Saturday, 9 April 2022

 









 सामाजिक वनीकरणाबाबत विवेक खांडेकर

यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक वनीकरणचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 11 एप्रिल, मंगळवार 12 एप्रिल, बुधवार 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्यात सुरू असलेले सामाजिक वनीकरणाचे कार्य, त्याचे महत्त्व, लोकसहभाग वाढविण्यासाठी विभाग करीत असलेले प्रयत्न याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर, लोकजागर अशा विविध विषयांची सविस्तर माहिती श्री. खांडेकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

 मुंबई शहरच्यावतीने ऑनलाइन व्हॅलिडीटी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम.

    मुंबई, दि.८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर,कार्यालयाच्या वतीने ११ वी १२ वी (विज्ञान) मध्ये शिकणा-या विद्यार्थ्याच्या Online Validity प्रमाणपत्र देण्यासाठी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

        दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता पदमभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरींग कॉलेज, प्रियदर्शनी, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली "सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यपध्दती" याबाबत जिल्हयातील सर्व ११ वी, १२ वी (विज्ञान) या महाविदयालयाच्या प्राचार्य व इतर कर्मचारी यांचेकरीता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेस इच्छुकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000



 

 ब्राझीलच्या मुंबईतील नवनियुक्तवाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट.

            मुंबई, दि. 8 :- ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉओ डी मेंडोन्सा लिमा नेटो यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्यदूत म्हणून आपल्या पारंपरिक कार्याशिवाय आपण व्यापाराला चालना देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करू, असे लिमा नेटो यांनी राज्यपालांना सांगितले.

            स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील कातकरी महिलांनी वारली चित्रशैलीत रंगविलेल्या कुल्हडचा संच वाणिज्यदूतांना भेट दिला.

000

The newly appointed Consul General of Brazil in 

Mumbai Joao de Mendonca Lima Neto met Governor.

            Mumbai, Date 8 :- The newly appointed Consul General of Brazil in Mumbai Joao de Mendonca Lima Neto met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. The Consul General stated that apart from his traditional role as Consul General, it will be his endeavour to promote business relations with India during his tenure.

            With a view to give a boost for 'Vocal for Local', Governor Koshyari presented to the Consul General a gift-set containing Kulhads with Warli painting made by Katkari tribal women from Palghar.



 रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना

 राज्यपालांच्या हस्ते 'संवेदना' पुरस्कार प्रदान.

भारताला रक्त साठ्यात आत्मनिर्भर करण्याचे

 राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 8 :- करोना महामारीच्या काळात भीतीमुळे लोकांनी रक्तदान कमी केले. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र रक्ताची आवश्यकता अधिक आहे. यास्तव रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करून भारताला रक्त साठ्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            गेल्या दोन वर्षांत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 35 संस्थांना तसेच आरोग्यदूतांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे अलीकडेच 'संवेदना आंतरराष्ट्रीय जीवन रक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            संवेदना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिविस्ट्स (निफा) या संस्थेने महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबर या संस्थेच्या सहकार्याने केले होते.

            कार्यक्रमाला निफाचे संस्थापक प्रितपाल पनू , महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबरचे अध्यक्ष अमेय पाटील, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विनायक टेम्भूर्णीकर, डॉ.भारती मोटवानी, राज्य शासनाचे सहसचिव सतीश जोंधळे व पुरस्कार विजेत्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            देशातील रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की, रक्तदान क्षेत्रातील संस्थांनी मनःपूर्वक प्रयत्न केले, तर लोक रक्तदान करण्यास निश्चितपणे पुढे येतील. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) या संस्थेने तसेच संस्थेशी निगडीत आयुर्वेद डॉक्टरांनी रक्तदानाच्या बाबतीत राज्यात उत्कृष्ट काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

80 कोटी युवक; रक्तदाते 4 कोटी

            भारताच्या 80 कोटी युवा लोकसंख्येपैकी केवळ 4 कोटी युवक स्वेच्छेने रक्तदान करतात. देशातील रक्तदानाची गरज 12 कोटी युनिट इतकी आहे त्यामुळे रक्तदानात देश स्वयंपूर्ण व्हावा व कुणीही रक्ताअभावी प्राण गमावणार नाही हे पाहणे गरजेचे असल्याचे 'निफा' या संस्थेचे संस्थापक प्रितपाल पनू यांनी सांगितले.

            संवेदना मोहिमेअंतर्गत दि. २३ मार्च २०२१ रोजी शहीद दिनानिमित्त १४७६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये १ लाखाहून अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती पनू यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात ९७ शिबिरे झाली व ४१५० पिशव्या रक्त संकलन झाल्याचे अमेय पाटील यांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते ‘कृष्ण महिमा’ या गीता पठण व अर्थ निरूपण स्पर्धेतील विजेत्या इरावती वालावलकर, ओमिशा सिंह व आदित्य सुब्रमण्यम या लहान मुलांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी वंदेभारतम् स्पर्धेच्या विजेत्या चमूने गोंधळ नृत्याचे सादरीकरण केले.   

0000

Maharashtra Governor presents ‘Life Saver Awards’ to

35 Blood Donation organisations.

        Mumbai, Date 8 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Samvedana International Life Saver Awards’ to 35 organisations for their work of organizing blood donation camps at a function held at Raj Bhavan Mumbai on Thursday.

            The Awards function was organized by the National Integrated Forum of Artists and Activists (NIFAA) in association with Maharashtra Entrepreneur Chamber (MEC) with the support of National Integrated Medical Association (NIMA).

            Speaking on the occasion, Governor Koshyari called upon blood donation organizations to make the nation Aatmanirbhar in terms of blood. He applauded the work of the NIFAA, Maharashtra Entrepreneur Chamber and NIMA for their sustained efforts in organizing blood donation camps.

            The Governor also presented the awards for Bhagwad Gita recitation competition ‘Krishna Mahima’ on the occasion. School students Irawati Walavalkar, Omisha Singh and Aditya Subramaniam were given the top awards.

            President of NIFAA Pritpal Singh Panu, President of Maharashtra Entrepreneur Chamber Amey Patil, NIMA president Dr Vinayak Tembhurnikar and Joint Secretary of Maharashtra Satish Jondhale were prominent among those present.

0000



Friday, 8 April 2022

 पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे 12 एप्रिल रोजी आयोजन.

            मुंबई, दि. 08 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

            ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, हे उपस्थिती राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना या सारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.

            या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

००००


 



 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला   संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी शासनास प्रस्ताव

- विजय वडेट्टीवार.

          मुंबई, दि. 08 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी याबाबत सांगितले की, राज्यातील इतर मागासप्रवर्गातील दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना अल्प व्याज दराने कर्ज देवून त्यांच्या सर्वांगिण विकासात महामंडळाचे बहुमुल्य योगदान आहे त्यामुळे या महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

       अंधश्रध्देच्या विळख्यातून मुक्त करून, समाजाला स्वच्छतेचा व शिक्षणाचा कानमंत्र देण्याचे महनीय कार्य संत गाडगेबाबा यांनी केले आहे. त्यांचे स्मरण रहावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महामंडळाचा नामविस्तार संत गाडगेबाबा यांचे नावे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.त्यास महामंडळाच्या १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.

0000



Featured post

Lakshvedhi