*सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे. तर, एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून, कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका.*
*सदैव हसत रहा.*
*🌹🌹सुप्रभात🌹🌹*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त श्रीरंग कलादर्पण च्या प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या Level 3 batch च्या विद्यार्थ्यांनी विशेष अशी *Lenticular (2 in 1) रांगोळी* रेखाटली आहे.
अर्थात एका बाजूने ही रांगोळी पाहिली तर प्रभू श्रीराम दिसतील आणि दुसऱ्या बाजूने पाहिली तर श्री मारुतीराय दिसतील
*आहे ना भन्नाट!!!
(चांगले share करायला परवानगी ची आवश्यकता नाही
🚩🚩🚩🚩🚩) !*.🚩🚩🚩
डिलाईल पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत जल धारण टाकीच्या कामांची
मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी
मुंबई, दि. 10- लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. तसेच हिंदमाता परिसरातील
लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पूल जीर्ण झाल्याने हा पूल रेल्वेने तोडला आहे. त्याचे 85 मीटर लांबीचे बांधकाम रेल्वे करणार असून यासाठीचा निधी महापालिकेने दिला आहे. तर, एकूण 600 मीटर लांबीच्या तीन पोहोच रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री श्री. ठाकरे यांनी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.ठाकरे म्हणाले, रेल्वेकडून हाती घेतलेल्या कामास गती देण्याच्या अनुषंगाने मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिके
श्री.ठाकरे यांनी हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जल धारण टाक्यांच्या कामाची पाहणी केली. हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टीप्रसंगी तेथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जल धारण टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम पूर्णत्वाकडे आहे. या टाक्यांमध्ये दोन कोटी 87 ला
प्रमोद महाजन उद्यानातही अशाच स्वरूपाची भूमिगत जल धारण टाकी बांधली जात आहे. पंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकी यामुळे हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास यापुढे आणखी मदत होणार आहे. मिलन सबवे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून अशाप्रकारची उपाययोजना करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
0000
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर
उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल
उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कारात राहता आणि मालवणचा समावेश
बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कारातही कोल्हापूरच्या ‘श्रृंगारवाडी’चा समावेश
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. 10 : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 (पडताळणी वर्ष 2020-21) करिता सर्व उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली असून पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहता (जि.अहमदनगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायती समावेश झाला आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2022 हा राज्यातून उस्मानाबाद जिल्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी दिली.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात मोदाळे (ता.इगतपुरी, जि.नाशिक), लोहगाव (ता.राहता, जि.अहमदनगर), लोणी बुद्रुक (ता.राहता, जि.अहमदनगर), कोतावडे (ता.कडेगाव, जि.सांगली), वाघोली (ता.मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता.जि.उस्मानाबाद), धारुर (ता.जि.उस्मानाबाद), शिरगाव (ता.कडेगाव, जि.सांगली), दरी (ता.जि.नाशिक), नेरी (ता.मोहाडी, जि.भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता.सालेकसा, जि.गोंदिया), धोरोशी (ता.पाटण, जि.सातारा), झरी (ता.लोहा, जि.नांदेड), आरे (ता.गुहागर, जि.रत्नागिरी), मुठेवडगाव (ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद) या 17 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारअंतर्गत् कोल्हापूर जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, राहता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 17 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात प्राप्त होईल, बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी या ग्रामपंचायती मिळाला असून ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोहगाव या ग्रामपंचायतीस मिळाला आहे. या श्रृंगारवाडी आणि लोहगाव ग्रामपंचायतीस प्रत्येकी 5 लाख रूपये थेट प्राप्त होतील. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या भंडारवाडी या ग्रामपंचायतीची नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस 10 लाख रूपये रक्कम पुरस्कार स्वरुपात