यासाठी शैलेंद्र घिया, जमनालाल हपावत, प्रमोद भारेल, घेवरचंद बोहरा, एम. आय. जैन व राकेश जैन नाहर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
00000
Governor presents 'Impact Person of the Year 2021'
to Sanjiv Mehta of HUL
Mumbai - Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Impact Person of the Year 2021 award to the Chairman and Managing Director of Hindustan Unilever (HUL) Sanjiv Mehta in Mumbai on Thursday (14 April). The Award instituted by Exchange4Media was presented to Sanjiv Mehta in recognition of his role in transforming HUL into a most valuable company in India.
The Governor congratulated Mehta for believing more in 'values' than in 'valuation'. He said there is no harm in aiming for more profit, but added that ethics and values should form the core of businesses. He said if Corporates observe values, they will not only create success stories for themselves but will also create an impact on societies. The Governor applauded Sanjiv Mehta during whose stint as CMD for the last 9 years, Hindustan Unilever's market cap increased from 13 billion USD to 65 billion USD.
Chairman & Editor in Chief of Exchange4media Group Annurag Batra, Co-founder Nawal Ahuja, CEO of MX Player Nikhil Gandhi and CEO of ABP news channel Avinash Pandey were present.
हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष संजीव मेहता
'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित
उद्योग समूहांनी मूल्यांकनापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्व द्यावें.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 15 - व्यवसायात उतरलेल्या कॉर्पोरेट्स, उद्योग समूहांनी अधिक लाभाचे उद्दिष्ट जरूर ठेवावे, परंतु उद्योगाच्या दीर्घकालीन विकास - विस्तारासाठी कंपनीच्या सकल मूल्यांकनापेक्षा शाश्वत नितीमूल्यांना अधिक महत्व द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपालांच्या हस्ते 2021 वर्षाचा 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' हा पुरस्कार हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांना गुरुवारी (दि. 14) मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक्स्चेंज फॉर मीडिया माध्यम समूहातर्फे 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी एक्स्चेंज फॉर मीडियाचे संस्थापक व मुख्य संपादक अनुराग बत्रा, सहसंस्थापक नवल आहुजा, एमएक्स प्लेयरचे मुख्य अधिकारी निखिल गांधी, एबीपी न्यूजचे मुख्याधिकारी अविनाश पांडेय व उद्योग, माध्यम, जाहिरात व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या व्यवसाय वाणिज्य इतिहासात अनेक उद्योग समूह आले आणि गेले. परंतु ज्या समूहांनी शाश्वत नीतिमूल्ये जपली तेच उद्योग प्रदीर्घ काळ टिकून आहेत. उद्योग समूहांनी नीतीमूल्ये जपली तर त्यांना यश तर मिळेलच परंतु समाजात देखील ते सकारात्मक प्रभाव पाडू शकतील असे राज्यपालांनी सांगितले.
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांनी विश्वासार्हता जपल्यामुळे त्यांची उत्पादने दशकानुदशके ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत असे राज्यपालांनी सांगितले. संजीव मेहता यांच्या काळात हिंदुस्थान लिव्हर संस्थेचे बाजारभांडवल 13 बिलियन डॉलर पासून 65 बिलियन डॉलर इतके झाल्याबद्दल त्यांनी मेहतांचे अभिनंदन केले.
देशासाठी चांगले तेच उद्योगासाठी चांगले
जे देशासाठी चांगले तेच आपल्या उद्योग समूहासाठी चांगले आहे असे आम्ही मानतो. कोविड काळात आपल्या उद्योगसमूहाने ऑक्सिजन काँसंट्रेटर्स उपलब्ध करून अनेक लोकांचे प्राण वाचवले, असे संजीव मेहता यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'इम्पॅक्ट' मासिकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. अनुराग बत्रा यांनी प्रास्ताविक केले तर नवल आहुजा यांनी आभारप्रदर्शन केले.
योग गुरु बाबा रामदेव, स्टार समूहाचे उदय शंकर, राजन आनंदन, 'बायजुज'चे बायजु रवींद्रन व आयटीसीचे संजीव पुरी यांना यापूर्वीचे 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देण्यात आले आहे.
कडवा सत्य
*कडवे सत्य*
*कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत नाही*....
*आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही*...
*हॉटेलच्या बिर्याणी ला घरच्या खिचडी ची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही*...
*साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही*...
*कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही*...
*शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही*...
*भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंड ची सर जिमला नाही*...
*स्वता सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा आधार नाही*...
*कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही*...
*कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही*...
*कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही*...
*खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तिबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही*
*अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही*...
*मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही*...
*शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही*...
*स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही*...
*सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही*...
*भक्त्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही*...
*घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय कुणीच नाही*....
*आपला माणुस*
🌹🌹🌹🌹
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...