Thursday, 31 March 2022

 *माहे- मार्च पेड़ इन एप्रिल 2022 च्या वेतन बिलात करावयाचे 4 मुख्य बदल..*


आज 30 मार्च 2022 च्या वित्त विभागाच्या शासन निर्णया नुसार माहे मार्च 2022 च्या वेतन बिलात खालील बदल करणे / फरक समाविष्ट करणे आवश्यक आहे..


१. *माहे-मार्च 2022 च्या वेतनात 31% DA नुसार वेतन निश्चिती करणे..*

 DA 31% करण्यात आला आहे, त्यानुसार नियमित मार्च चे वेतन 31% DA नुसार कैलक्यूलेट करावे...


२. *3 महिन्याचा 11% DA फरक add करणे...*

1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता(DA) 17% वरून 28% लागू करण्यात आला होता पण जुलै2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत चा फरक आदेश तेव्हा नव्हता तो आता निघाला आहे.. त्यामुळे *1जुलै 2021 ते 30सप्टेंबर 2021 अखेर 3महिन्याचा (17% वरुन 28% या प्रमाणे) 11% DA फरक आता देण्यात येईल त्यामुळे तो 11% फरक आता add करावा...*


३. *8 महिन्याचा 3% DA फरक add करणे..*


माहे- 1जुलै 2021 पासून पुन्हा 28% वरून 31% असा DA वाढवण्यात आला आहे.. त्यामुळे *1 जुलै 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर चा 3% DA फरक* (28% वरुन 31% ) ही पुन्हा या पगारात add करावा..


४. *जुलै2021 ते सप्टें 2021 पर्यंत चा 3 महिन्याचा HRA फरक add करणे..*

शहराच्या कैटेगिरी नुसार मेट्रो मध्यम, सर्वसामान्य शहर/ग्रामीण करीता अनुक्रमे

*1% , 2% व 3% HRA हा माहे- जुलै2021 ते सप्टें 2021 अखेर गणना करून तो फरक या मार्च महिन्याच्या वेतनात add करावा..*

कारण 1जुलाई 2021 पासून महागाई भत्ता( DA) 28% झाला आहे म्हणजेच तो 25% लिमिट च्या वर गेल्याने वेतन आयोगाच्या नियमानुसार माहे जुलै2021 पासून घरभाड़े भत्त्यात(HRA) 1% , 2% , 3% अशी नैसर्गिक वाढ अपेक्षित आहे... आणि ऑक्टोबर2021 पासून आपण ती प्रत्यक्ष घेतली आहे, तथापि आता जुलै2021 ते सप्टें 2021 पर्यंत ती वाढ घ्यायची आहे...

(तथापि जर नोव्हे2021 पासून HRA बदल केलेला असेल तर आपला HRA फरक हा जुलै2021 ते ऑक्टोबर2021 पर्यंत असेल...)

धन्यवाद..!


माहितीस्तव...

 





 

 प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज,

महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजस्थान दिवस संपन्न.

            मुंबई, दि. 31 : राजस्थानने देशाला भामाशांसारख्या दानशूर व्यक्ती दिल्या तसेच महाराणा प्रतापांप्रमाणे आदर्श योद्धे दिले असल्याचे नमूद करून प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारख्या पराक्रमी शूरवीर योद्ध्यांची आवश्यकता असून त्यांच्याप्रमाणे योद्धे पुनश्च निर्माण व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            राजस्थान दिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 30 मार्च रोजी ) 'एक शाम महाराणा प्रताप के नाम' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गरवारे क्लब, मुंबई येथे करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन कुंदन सोशल फाउंडेशन व शेरी-दिया फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते.

            ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी यावेळी पर्यावरणाच्या गंभीर समस्येचा उल्लेख करताना प्रत्येकाला झाडे लावण्याचा संदेश दिला.

            कार्यक्रमाला हास्य कलाकार सुनील पॉल, माजी आमदार राजपुरोहित, कुंदन सोशल फाउंडेशनचे संस्थापक कुंदनमल जैन, अध्यक्ष अनिल जैन, शेरी-दिया फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश कोठारी, राजस्थानी गायक प्रकाश माला उपस्थित होते.      

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी जॅकी श्रॉफ, रिद्धी सिद्धी बुलियनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी व बाबुलाल संघवी यांचा सत्कार करण्यात आला.

