सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 2 April 2022
हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ब्रम्हांडाच्या निर्मिती चा दिवस! विश्वाची निर्मिती झाली आणि कालमापन चक्र सुरु झाले. आपली
निसर्गाशी समन्वय ठेवणारी हिंदू जीवनपध्दती. कालमापन सुध्दा ग्रहतार्यांच्या गतीशी समन्वय ठेवणारे!
:प्रुथ्विचे स्वभ्रमण--दिवस-रात्र
:चंद्राचे प्रुथ्विभ्रमण--१महिना
:प्रुथ्विचे सूर्यभ्रमण--१ वर्ष
:सूर्याचे आकाश गंगा भ्रमण--१ मन्वंतर =३० कोटी ६७लक्ष मानवी वर्षे
:आकाशगंगेची ब्रम्हांड प्रदक्षिणा=कल्प=४अब्ज ३२ कोटी वर्षे=ब्रम्हाचा एक दिवस..
:ब्रम्हाचा एक दिवसरात्र=८अब्ज६४ कोटी वर्षे.
:ब्रम्हाचे आयुष्य १००वर्षे=३११०४ वरदहा शुन्य----येवढी मानवी वर्षे.
:ब्रम्हाच्या आयुष्यातील पहीली पन्नास वर्षे (प्रथम परार्ध)संपली आहेत.
:द्वितीय परार्धातील पहिला दिवस(कल्प)सुरू आहे. कल्पाचे नाव श्वेत वराह कल्प.
:ब्रम्हाच्या एका कल्पात(दिवसात)१४मन्वंतरे होतात.
सद्ध्या ७वे मन्वंतर(वै्वस्वत)सुरु आहे.
:एका मन्वंतरात ७१ चतुर्युगे येतात.
सद्धया २८ वे चतुर्युग सुरु आहे.(युगे अठ्ठावीस विटेवरी उभा---)
:चतुर्युग = ४ युगे= सत्य ,त्रेता, द्वापर आणि कलियुग= १७२८००० वर्षे.
: १ युग=४३२००० वर्षे.
:सद्धया कलीयुग सुरु असून ५१२३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
:अशा ब्रम्हांडाचे कालमापन प्रुथ्विवरील एखाद्या माणसाच्या जन्ममरणाशी जोडून करणे म्हणजे किती मूर्खपणा! आपल्या पूर्वजांच्या अगाध द्न्यानाची गरुडभरारी किती प्रचंड होती याची आपण कल्पनाही करु शकत नाही.
🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सर्वांना
गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
‘कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा.
राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो.
मुंबई, दि. 1 :- “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे...” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषीक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचे संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री यांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया... निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया..., असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
००००
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील
पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 2 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील कर्नल दुश्यंत हणमंत सोनवणे यांना सेवेसाठी सेना पदक बहाल करण्यात आले असून याकरिता 1 लाख 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील शिपाई दिपक तुकाराम सकपाळ यांना शौर्यासाठी सेनापदक बहाल करण्यात आले असून याकरिता 12 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकिय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासननिर्णय साप्रवि चे दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित केला आहे.
००००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...