Thursday, 31 March 2022

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - 2022 योजने”ची अधिसूचना जारी.

            मुंबई, दि. 30 :- कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - 2022’ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्याने राज्यातील उद्योग, व्यापार क्षेत्राला सवलतदरात टप्प्याटप्याने करथकबाकी भरण्याची आणि चिंतामुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

            अधिसूचनेच्या माध्यमातून लागू झालेली ही अभय योजना वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांसंदर्भातील असून या योजनेंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास या थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.

            वैधानिक आदेशान्वये ज्या व्यापाऱ्यांची थकबाकीची रक्कम दि. 1 एप्रिल 2022 रोजी, 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना अविवादीत कर, विवादीत कर, शास्ती याचा वेगवेगळा हिशोब न करता सरसकट एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अशी ठोक 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत 80 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील अन्य छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 2 लाख 20 हजार प्रकरणांमध्ये होणार आहे.

            जे व्यापारी अशा प्रकारे ठोक रक्कम भरण्यास पात्र ठरणार नाहीत किंवा ते हा पर्याय निवडणार नाहीत, अशा व्यापाऱ्यांना थकबाकीच्या तडजोडीसाठी प्रस्तावित योजनेमध्ये अविवादीत करास कुठलीही सवलत देण्यात येणार नाही. अविवादीत कराचा 100 टक्के भरणा करावा लागेल. मात्र, विवादीत करापोटी 31 मार्च 2005 पूर्वीच्या कालावधीसाठी 30 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर व्याजापोटी 10 टक्के व शास्तीपोटी 5 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर 1 एप्रिल 2005 ते 30 जून 2017 या कालावधीसाठी विवादीत रकमेपोटी 50 टक्के, व्याजापोटी 15 टक्के, शास्तीपोटी 5 टक्के व विलंब शुल्कापोटी 5 टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरीत थकबाकी माफ करण्यात येणार आहे.

            या ‘अभय’ योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल. तथापि, ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एकूण हप्ते सवलत 4 भागात विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले 3 हप्ते पुढच्या 9 महिन्यात भरावे लागणार आहेत. आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास त्या व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ देण्यात येईल.

            ही ‘अभय’ योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आणि पारदर्शकपणे राबवण्यात येत असून कोरोना संकटाने अडचणीत आलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यात, उभारी देण्यात ही योजना महत्वाची भूमिका बजावेल, तसेच योजनेला उद्योग व व्यापार क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

००००००००००००

 अवधूतचिंतन 

माणूस कितीही आपल्या शक्तीनूसार आणि बुद्धीनूसार जीवन जगत असला तरी ....

नियतीने ठरविलेला शेवट आणि मांडलेला खेळ त्याला स्वीकारावाच लागतो....!!!

यासाठी संस्कार चांगले असावेत....!!!

                 शुभसकाळ

Wednesday, 30 March 2022

 _*खेकडा खाण्याचे फायदे*_

खेकडे हे सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत

’′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !

मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. 

खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.

) मधूमेहींसाठी फायदेशीर –

खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.

२) कॅन्सरचा धोका कमी होतो –

खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. परिणामी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. त्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणार्‍या घटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास मदत करतात.

३) हृद्यविकाराचा धोका कमी होतो –

खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्‍या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

४) त्वचाविकारांपासून सुटका होते –

खेकडे खाल्ल्याने अ‍ॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांबरोबरच डॅडरफचादेखील त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे त्वचाविकारापासून बचाव होण्यास मदत होते.

) रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते

रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी आवश्यक असणार्‍या व्हिटामिन बी12 चा खेकड्यांमध्ये मुबलक साठा असतो. तसेच यामुळे अ‍ॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. खेकड्यातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरातील रक्तभिसरण्याची प्रकिया सुधारण्यास मदत करतात.

) वजन घटवण्यास मदत करते

चविष्ट असले तरीही खेकड्यांमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हांला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात असणे फायदेशीर ठरते.

७) रक्तदाब नियंत्रणात राहतो –

खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलेटसचे संतूलन राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात.

८) सांधेदुखी कमी होते –

खेकडे हे सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.








            अमृताहूनी गोड.                                              . श्री भैरव प्रासादिक मंडळ, भोगेश्वर आळी,मुरुड -, रायगड तर्फेदिनांक २७/३/२०२१ रोजी आयोजिलेल्या, सभागृहाचे लोकार्पण सोहळा निमित्ताने मा. वैशाली विलास भगत, संचालिका,लक्षवेधी मास मीडिया प्रा. लि.यांचे शुभ हस्ते सभागृहाचे उद्घाघाटन मा.मनोहर गुरव,अध्यक्ष, अजित गुरव,सचिव,प्रमुख पाहुणे श्री. सुरेंद्र भगत यांचे उपस्थित करण्यात आले. मान्यवरांचे शुभ हुस्ते शाल श्रीफळ, पुषपगुच्छ,सन्मान प्रमाणपत्र देवून पाहून्याचां सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहाचे बांधकामासाठी आर्थिक  मदत केली तशी यापुुढेेही  आपलेे सहकार्य राहो.  अशी मनिषा व्यक्त  केले   .                                                                           आमृताहूनी गोड अश्या ७५ पूर्ण झालेल्या माता पित्यांचा शाल श्रीफळ,पुशपगुच्छ,सन्मान प्रमाणपत्र देवून शतायुशी भव असा शुभेच्छा दिल्या. . देणगीदार यांनी आर्थिक सहाय करून तसेच सेवा स्वरूपात महिलांनी,युवा वर्गाने कार्यक्रम सफल करणेस योगदान केले ह्याबहदल सचिव अजित गुरव ह्यांनी सर्वांचे धन्यवाद मानून समारोप केला.

 सुत्रसंचालन सौ प्रज्ञा अनिल गुरव व कु. योगेश महेंद्र दवटे

देणगीदार श्रीमती, वैशाली विलास भगत २१,०००, श्री शैलेश सुभाष भगत १०,००० धनंजय अनंत गुरव ५०००,         श्री शशिकांत गोविंद भगत ५०००, व ईतर अनेक छोटे देणगीदार ... मनोगत सौ. निलांबरी अविनाश भगत, सौ अस्मिता सुनील गुरव सौ संगिता सुनील गुरव, सौ. धनंजय गुरव, श्री यशवंत भगत, श्री सुभाष भगत, श्री. शशिकांत भगत, प्रास्ताविक श्री मनोहर शंभर गुरव मानपत्र वाचन सौ श्रुती अजित गुरव..

मार्ग निसर्ग

 


 






Featured post

Lakshvedhi