Wednesday, 13 April 2022

 चांगल्या उत्पादन पद्धतीच्या पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारेऔषध उत्पादकांची तपासणी.

            मुंबई दि. 12 : अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम, १९४५ ची अंमलबजावणी केली जाते. या कायद्याअंतर्गत राज्यात औषधे, सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन व विक्री यांचे नियमन केले जाते. औषधे उत्पादकांना मंजूर परवान्याअंतर्गत उत्पादन करतांना औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमातील अनुसूची M अन्वये विहित करण्यात आलेल्या चांगल्या उत्पादन पद्धती (Good Manufacturing Practices) चे पालन करून गुणवत्तापूर्ण औषधे उत्पादन करणे बंधनकारक आहे.

            राज्यात ॲलोपॅथिक औषधे उत्पादन करणाऱ्या उत्पादक आस्थापना अनुसूची M चे अनुपालन करून औषधे उत्पादन करतात याची पडताळणी प्रशासनाच्या औषध निरीक्षकांद्वारे नियमित तपासण्याद्वारे करण्यात येते. माहे जानेवारी, २०२२ ते मार्च, २०२२ या कालावधीत राज्यातील सर्व विभागात ॲलोपॅथिक औषधे उत्पादकांचा तपासणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत राज्यातील कोंकण विभाग ३६६, बृहन्मुंबई ५२, पुणे विभाग १०४, नाशिक विभाग ४३, औरंगाबाद विभाग ४७, नागपूर विभाग २२ व अमरावती विभाग २१ अशा एकूण ६५५ उत्पादकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या तपासणी मोहिमेत ९५ उत्पादकांना अनुसूची M अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहेत. एकूण १६ प्रकरणात गंभीर दोष आढळून आल्याने सदर संस्थाना पुढील आदेशापर्यंत उत्पादन कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १७ प्रकरणात सुधारणा करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            राज्यातील औषध उत्पादकांनी चांगल्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण औषधांचे उत्पादन करावे, जेणेकरून सर्व सामान्य जनतेस सुरक्षित व प्रमाणित दर्जाची औषधे उपलब्ध होतील, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे नियमित उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. राज्यात उत्पादित होणारी औषधे गुणवत्तापुर्ण व सुरक्षित असण्याच्या दृष्टीने सर्व उत्पादकांनी औषधे, सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व त्यांतर्गत नियमातील अनुसूची M (Good Manufacturing Practices) च्या तरतुदींचे अनुपालन करावे यासाठी सर्व विभागीय सह आयुक्त(औषधे) व परवाने प्राधिकारी हे त्यांच्या विभागातील औषधे उत्पादकांना वेबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहेत.

************



 

 मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन.

            मुंबई, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे १३ एप्रिल रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.

            देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने राज्यभर सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालयामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटना असणाऱ्या अभिलेख व छायाचित्रांचे चित्रण प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनास सर्वसामान्य नागरिक आणि इतिहासाचे अभ्यासक तसेच वाचक वर्गाने भेट द्यावी, असे आवाहन पुराभिलेख संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

 उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

- राजेश टोपे

            मुंबई, दि. 12 :- राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये, उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            वातावरणातील बदल व मानवी जीवन यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त रामास्वामी एन. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील वाढत्या तापमानामुळे उष्माघात, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभाग आणि हवामान खात्याने योग्य समन्वय राखून माहितीचे आदान-प्रदान करावे. यामुळे वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जनजागृती करावी. आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, हवामान खाते आदी विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

000000




 मुंबईतील रेडिओ वरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा

- सुभाष देसाई

 

            मुंबई दि. 12आकाशवाणीदूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावेमुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री.देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            श्री. देसाई म्हणालेराज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम सुरु राहणे आवश्यक आहे. आकाशवाणीसह विविध खासगी रेडिओ वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेक मराठी कार्यक्रम हद्दपार झाले आहेत. या ठिकाणी हिंदीइंग्रजी कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यापुढे आकाशवाणीने मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावीखासगी रेडिओंनी देखील किमान दोन तास मराठी कार्यक्रम प्रसारित करावेतअसेही श्री. देसाई म्हणाले.

            मराठी वाहिन्यांवरून मराठी कार्यक्रम हद्दपार होत असल्याची बाब माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही निदर्शनास आणून दिली. यावेळी श्री. देसाई यांनी संबंधित रेडिओ वाहिन्यांना मराठी भाषेतील कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करण्याची सूचना केली. सध्या एफएम वाहिनी, एफ एम गोल्ड वाहिनीवरील मराठी गाण्यांचे कार्यक्रम बंद झाले आहेत. काहींचा वेळ कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदी कार्यक्रमांचे दिल्लीवरून प्रसारण  होत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली.

            याबाबत सर्व रेडिओ प्रमुख आणि आकाशवाणीच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईलअसे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर पावनीकर ( आकाशवाणी)कपिलकुमार ढोरे ( दूरदर्शन)शीवल देसाई ( रेडिओ सिटी एफ एम)रिमा अमरापूरकर ( रेडिओ मिर्ची)मयुर शिंगटे ( रेडिओ फिवर)संतोष क्षत्रिय ( एच. टी. मीडीया) आदी उपस्थित होते.

००००


 गुणवंत कामगार पुरस्कारांचे 19 एप्रिलला वितरण

            मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे 34 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या 19 एप्रिल 2022 रोजी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

            मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवार, दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा समारंभ होणार असून सन 2019 मधील कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार व गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारर्थींना सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमास कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्यासह कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव , कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती असणार आहे.

            कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत कामगार त्याचप्रमाणे कामगार भूषण पुरस्कारासह गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

             या कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

000

 *The day you stop worrying about what people think about you, is the day you start living your life.*

*Let them do the thinking & you do the living*


 *Good morning!! Have a pleasant day ahead* 😊

 *आप सही हैं तो*

         *आपको गुस्सा होने की जरूरत ही नहीं,*

                    *और*

  *आप गलत है तो आपको*

          *गुस्सा होने का कोई*

               *हक नहीं है!*

     *आज से हम गुस्से का त्याग करें*

        *और मन शांत रखें*                                                               

*_!! स्वदेशी अपनायें-देश बचायें !!_*🇮🇳🇮🇳🇮🇳

*_!! आयुर्वेंद अपनायें-निरोगी स्वस्थ जीवन पायें !!_*

🌹 *सुप्रभात* 🌹

Featured post

Lakshvedhi