Wednesday, 6 April 2022

 *क्षमा*

_खूप छान आणि..... Absolutely True story ....._

पुण्याच्या आसपासचं गाव....कुटुंब ठिकठाक ...एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..... साहजीकच सुनेवर सर्व भार .... आधी किरकोळ कुरबुर.... मग बाचाबाची.... त्यानंतर कडाक्याची भांडणं.... सुनेचं म्हणणं.... घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..... काम करुन हातभार लावा संसाराला ..... पण बाबा थकलेले..... शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं..... मुलानेही अडवलं नाही.....

आले पुण्यात....कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भुक जगु देईना.... भिक मागण्यावाचुन पर्याय उरला नाही.... 

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो..... 

पण ....या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.....! 

आता बाबा अट्टल भिकारी झाले..... 

झाले कि त्यांना केलं गेलं..... ? 

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली....

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो.... वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं.... वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते.... कुणाचाच आधार नसतो म्हणुन.... तसंच हे म्हातारपण ..... झुकलेलं आणि वाकलेलं.... निष्प्राण वेलीसारखं.... !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही...!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं....नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच.... तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले.... 

असं बोलुन ते हसायला लागतात.... 

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच पिळ पाडुन जातं.....

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही... पण हे हसु खोटं आहे तुमचं... तर म्हणायचे... आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं.... हसण्याचं नाटकच केलं ... आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु....???

मी निरुत्तर.... ! 

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय... कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं.... टोपलीत ठेवतं.... वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली.... नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय... सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा....? 

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो.... 

काहीतरी काम करा बाबा, असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती.... बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे, आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं...किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील.... श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील... 

नाटक असतं हो सगळं आयुष्यच .... प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.... ! 

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच.... बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली.... शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता... भिक मागत नाहीत. 

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.... ! 

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले.... मला जरा बाजुला घेवुन गेले.... म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर ..... 

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो.... तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते.... पाया पडुन माफी मागायला तयार आहे... बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला भिक मागायला लावली.... आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली....? 

डाॕक्टर काय करु सल्ला द्या...

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु..... ! 

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना.... चालेल तुम्हाला? 

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का?अहो चुकतात तीच पोरं असतात..... माफ करतो तोच *"बाप"* असतो.....

अहो, लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो..... त्यातुन तो किती शिकला माहिती नाही.... बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर...असो ! 

पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी *"क्षमा"* म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ....

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला *"क्षमा"* करणार नाही..... 

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर ... 

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत....

*डाॕ. अभिजीत सोनवणे*

*डाॕक्टर फाॕर बेगर्स*

*9822267357* 

*abhisoham17@gmail.com*

: Its real & not just an article. 🌹🙏🏻

 




Tuesday, 5 April 2022

 *प्रारब्ध व संगत* 

*एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..*


*दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.

किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,

"भाऊ, काय चालू आहे मनात?.."

किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.

🌹 *सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्गनियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू* *द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही*.

मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यानसाधना.' प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...

🌷 *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त*🌷

 *येथुन पुढे धर्मादाय अंतर्गतील सर्व रुग्नालयांना  धर्मादाय हा शब्द नावात वापरणे बंधनकारक*


कार्यसम्राट आरोग्यदुत आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त आरोग्य निधी मिळवणारे एकमेव आमदार अॅड. राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नाला  यश.


पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार.

पुणे शहरातील *रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल* ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते.मुळात ही सर्व मोठमोठी

धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा  या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.

याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, वेळोवेळी पाठपुरावा करुन शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या  प्रयत्नाला यश आले आहे. याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे.

उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयांसह  अशा 56 रुग्णालयांचा धर्मादायमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. म्हणूनच याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे हॉस्पिटल असोसिएशनला डिगे यांनी आदेश दिले आहेत. या 56 पैकी नऱ्हे येथील नवले_रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.


*राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू*

धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल. GB

 सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये ऑनलाईन नोंदणी करणे साठी स्टेप्स खालील प्रमाणे आहेत. या नोंदणी नंतर कोषागार कार्यालय मधील आपल्या विषयी माहीती आपण घरबसल्या बघू शकतो. ऑनलाईन कार्यवाहीसाठी याचा उपयोग होतो.

1 google मधुन sevarth उघडा

2 ID: PENSIONER

3 Pass: ifms123 टाका लॉगिन झाल्यावर

Worklist click करा

त्यामध्ये create pensioner user ला क्लीक करा

तुमचे कोषागार निवडा,

ppo क्रमांक टाका,

बँकेचे नांव ब्रँच, खाते क्रमांक टाका

शेवटी create user ला क्लीक करा आपले खाते तयार होईल.

खाते तयार झाल्यावर तुम्हाला user ID मिळेल तो लिहून घ्या user ID: PEN_तुमचा ppo क्रमांक असा असतो.

User ID मिळाल्या नंतर पुन्हा

Sevarth प्रणाली उघडा

आता मात्र User ID मिळालेला टाका प्रथम पासवर्ड

ifms123 टाका

सिस्टीम तुम्हाला सांगेल की तुमचा पासवर्ड रीसेट करा.

तुमचा पासवर्ड ठरवा save करा बदलून घेतलेला पासवर्ड लिहून घ्यावा.

आता आपल्या पासवर्ड ने आपले खाते बघा. पासवर्ड सुरक्षित ठेवा.

पासवर्ड विसरल्यास ATO pension कोषागार यांना संपर्क करून पासवर्ड रीसेट करू शकतो.💐💐💐👍

काही अडचण आल्यास मला संपर्क करा👏👏

ईतर सेवानिवृत्त कर्मचारी यांना सुध्दा हा मेसेज पाठवा. कोषागार कार्यालय आपल्या घरी जोडा👍

अशोक चौधरी

लेखाधिकारी(नि)

9923795915

 






 

Featured post

Lakshvedhi