Thursday, 31 March 2022

 *"ताक"*

*शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.*

*ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.*

*ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .*

*१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.*

*२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.*

*३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.*

*४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.*

*५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.*

*६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.*

*७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.*

*८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.*

*9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.*

१०)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 

*ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.*

*तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.*

*चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..*

*हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी शेअर करायला विसरू नका.*


 🌹

 कांदळवनाचे संवर्धन’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

            मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन कक्षाचे प्रमुख वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

            ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार, दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन असून जैवविविधतेच्या दृष्टीने ही कांदळवने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. किनाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठीही कांदळवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व, कांदळवनाचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन कशाप्रकारे केले जात आहे तसेच कांदळवन कक्षाच्या कामगिरीविषयीची सविस्तर माहिती श्री.तिवारी यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

0000



 



 सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू.

        मुंबई, दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे.

            सदरहू महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.

000



 

 तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर.

            मुंबई, दि. 30 : ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ दरम्यान तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त तृतीयपंथी लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांचा शोध घेऊन त्या कार्यक्षेत्रात शिबीर आयोजित करण्यात आले.

            तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमासाठी १७९ सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातर्फे सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास मुंबई, कौशल्य विभाग यांच्या सहकार्याने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई येथे दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीच्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास तृतीयपंथी मतदारांनी विशेष प्रतिसाद दिला आहे. यात सामाजिक न्याय विभागातर्फे तृतीयपंथी मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

            मुंबई शहर जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून नवीन नाव नोंदणीचे अर्ज व नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात आले. १८१ माहिम विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त घरोघरी जाऊन निवडणूक मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले व नवीन नाव नोंदणीचे अर्ज स्विकारण्यात आले.

            या विशेष शिबिराच्या अनुषंगाने जास्तीत जास्त तृतीयपंथी नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले आहे.

००००


 



 

 मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागास

बाल न्याय निधी उपलब्ध

 

            मुंबईदि. 30 : सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास  विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुंबई शहर जिल्ह्याकरिता बाल न्याय निधी आयुक्तमहिला व बाल विकास पुणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हाकृती दलमुंबई शहर यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे. या रकमेचा विनियोग कोविड 19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी (शालेय शुल्कवसतीगृह शुल्कशैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी) प्रति बालक कमाल मर्यादा रु.10000/ (अक्षरी रु. दहा हजार) इतकी वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी वितरीत करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरबी.डी.डी. चाळ क्र.117पहिला मजलावरळी- 400018 यांचे कडून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रे मुळ अर्जासह प्रस्ताव जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर कार्यालयास सादर करावा. प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर ते जिल्हा कृती दल यांना सादर करण्यात येईल. आर्थिक सहाय्य मंजुरीबाबतचा जिल्हा कृतीदल यांचा निर्णय अंतिम असेल त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात येईलयाची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरदूरध्वनी क्रमांक २४९२२४८४ यांच्याकडे संपर्क साधावा.

            अर्जासोबत अर्थसहाय्य मिळण्याकरिता पुढील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्जबालकांचे शाळेचे बोनाफाईडआई वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुराव्याची झेरॉक्सआई वडील मृत्यु दाखलाबालक अथवा बालक पालकसंयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँकेचे पास बुकरद्द केलेल्या धनादेशाची मुळ प्रतबालकाचे आधारकार्ड इ. कागदपत्रे स्वयं साक्षांकीत करुन अर्जासोबत जोडावीअसे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई शहर श्रीमती शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

-------



 डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात

कडक कारवाई करण्याचे आदेश

- राजेंद्र पाटील यड्रावकर.

            मुंबई, दि. 30 : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

            राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी Nitrosun (Nitrazepam Tablet) या झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने औषध विक्री दुकानांची तपासणी मोहिम राबवून ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे. तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिल्या आहेत.

            अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 हा कायदा राबविला जातो. सदर कायद्यामधील तरतुदीनुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊ शकतात. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात. औरंगाबाद विभागात एप्रिल, 2021 पासून मार्च 2022 पर्यंत एकूण सात प्रकरणात विना परवाना झोपेच्या गोळ्या/औषधे बाळगणे व विक्री करणे याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी यावेळी दिली.

