Monday, 4 April 2022

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त

विधान भवनात आदरांजली वाहिली.

            मुंबई, दि 03 : छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

            याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी. श्री. संजय पवार यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी ही श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली TV TV वाहिली.


            मुंबई , दि. 3 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक 5 व 6 एप्रिल, 2022 रोजी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन संसद भवन, लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

            या दोन दिवसीय संसदीय अभ्यासवर्गात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्यासह ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ सन्माननीय सदस्यांना प्राप्त होईल.

            दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वा. संसद ग्रंथालय इमारतीतील (पीएलबी) मुख्य सभागृहात या अभ्यासवर्गाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्या मार्गदर्शनाने होईल. याप्रसंगी सन्माननीय सदस्यांसह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु. आदिती तटकरे तसेच लोकसभा सचिवालयाचे महासचिव उत्पल कुमार सिंग, अतिरिक्त सचिव प्रसेनजित सिंग, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री. निलेश मदाने उपस्थित राहणार आहेत.


            कायदेमंडळातील विधिविषयक आणि वित्तीय कामकाज, सभागृहाचे विशेषाधिकार, प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्त्व आणि सदस्यांचा सहभाग, समिती पध्दती - संसदीय कार्यप्रणालीचा आत्मा, सुशासन आणि विधानमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान इत्यादी विषयांवर ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री विधिमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाच्या अवलोकनाची संधी, संसदेतील मध्यवर्ती ग्रंथालय येथे अभ्यासभेट देखील प्रस्तावत आहे. In TV TV

0000




 

Sunday, 3 April 2022

अफलातून मराठी

 *आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?*

🔹▪️🔹▪️🔹▪️🔹▪️

*लुसलुशीत*-  

*खुसखुशीत*-

*भुसभुशीत*- 

*घसघशीत*

*रसरशीत*- 

*ठसठशीत*- 

*कुरकुरीत*- 

*चुरचुरीत*- 

*झणझणीत*- 

*सणसणीत*-

*ढणढणीत*-

*ठणठणीत*- 

*दणदणीत*-

*चुणचुणीत*- 

*टुणटुणीत*- 

*चमचमीत*- 

*दमदमीत*- 

*खमखमीत*- 

*झगझगीत*- 

*झगमगीत*- 

*खणखणीत*-

*रखरखीत*-

*चटमटीत/ चटपटीत*- 

*खुटखुटीत*- 

*चरचरीत*- 

*गरगरीत*- 

*चकचकीत*- 

*गुटगुटीत*- 

*सुटसुटीत*- 

*तुकतुकीत*- 

*बटबटीत*- 

*पचपचीत*- 

*खरखरीत*- 

*खरमरीत*-

*तरतरीत*- 

*सरसरीत/सरबरीत*- 

*करकरीत*

*झिरझिरीत*- 

*फडफडीत*- 

*शिडशिडीत*

*मिळमिळीत*- 

*गिळगिळीत*- 

*बुळबुळीत*-

*झुळझुळीत*- 

*कुळकुळीत*- 

*तुळतुळीत*- 

*जळजळीत*- 

*टळटळीत*- 

*ढळढळीत*-

*डळमळीत*- 

*गुळगुळीत*- 

*गुळमुळीत*- 


ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा....                          

~~~~~~~~~~~~~

 थोडी गम्मत

*'मॅक्सिन बर्नसन'* ह्या एक

 अमेरिकन भाषातज्ज्ञ....!

मराठीबद्दल त्यांनी लिहिले आहे की,


*ही मराठी भाषा खूप*

*छान आहे, पण जीव*

*घाबरा करणारी आहे.*

*मराठी भाषेत बाळबोध*

*लिपीपासूनच हिंसेचे*

*बाळकडू पाजले जाते..!!*

*उदा...*


*अक्षरांचे पोट फोडणे,*

*पाय मोडणे;*


*इतिहासात तर 'ध' चा 'मा'*

*सुद्धा केला जातो..!!*


 *यांच्या सामाजिक*

*व्यवहारातही उघड उघड*

*हिंसाचार दिसतो :*


*नाक दाबले, तर*

*तोंड उघडणे..*


*अमक्याचे खापर,*

*तमक्याच्या माथी फोडणे,*


*धारेवर धरणे,*

*पाठीत खंजीर खुपसणे,*


*बिन पाण्याने*

*हजामत करणे,*

*रक्त आटवणे,*

*पाय ओढणे,*

*पोटावर पाय देणे,*

*कान उपटणे,* 

*डोक्यावर मिरे वाटणे…*

*इत्यादी, इत्यादी...*


*ही मराठी माणसे*

*स्वत:बद्दलही हिंसक*

*असतात... म्हणजे...*


*झोपेतून उठल्यावर*

*अंग मोडतात,*

*बोटे मोडतात,*

*घसाफोड करतात,*

*तोंड फाटेस्तोवर बोलतात,*

*घर डोक्यावर घेतात,*

*डोक्यात राख घालतात.*


*आणि कांहीही खातात__*

*मार खातात,*

*बोलणी खातात,*

*डोके खातात,*

*वेळ खातात,*

*लिहितांना काना-मात्रा*

*वेलांट्या खाऊन टाकतात*

*आणि कांही जण, तर*

*पैसेही खातात...!*


*यांच्या शरीरशास्त्राच्या*

*कल्पना तर कांय विचित्र*

*आहेत पाहा :*


*यांचे हातपाय गळतात,*

*काळजाचे पाणी होते,*

*तोंडचे पाणी पळते*


*आता सांगा, परकियांना*

*ही भाषा येणार कशी..?*


*पण माझ्यावर या भाषेने*

*कृपा केली आणि मला ती*

*चांगली यायला लागली...!!*


*आता "माझा जीव*

*भांड्यात पडला"...!!!*

   

😃😃😃🌹😃😄😄





 





 

भैसे बडी


 

Featured post

Lakshvedhi