0000

Maharashtra Governor participates in

Rajasthan Diwas Celebrations in Mumbai

            Mumbai, Date 31 :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari participated in the Rajasthan Diwas celebration in Mumbai on Wed (30 Mar). The Rajasthan Diwas Celebration and the cultural programme 'Ek Sham Maharana Pratap Ke Naam' was organised by the Kundal Social Foundation and the Sherri & Diya Foundation.

            Film star Jackie Shroff, stand-up comedian Sunil Paul, former MLA Raj Purohit, founder of Kundan Social Foundation Kundanmal Jain, President Anil Jain, Chairman of Sherri & Diya Foundation Rakesh Kothari, Rajasthani singer Prakash Mala were present on the occasion. 

            The Governor felicitated film star Jackie Shroff, Chairman of Riddhi Siddhi Bullion Pruthviraj Kothari and Babulal Sanghvi on the occasion.

0000

 राज्यातील मर्चंट नेव्ही सप्ताहाचे राज्यपालांच्या उपस्थितीत उद्घाटन.

मर्चंट नेव्हीतील रोजगाराच्या संधींबाबत युवकांना अधिक माहिती व्हावी'.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 31 : व्यापारी नौवहन (मर्चंट नेव्ही) क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षणाच्या संधींबाबत युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांना या क्षेत्राबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने शाळा - महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली. 

            राष्ट्रीय नौवहन दिवस समितीतर्फे आयोजित राज्यभर साजरा केल्या जाणाऱ्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन गुरुवारी (दि. ३१) राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

            भारताला व्यापारी नौवहनाचा मोठा इतिहास लाभला असून सत्य नारायण कथेपासून अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भारताच्या सागरी व्यापाराचा उल्लेख आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी वाहतुकीचे योगदान फार मोठे असून या क्षेत्राच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान व्हावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

            व्यापारी नौवहन क्षेत्र अधिक लोकाभिमुख व युवकाभिमुख व्हावे. या क्षेत्रातील कामगार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे असे राज्यपालांनी सांगितले.

            महात्मा गांधींनी अनेकदा जहाजाने परदेशी प्रवास केला होता. या सर्व प्रवासांच्या तारखा तसेच त्यांनी प्रवास केलेल्या जहाजांचे नाव ही दुर्मिळ माहिती प्रथमच सचित्र प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी शिपिंग कॉर्पोरेशनचे अभिनंदन केले.    

महिलांना शिपिंग क्षेत्रात मोठ्या संधी

            महिलांनी अधिकाधिक प्रमाणात शिपिंग क्षेत्रात यावे यादृष्टीने प्रयत्न केले जात असून मेरीटाईम शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांना प्रतिवर्षी १ लाख रु. शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांनी यावेळी दिली. शिपिंग क्षेत्रात व्यापार सुलभीकरणासाठी (इज ऑफ डुईंग बिझनेस) विशेष प्रयत्न केले जात असून वर्ष अखेर पर्यंत शिपिंग संबंधी सर्व सेवा ऑनलाईन देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील जागतिक हवामान बदल परिषदेत केलेल्या आवाहनानुसार भारतीय नौवहन क्षेत्र नेट शून्य ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचे लक्ष प्राप्त करण्याकरिता प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

            भारतीय सागरी व्यापार उद्योगावर पारतंत्र्यात अनेक निर्बंध लादल्यामुळे तसेच भारतीय मालवाहू जहाजांना अनेक देशात सामानाची ने-आण करण्यावर निर्बंध असल्यामुळे या क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. दि. ५ एप्रिल १९१९ रोजी सिंदिया शिपिंगच्या जहाजाने मुंबई ते लंडन हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नौवहन दिवस म्हणून साजरा केला जातो, असेही अमिताभ कुमार यांनी सांगितले.

            यावेळी शिपिंगचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, मुख्य सर्व्हेयर कॅप्टन एस बारिक, नॉटिकल सल्लागार के पी जयकुमार, उपमहासंचालक डॉ पांडुरंग राऊत, राष्ट्रीय नौवहन दिवस समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, भारतीय राष्ट्रीय जहाज मालक संघटनेच्या अध्यक्ष डॉ सुजाता नाईक, नाविक संघटनेचे महासचिव अब्दुल गनी सेरंग, कॅप्टन महेंद्र पाल भसीन, कॅप्टन संकल्प शुक्ल, एस एम राय आदी यावेळी उपस्थित होते.   



 सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू.

        मुंबई, दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे.


            सदरहू महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.

000



 

Featured post

Lakshvedhi