-------

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न

2022-23 साठी प्राधिकरणाच्या 2 हजार 419 कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता.

            पुणे, दि. 30 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सभेच्या बैठकीत प्राधिकरणाच्या 2022-23 साठीच्या 2 हजार 419 कोटी रुपये महसूली व भांडवली खर्चाच्या संभाव्य अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

            उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातून तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे मंत्रालयातून तर पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी दूरदृश्य 6प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

            प्राधिकरणाने 2023-24 साठी 1 हजार 334 कोटी रुपये आरंभीची शिल्लक आणि बांधकाम परवानगी, टीओडी, टीडीआर, सुविधांसाठी तसेच इतर जागा भाडेकराराने देणे, भूखंड अधिमूल्य, मुद्रांक शुल्क, व्याजाची रक्कम वित्तीय संस्थांमार्फत अथवा कर्ज, रोखे याद्वारे निधी उभारणी आदी स्वरुपात 1 हजार 859 कोटी अशा एकूण 3 हजार 193 कोटी रुपयांच्या जमा रकमेचा अंदाजपत्रकात समावेश केला असून भांडवली खर्च आणि महसूली खर्चासाठी 2 हजार 419 रुपये एकूण अंदाजपत्रक मांडले आहे. या अंदाजपत्रकात पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेले गृहनिर्माण प्रकल्प, रिंग रोड, विविध नगररचना योजना आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

            जागतिक बँक समूहाची सदस्य असलेली इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत (आयएफसी) सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. हा बंधनविरहित स्वरूपाचा करार झाल्यानंतर आयएफसी ही संस्था पीएमआरडीएला सल्लागार सेवा, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अभ्यास, क्षमता विकास कार्यक्रम तसेच प्रकल्पनिहाय वित्तीय पुरवठा करणार आहे.

            युरोपिअन संघाच्या अंतर्गत शहरी आणि प्रादेशिक सहकार्य कार्यक्रम (इंटरनॅशनल अर्बन ॲण्ड रिजनल कोऑपरेशन) या संस्थेसोबत आणि जर्मनी येथील कार्लस्रुहे सिटी कौन्सिल या संस्थेसोबत पुणे महानगर प्रदेशात एक सुनियोजित इंटीग्रटेड टाऊनशीप उभारण्यासाठी करार करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रस्तावित शहरात औद्योगिक रहिवास आणि वाणिज्य अशा एकात्मिक सुविधा असतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

            पुणे मेट्रोलाईन-३ (हिंजवडी-शिवाजीनगर) या मार्गिकेच्या नावात अंशतः बदल करून पुणे मेट्रोलाईन-३ (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) असे करण्यास मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीएमआर ओपन टेनिस स्पर्धेसाठी १ कोटी रुपये क्रीडा संचालनालयाला देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

            मेट्रो लाईन- ३ मार्गिकेतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पाडण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.

            मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे नगर रचना योजना क्र. 1 अंतर्गत रस्ते, पूल, मोऱ्या, पावसाळी गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा उपकेंद्र म्हाळुंगे हाय टेक सिटी विकसित करण्यास सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) अथवा ईपीसी तत्वावर टप्पेनिहाय विकास करण्यास मान्यता देण्यात आली.

            मेट्रो लाईन-3 प्रकल्पासाठी व विद्यापीठ चौकातील नवीन एकात्मिक उड्डाणपुलासाठी ग्रामीण पोलीस विभागाच्या औंध येथील 1 हजार 893 चौरस जागेचे हस्तांतरण करुन त्याऐवजी एकूण 1 हजार 960 चौरस मीटर क्षेत्राचे दोन सुविधा भूखंड ग्रामीण पोलीस विभागास हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली. या मेट्रो लाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदी प्रक्रियेने संपादित करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चासही कार्योतर मान्यता देण्यात आली.

            बैठकीस पुणे येथील पीएमआरडीए कार्यालयातून अतिरिक्त महानगर आयुक्त बन्सी गवळी, सह आयुक्त स्नेहल बर्गे, उपायुक्त रामदास जगताप आदी उपस्थित होते.

000

Featured post

Lakshvedhi