सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 6 April 2022
महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांच्या
जमीन वाटपाच्या प्रक्रियेला होणार सुरुवात
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.
मुंबई, दि. 5 :- कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (दि. १६ मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (व्हिसीद्वारे), वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे, श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष संपत देसाई आदी मान्यवरांसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. कोयना धरणासाठी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम बहुतांशपणे पूर्ण झाले आहे. या पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यातील जमीन वाटपाची प्रक्रिया दि. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रमाणिक संचालन पद्धती (एसओपी) तयार करुन उपलब्ध जमिनीची यादी आणि प्रक्रियेसाठी भरावयाचा अर्ज प्रसिद्ध करण्यात यावा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे जमिनीचे वाटप करण्यात यावे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘आयटीआय’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरण’मध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
००००००
*क्षमा*
_खूप छान आणि..... Absolutely True story ....._
पुण्याच्या आसपासचं गाव....कुटुंब ठिकठाक ...एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..... साहजीकच सुनेवर सर्व भार .... आधी किरकोळ कुरबुर.... मग बाचाबाची.... त्यानंतर कडाक्याची भांडणं.... सुनेचं म्हणणं.... घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..... काम करुन हातभार लावा संसाराला ..... पण बाबा थकलेले..... शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं..... मुलानेही अडवलं नाही.....
आले पुण्यात....कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भुक जगु देईना.... भिक मागण्यावाचुन पर्याय उरला नाही....
बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?
"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो.....
पण ....या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.....!
आता बाबा अट्टल भिकारी झाले.....
झाले कि त्यांना केलं गेलं..... ?
अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली....
बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो.... वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं.... वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते.... कुणाचाच आधार नसतो म्हणुन.... तसंच हे म्हातारपण ..... झुकलेलं आणि वाकलेलं.... निष्प्राण वेलीसारखं.... !
बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही...!
नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं....नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच.... तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले....
असं बोलुन ते हसायला लागतात....
त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच पिळ पाडुन जातं.....
मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही... पण हे हसु खोटं आहे तुमचं... तर म्हणायचे... आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं.... हसण्याचं नाटकच केलं ... आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु....???
मी निरुत्तर.... !
वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय... कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं.... टोपलीत ठेवतं.... वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली.... नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय... सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा....?
बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो....
काहीतरी काम करा बाबा, असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती.... बाबा कामाला तयार नव्हते !
म्हणायचे, आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं...किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील.... श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील...
नाटक असतं हो सगळं आयुष्यच .... प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.... !
इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच.... बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली.... शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता... भिक मागत नाहीत.
मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.... !
आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले.... मला जरा बाजुला घेवुन गेले.... म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर .....
सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो.... तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते.... पाया पडुन माफी मागायला तयार आहे... बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."
मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला भिक मागायला लावली.... आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली....?
डाॕक्टर काय करु सल्ला द्या...
साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु..... !
बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना.... चालेल तुम्हाला?
मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का?अहो चुकतात तीच पोरं असतात..... माफ करतो तोच *"बाप"* असतो.....
अहो, लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो..... त्यातुन तो किती शिकला माहिती नाही.... बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर...असो !
पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी *"क्षमा"* म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ....
आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला *"क्षमा"* करणार नाही.....
काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर ...
असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत....
*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*9822267357*
*abhisoham17@gmail.com*
: Its real & not just an article. 🌹🙏🏻
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...